देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी 'MY भारत' पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवार, १४ मे रोजी केले.
Read More
The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे यश यातून अधोरेखित झाले आहे. भारताची शस्त्रसज्जता पाहून संपूर्ण जग चकित झाले असले, तरी विरोधकांनी मात्र नेहमीचाच गोंधळ घालायला सुरुवात केली.देशाचा हा गौरव साजरा करण्याचे भानही विरोधकांकडे नाही, हे दुर्दैवच!!!
भारतीय रेल्वे हे जगातील चौथे मोठे सर्वाधिक विस्तारलेले जाळे. सध्या भारतीय रेल्वेचा सुवर्णकाळ सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, नववर्षाच्या प्रारंभी एकूण रेल्वे नेटवर्कपैकी 23 हजार किमीपेक्षा जास्त मार्गांवर ताशी 130 किमी वेग (किमी प्रतितास)पर्यंत वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ही उल्लेखनीय प्रगती रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि देशभरातील लाखो प्रवाशांसाठी प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेलाच अधोरेखित करते. भारतातील जवळजवळ एक पंचमांश रेल
दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.
भारतभूमीत येऊन धर्माशी नडलेल्या इस्लामिक कट्टरपंथींना #OperationSindoor च्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर #OperationSindoor #India #Bharat #Pakistan #NarendraModi #AjitDoval #Breaking #MockDrill #ऑपरेशनसिंदूर #News #MahaMTB
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
महाड नवेघर येथील २५ एकर जमीनीपैकी ३ गुंठे जमीन ही कुणबी समाजाला देण्यात आली आहे. तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेली सहा गुंठे जागा बुरुड समाजाला समाजमंदिर आणि विद्यार्थी वस्तीगृहासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुढील १५ दिवसात प्रस्ताव देण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
मुंबईत येणार पहिली ‘अमृत भारत एक्सप्रेस
आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे वर्षानुवर्षे चिकटलेले 'बिरूद', मूलभूत सुविधांसाठी दैनंदिन संघर्ष, बेताची आर्थिक स्थिती, उच्च शिक्षणाचा अभाव, रोजगाराभिमुख शिक्षणाची वानवा, अनुभवाची कमतरता या आणि अशा अनेक कारणांमुळे धारावीतील उमेदवारांना बऱ्याचदा नावाजलेल्या कंपन्यांकडून नोकरीच्या संधी नाकारल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही वर्षभरापासून धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) माध्यमातून करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे चित्र काहीसे बदलले आहे.
भरत जाधव – मराठी रंगभूमीपासून ते चित्रपट आणि छोट्या पडद्यापर्यंत आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला कलाकार. चाळीतून आलेला हा हसरा चेहरा, संघर्षातून घडलेला सुपरस्टार कसा बनला, त्याच्या आयुष्यातील रंगीबेरंगी प्रवास, गाजलेली नाटकं आणि चित्रपट, आणि प्रेक्षकांच्या हृदयात कोरलेलं स्थान – हे सगळं जाणून घ्या या खास व्हिडिओमध्ये. ‘ऑल द बेस्ट’ पासून ते ‘कोंबडी पळाली’पर्यंतचा प्रत्येक टप्पा आणि भरतच्या निर्मिती संस्थेचा प्रवास, हास्याच्या आड दडलेल्या मेहनतीचा प्रत्यय देणारा हा प्रामाणिक व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत, अमृत भारत एक्स्प्रेस आणि नमो भारत रॅपिड ट्रेनला आधुनिक भारतीय रेल्वेची त्रिवेणी म्हणून संबोधले आहे. या त्रिवेणीतील वंदे भारत आधीच संचलनात आहेत, तर आता नवीन गाड्या बिहारमधून मुंबईच्या दिशेने धाव घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच बिहारमधील नवे तीन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात सहरसा-लोकमान्य टिळक दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे.
(UNESCO) श्रीमद् भगवद्गीता आणि भरत मुनी यांचे नाट्यशास्त्र या प्राचीन भारतीय ग्रंथांना यूनेस्कोच्या जागतिक स्मृती नोंदणीत (Memory of the World Register) स्थान मिळाले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली आहे. या दोन्ही ग्रंथांना हा मान मिळणे हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे वैश्विक मान्यतेचे प्रतिक आहे.
गेले काही दिवस जोरदार आपटीमुळे गुंतवणुकदारांचे लाखो कोटी पाण्यात जाण्याचा सिलसिला मंगळवारी खंडीत झाला. भारतीय शेअर बाजाराने १५७८ अंशांची जोरदार मुसंडी मारत ७६ हजारांचा टप्पा ओलांडला
भारतसरकारकडून कृत्रिम बुध्दीमत्ता उद्योगाला बळ मिळावे यासाठी लवकरच महत्वाचा निर्णय घेणार आहे. देशातील कृत्रिम बुध्दीमत्ता उद्योगाला बळ देण्यासाठी सरकारकडून जेनेसिस म्हणजे जेन नेक्स्ट सपोर्ट फॉर इनोव्हेशन स्टार्टअप्स ही मोहीम हाती घेण्यात आली आहे
( Rahul Pandey appointed as Chief Commissioner of State Information Commission and Nagpur Tarun Bharat Editor-in-Chief Gajanan Nimdev appointed as Information Commissioner ) राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह विभागीय माहिती आयुक्तपदी दै. ‘नागपूर तरुण भारत’चे मुख्य संपादक गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची निवड करण्यात आली आहे.
सनदी लेखापाल क्षेत्रातील देशपाळीवर गाजलेले नाव म्हणजे मुकुंद एम चितळे आणि कंपनी होय. नुकतेच या संस्थेने ५१ व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने मुंबईतील सहारा स्टार येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मुंबईतील उद्योग जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते
फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याच्या प्रस्तावावर काय म्हणाले आमदार हेमंत रासने?
( Give Bharat Ratna to industrialist Ratan Tata MLC uma khapre to CM ) उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या, अशा मागणीचे पत्र आ. उमा खापरे यांनी मंगळवार, 25 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
Vande Bharat Railway भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचण्यासाठी वंदे भारत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ मध्ये काश्मीर खोऱ्यात रेल्वे पाठवण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंतचा हा सर्वात महत्त्वाचा आणि कठीण प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि तो इतर भागांशी जोडला गेलेला आहे. जम्मू काश्मीरला जाणारी पहिली वहिली रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस असेल अशी माहिती समोर आली आहे.
( Resolution to confer Bharat Ratna on Mahatma Phule and Krantijyoti Savitribai maharashtra assembly ) क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला. हा ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला.
कोकणचा विकास म्हणजे केवळ मोठमोठे प्रकल्प नाहीत, तर आपली संस्कृती, आपली माणसं आणि आपला निसर्ग जपत पुढे जाण्याचा प्रवास आहे. हाच विचार पुढे नेण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान घेऊन येत आहे, ग्लोबल कोकण महोत्सव २०२५, दिनांक ६ मार्च ते ९ मार्च दरम्यान नेस्को ग्राउंड, गोरेगाव (मुंबई) येथे हा भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उद्योग मंत्री उदय सामंत भूषवणार असून, या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले असणार आहेत. या महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे माहिती तं
हरियाणा पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या हत्येप्रकरणात एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचे नाव हे सचिन असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना सोमवारी या प्रकरणाची माहिती देण्यात आली. दरम्यान, शनिवारी १ मार्च रोजी रोहतकमध्ये नरवालचा मृतदेह एका सुटकेस बॅगमध्ये आढळल्याचे दिसून आले. त्या बॅगमध्ये तिच्या हाडांचे तुकडे पडले होते. रविवारी हरियाणा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही एका आरोपीला अटक केली त्यानंतर पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
Himani Narwal Murder राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या ३० वर्षीय काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल (Himani Narwal)यांची हत्या करण्यात आली. हरियाणा संस्कृतीशी मिळता जुळता पोषाख परिधान केल्यानंतर चर्चेत आलेल्या हिमानी रोहतक शहरातील विजय नगरच्या रहिवासी होत्या. त्यांनी वैश्य महाविद्यालयातून एमबीए आणि कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेतले होते.
कतार एअरवेजच्या विमानात एका ऑस्ट्रेलियन जोडप्याला तब्बल १४ तास मृतदेहाशेजारीच बसायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
केंद्र सरकारकडून नवीन सार्वत्रिक पेन्शन योजना आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सर्व नोकरदार तसेच स्वयंरोजगारित व्यक्तींनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे.
आता अॅपल कंपनीकडून आतापर्यतचा सर्वात स्वस्त आयफोन लाँच करण्यात आला आहे. आयफोन १६ई हे या नवीन स्वस्त आयफोनचे नाव आहे
अशा पध्दतीने सर्वच क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात येतो आहे, वाढतोही आहे. याच एआयचा भारतीतील प्रवासाचा, त्याने कुठले कुठले बदल घडवून आणले या सर्वाचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एआय खरंच नोकऱ्या घालवणार का?
२०२२ साली स्वातंत्र्य दिनाच्या लाल किल्ल्यावरील देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारता’ची संकल्पना देशवासीयांसमोर मांडली. तेव्हापासून ते अलीकडच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पातील विविध तरतुदींमधूनही ‘विकसित भारता’ची पायाभरणी करण्यात आली. त्यानिमित्ताने ‘विकसित भारता’ची आवश्यकता आणि शक्यता यांचा ऊहापोह करणारा हा लेख...
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दादर येथील नविनचंद्र मेहता इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट महाविद्यालयात ७ फेब्रुवारी रोजी २५ व्या रुबरु आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
नव्या ९ ट्रेन्स भारतीय रेल्वेच्या ताफ्यात येणार; आयसीएफ वर्षाच्या अखेरीस ९ ट्रेनसेट तयार करणार
मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या पोलादपूर येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भाजप विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर भूषविणार आहेत.
उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेला कुंभमेळा आतापर्यंतचा सर्वाधिक गर्दीचा मेळा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर रिलायन्स कंपनीने कुंभमेळ्यातील भक्तगणांसाठी ‘तीर्थ यात्री सेवा’ सुरु केली आहे
जागतिक पातळीवरील आर्थिक उलथापालथ शमण्याची शक्यता निर्माण झाल्याने रुपयाने डॉलरच्या तुलनेत वधारणे सुरु केले होते. परंतु थोड्याच काळात या वाढीला ब्रेक बसला
भारतीय वस्त्रोद्योगासाठी यंदाचा अर्थसंकल्प बऱ्याच अर्थांनी महत्वपूर्ण ठरला आहे. या अर्थसंकल्पात फक्त वस्त्रोद्योग या क्षेत्रासाठी तब्बल ५२७२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
‘अखंड भारत व्यासपीठ’ हे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्ताने विविध समाजाभिमुख कार्यक्रमांचे या वर्षभरामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या व्यासपीठाचा अध्यक्ष म्हणून येणार्या कालावधीमध्ये आयोजित उपक्रमांचा मागोवा घेणारा हा लेख...
('AI' University) विकसित भारत २०४७ मिशनच्या यशस्वी पूर्ततेसह आणि भारताच्या ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवार, दि. २८ जानेवारी रोजी दिल्या.
शेअर बाजाराची नियामक संस्था असलेल्या सेबीच्या अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम आहे. भारतीय अर्थमंत्रालयाने सेबीच्या प्रमुखपदासाठी नवीन तज्ज्ञ लोकांचे अर्ज मागवले आहेत.
(India's first 'AI' university) देशातील पहिले ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी यासंदर्भात घोषणा केली.
राज्यात दर महिन्याला भरपूर परताव्याचे अमिष दाखवून फसवणुक करणारा टोरेस घोटाळा गाजत असतानाच आता संभाजीनगरमध्ये असाच एक घोटाळा समोर आला आहे.
भारतीय स्नॅक्स उत्पादन क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या म्हणजे टाटा आणि पेप्सिको या दोन कंपन्यानी या पॅकेज्ड उत्पादनासाठी हा करार अस्तित्वात येणार आहे
भारतीय शेअर बाजाराने सलग तिसऱ्या दिवशीही म्हणजेच गुरुवारीही वाढीचा सिलसिला कायम ठेवत ३१८ अंशांची उसळी घेत ७७,०४२ चा टप्पा गाठला.
भारतातील वाहन क्षेत्राला सुगीचे दिवस येण्यास सुरुवात झाली आहे. २०२३ या वर्षीच्या तुलनेत २०२४ या वर्षात वाहनांच्या विक्रीने तब्बल १२ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे
काही दिवसांपासून सातत्याने चढ – उतारांचा सामना करणाऱ्या भारतीय शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशीही वाढच नोंदवली आहे
लांबलेले रशिया - युक्रेन युध्द, इस्त्राइल - हमास संघर्ष यांमुळे आधीच जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत असताना एका नव्या चिंतेची भर पडली आहे
गेले काही महिने महागाईच्या फटक्याने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय बाजारातील किरकोळ महागाई दराने ४ महिन्यांचा नीचांकी दर गाठत ५.२ टक्क्यांवर पोहोचला आहे
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘ नाविन्यतेच्या सशक्तीकरणातून महाराष्ट्राची प्रगती’ चे आयोजन करण्यात आले आहे
सोमवारी शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्यानंतर मंगळवारी स्थितीत सुधारणा दिसली. १७० अंशांची उसळी घेत सेन्सेक्स ७६,५०० अंशांवर स्थिरावला
Maha Kumbh Mela पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रयागरामध्ये आयोजित महाकुंभमेळ्यास दि : १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाला. सकाळपासून लोखांच्या संख्येने भाविकांचा जनसमुदाय लोटला आहे. प्रयागराजमधील विविध घाटांवर श्रद्धाळू भाविक स्नान करण्यास आपली हजेरी लावत आहेत. या उत्सवामध्ये भारतीयांसोबत परदेशी भाविकांचाही समावेश आहे. कुंभमेळ्याला काहींनी मोक्षप्राप्तीचा मारप्ग असल्याचे म्हटले आहे. श्रद्धेचा महापूर पाहून परदेशी नागरिक थक्क झाले असून मेरा भारत महानचा नारा परदेशी नागरिकांनी दिला आहे.
खासगी गृहनिर्माण क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारी आघाडीची संस्था क्रेडाई - एमसीएच कडून ३२ वा रियल इस्टेट एक्सपो १७ ते १९ जानेवारी दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कव्हेंशन सेंटर येथे आयोजित केला जाणार आहे
अनेक गुंतवणुकदारांच्या सर्वच आशा आकांक्षांवर पाणी फिरवत भारतीय शेअर बाजाराने आज ऐतिहासिक पडझड अनुभवली.