काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाविषयी अवमानकारक वक्तव्य केले आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे.
Read More
ड्रग्ज विक्रीला आळा घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी सभागृहात निवेदन केलं. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ड्रग्ज विक्रीसंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. यावर फडणवीसांनी विस्तृतपणे उत्तर दिलं.
मुंबई काँग्रेसमध्ये प्रचंड तक्रारी आहेत. आमचा पाणउतारा केला जातो, आम्हाला तुच्छ वागणूक दिली जाते असं अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, असा खुलासा काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
संगाशी संग प्राणाशी गाठ’ ही म्हण उद्धव ठाकरेंना अगदी तंतोतंत लागू पडते. दुर्जनांच्या सान्निध्यात राहिले तर नुकसान होतेच, प्रसंगी जीवही गमवावा लागू शकतो, असा या म्हणीचा गर्भितार्थ. काँग्रेस आणि शरद पवारांसारखे अनैसर्गिक मित्र जोडून ठाकरेंनी असंगाशी संग केला आणि राजकीय विजनवासच पदरात पाडून घेतला. असो. परवा ’वरळी डोम’मध्ये भरलेल्या या जनतेच्या न्यायालयात उपस्थित कोण होते? तर यांचेच चेलेचपाटे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. हा पुरस्कार मोदींना देण्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. याबाबत पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदेंनी आक्षेप घेतला होता. वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला होता. यावरुन काँग्रेस नेते भाई जगताप यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.
मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी गुजरात, पुद्दुचेरी आणि मुंबई या प्रदेशांकरिता नव्या अध्यक्षांची नेमणूक केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप होते. त्यांची या पदावरून आता उचलबांगडी करण्यात आली असून आ. वर्षा गायकवाड या मुंबई प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष असतील. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबई काँग्रेसमध्ये हा बदल करण्यात
मुंबई : विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर सन २०२३-२४ या वर्षासाठी सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख म्हणून विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे पाटील, सुरेश धस, गोपीचंद पडळकर, ॲड.अनिल परब, विलास पोतनीस अब्दुल्लाह खान दुर्राणी, शशिकांत शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी, कपिल पाटील हे या समितीचे सदस्य असणार आहेत, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी कळविले आहे.
राज्यात शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी करताना महिला बचत गटांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेत मिळण्यात ज्या अडचणी आहेत, त्या दूर केल्या जातील. या प्रकरणी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
राज्यातील नक्षलग्रस्त भागात सेवारत शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित सवलती देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत समिती गठित करण्यात आली आहे. त्या समितीच्या अहवालातील शिफारशींचा विचार करून निर्गमित होणाऱ्या सूचनांनुसार गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित नक्षलग्रस्त भत्ता लागू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.सदस्य किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
पुण्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिविशेषोपचार विषयात अध्यापकीय संवर्गात सहयोगी प्राध्यापक , सहायक प्राध्यापक तसेच क व ड संवर्गातील १२१ पदे भरण्यात आली आहेत. तसेच इतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.
मुंबई : विधान परिषदेत चर्चेच्या दरम्यान काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना भाई जगताप मुंबईच्या प्रश्नांवर बोलत असताना अचानक त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधत पन्नास खोक्यांचा पुनरुच्चार केला. जगताप यांनी निशाणा साधल्यानंतर शिंदे गटाकडून स्वाभाविकरित्या प्रत्युत्तर मिळाले खरे पण यावेळी शिंदे गटातर्फे यंदा किल्ला लढवला तो म्हणजे दादा भुसे यांनी. भाई जगतापांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना दादा भुसे यांचे कधीही पाहायला न मिळणारे आक
जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व सदस्यांचा शपथविधी शुक्रवारी पार पडला. विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सदस्यांना शपथ दिली
कोर्टाने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोघांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानास परवानगी मिळावी ही याचिका फेटाळल्याने शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली . नवाब मलिक व अनिल देशमुख या दोघांना कोणती शिक्षा ठोठावली आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला.
मुंबई : महाविकास आघाडीतील (मविआ) नेत्यांमधील मतभेद आता नवे राहिलेले नाहीत. आता यात महापालिका आरक्षण सोडतीच्या मुद्द्यांची भर पडली आहे. मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीत आमच्यावर अन्याय झाला असून शिवसेना योग्य न्याय देत नसल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केला असून त्यांनी न्यायालयात जाण्याचीही भूमिका घेतली आहे.
मुंबईतील शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील महत्त्वाच्या नाल्यांची सफाईची कामे मुंबई महापालिकेतील भाजपच्या दणक्यामुळे सुरू झाल्यानंतर, पालिकेतील काँग्रेस पक्षाला आता नालेसफाई करून घेण्याची जाग आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही नालेसफाई आणि रस्ता दुरूस्तींची कामे दि. ३१ मेपूर्वी करावीत, अशी मागणी पालिका आयुक्त/प्रशासक इकबालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.
मात्र पुढील सभा शिवाजी पार्कवरच होणार : भाई जगताप
झिशान सिद्दीकी आणि भाई जगताप भिडले
बैलगाडीत क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते भरल्याने झालेल्या अपघाताप्रकरणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार भाई जगताप आणि काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पब्लिसिटी स्टंट करताना, मुक्या जीवांचा विचार केला नसल्याचे तक्रार अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 'जीवदया अॅनिमल अॅण्ड एन्वायरमेंट वेलफेअर ऑरगनायझेशन'तर्फे ही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
तसे ते देशभर या ना त्या निवडणुकीत इथे ना तिथे पडतच असतात. पडणे ही त्यांच्यासाठी अभूतपूर्व घटना आहे किंवा त्यांना पडताना पाहणे म्हणजे काही नवीन घटना आहे,
आमदार प्रसाद लाड यांचा भाई जगताप यांना खोचक टोला
भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्येंचा काँग्रेसला टोला
काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान घडली घटना
मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
भाजप नेते निलेश राणेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
राजीनामा देण्यासाठी त्यागाची भावना ही अंतर्मनातून येत असते. मात्र येथे तर राजीनामा दिल्यानंतर लगेच राष्ट्रीय पातळीवरील पद मागितले जाते. त्यामुळे हा राजीनामा आहे की, मोठ्या पदावर जाण्यासाठीची शिडी? असा सवाल निरुपम यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. एवढंच नाही तर काँग्रेसने अशा 'कर्मठ' लोकांपासून सावध राहायला पाहिजे असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.