(Devendra Fadnavis) श्रीगणेश विघ्नहर्ता आहेत. त्यांनी सर्वांना सुख-समाधान द्यावे, अशी प्रार्थना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दिलेल्या भेटीवेळी केली.
Read More
दरवर्षीप्रमाणे नित्यनेमाने येणारे गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांच्या उत्साहाला उधाण आणणारा महाराजाच. गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा अप्रतिम मिलाप असलेला हा उत्सव म्हणजे ‘स्कील इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ची प्रेरणा देणारा उत्सव असतो.
उद्या अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी असल्याकारणाने राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी २८ सप्टेंबरऐवजी दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
आज अनंत चतुर्दशी. गणरायाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणून निरोप देण्याचा भावनिक क्षण... असा हा बाप्पा सर्वदेशी व्यापला आणि सर्वांच्याच अंतःकरणी इतका रुजला व रमला आहे, की त्याच्या विना आम्हाला सर्व काही सुनेसुने वाटते. पण, दुर्दैवाने ज्या विशुद्ध भावनेने या उत्सवाची सुरुवात केली गेली, तो मूळ उद्देशच बाजूला पडल्याचे दिसते. त्यामुळेच प्राप्त परिस्थितीत श्री गणेश अथवा गणपती या इष्टदेवतेचे मूळ शुद्ध स्वरूप आहे तरी कसे, हे जाणून घेणे अगत्याचे ठरते.
अनंत चतुर्दशी निमित्त उद्या दि. २८ सप्टेंबर २०२३ रोजी ठाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. अनंत चतुर्दशी दिवशी ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असते. विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी ठाणे जिल्ह्याकरिता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील.
गणेशोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही. तो आता लोकप्रिय सांस्कृतिक आणि जगभर पसरलेल्या गणेशभक्तांमुळे ग्लोबल उत्सव झाला आहे.पण हा मंगल उत्सव साजरा करताना आपण काही नवीन गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात. या सणाला असलेली पर्यावरणाची, श्रद्धेची, सहकुटुंब उपासनेची किनारही सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. हा सण सगळ्यांचा असल्याने इतर धर्माचे लोकही कसे भाग घेतील, हे मंडळांनी पाहायला हवे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात घरोघरी आणि सार्वजनिक स्वरूपातही साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवात वातावरण गणपती बाप्पा मोरया च्या गजराने भक्तिमय , चैतन्यमय झालेलं असतं .
गणपती बाप्पा म्हणजे अगदी लहान-थोरांपासून सगळ्यांच्याच अगदी जवळचा. सालाबादप्रमाणे त्याला अनेक घरांत सार्वजनिक मंडळात वाजत गाजत, ढोल-ताशांच्या गजरात थाटामाटात घरी आणले जातात.
गणेशउत्सवानिमित्त मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे ज्यादा गाड्या सोडणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.