जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून भारत जगाला जैवइंधन क्षेत्रातील एक नवीन मार्ग दाखविणारी ठरेल, असे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.
Read More
आयातीत कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणाला अनुकूल, अशा जैवइंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ची घोषणा ‘जी २०’ शिखर परिषदेत करण्यात आली. भारतासह ब्राझील आणि अमेरिका याचे सहयोगी देश आहेत. जैवइंधनासाठीचे आदर्श ठरवून देण्याची सुवर्णसंधीच भारताला यानिमित्ताने मिळाली आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री, श्री रामेश्वर तेली यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती दिली की जैवइंधनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ०४.०६.२०१८ रोजी राष्ट्रीय जैवइंधन धोरण (NPB) - २०१८ अधिसूचित केले. देशात. NPB ने २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल आणि २०३० पर्यंत डिझेलमध्ये ५% बायोडिझेल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
देशाचे अर्थकारण बऱ्याच प्रमाणात जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरांवर अवलंबून असते. त्याचबरोबर या तेलाच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणातली वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जैव इंधनाच्या वापराचे महत्त्व प्रकर्षाने पुढे येते. त्या दृष्टीने या कृषिप्रधान देशात जैवइंधन निर्मिती, वापराला चालना दिल्यास वाढते प्रदूषण रोखण्यासोबत देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीचे अर्थकारण दोन्हींवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.