संन्यास्याचे हृद्गत यावेळी हा संन्यासेच्छुक यजमान उदार अंतःकरणाने म्हणतो, “आजपर्यंत या संसार सागरात बुडत चाललो होतो, आता मी या जगाच्या क्षणभंगुरतेला पाहून त्यापासून विलग होत आहे. यापुढे माझे मन इकडे तिकडे भरकटणार नाही. मनाची स्वामिनी असलेल्या मनीषा शक्तीच्या आधीन झालो आहे.” परमेश्वराला माता-पिता समजून तो पुढे आत्मविश्वासाने म्हणतो आहे, “हे मातृपितृस्वरूप देवा, तुझ्या कृपेने माझ्यामध्ये इतके आत्मबळ वाढले आहे की, यापुढे भौतिक इंद्रियांच्या मागे न धावता त्यांच्यावर विजय प्राप्त करेल.
Read More
संन्यासविधी संपन्न झाल्यानंतर उपस्थित ज्ञानीजन त्या परिव्राजकाला शुभेच्छा देत, त्याच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी संन्यासाला परमेश्वराची उपमा दिली आहे. जसा परमपिता परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांडातील चंद्र, सूर्य इत्यादींना प्रकाशित करून त्यांना धारण करतो, त्याचप्रमाणे संन्यासानेदेखील आपल्या आत्म्यामध्ये चांगल्या गोष्टी धारण कराव्यात आणि सदोदित आनंदी राहावे. त्याबरोबरच त्याने या संपूर्ण जगातील ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ या आश्रमातील सर्व वर्णांच्या प्रजाजनांना सत्यविद्येचा उपदेश करावा आणि सन्