२२ डिसेंबर २०१७ यादिवशी 'भद्रकाली' प्रॉडक्शन' च्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचा शुभारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही 'संगीत देवबाभळी' ची नाट्य दिंडी विसावणार आहे.बुधवार, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे शेवटचा प्रयोग संपन्न होणार आहे.
Read More
'चांद्रयान ३' आणि 'गगनयान'च्या नुकत्याच झालेल्या यशस्वी चाचणीमुळे भारतातील अंतराळ क्षेत्रात काम करणारे प्रत्येकजण उत्साहित आहे. आता विजयादशमीच्या निमित्ताने दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रो प्रमुख एस सोमनाथ केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पूर्णमिकवु मंदिरात प्रार्थना करण्यासाठी पोहोचले. यादरम्यान त्यांनी विश्वाच्या रहस्यांसाठी सुरू असलेल्या आध्यात्मिक शोधाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की एक अंतराळ शास्त्रज्ञ म्हणून ते अंतराळातील रहस्ये सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो.
भाजप आणि संघ कार्यकर्त्यांच्या रक्ताने हात माखलेल्या केरळच्या पिनरायी विजयन सरकारला आता हिंदू मंदिरांमधील भगवे ध्वज, पताका, तोरणही डोळ्यात खुपू लागले. अशा या देवभूमीत कम्युनिस्टांच्या राक्षसी राजवटीला आता भगव्या रंगानेच कापरे भरायला लागले. याविरोधात केरळी हिंदूही सरकारविरोधात रस्त्यावर एकटवला असून, केरळमध्ये राजकीय परिवर्तनाची पहाट होऊ पाहत आहे.
अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पावणे दोन एकरात आले (अद्रक) शेतीच्या प्रयोगातून लाखोंची कमाई, जितेंद्र पाटलांनी करून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
'संगीत देवबाभळी' या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर नवे विक्रम रचले आहेत. या नाटकाने तर अनेक नाट्य स्पर्धांमध्ये तर बाजी मारलीच आहे, नुकताच या नाटकाला काही दिवसांपूर्वी 'साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.
गेले काही वर्ष तंत्रज्ञानाबरोबरच नाटकाच्या कथेपासून सादरीकरणापर्यंत अनेक बदल होत आहेत. त्यातीलच 'संगीत देवबाभळी' हे एक नाटक आहे.
"गुवाहाटी येथे गेलेले शिवसेनेचे नेते व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही", असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील शुक्रवारी (दि. २४ जून) म्हणाले. शिवसेनेच्या दोनतृतियांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजप असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यासंदर्भात कोल्हापूर दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलत असताना या चंद्रकांत दादांनी स्पष्टोक्ती दिली.
गरज ही जशी शोधाची जननी आहे तशीच ती उपक्रमांची पण जननी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे भाजप अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. ते अंकुर प्रतिष्ठानच्या 'देणे समाजाचे समाजासाठी' या कार्यक्रमाच्या १३व्या वर्षीच्या उपक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अंकूर प्रतिष्ठान चे अध्यक्ष कुलदीप सावळेकर व स्विकृत नगरसेविका वकील सौ मीताली कुलदीप सावळेकर यांच्या मार्फत गेली १३ वर्षे सातत्याने चालणाऱ्या अंकूर प्रतिष्ठान च्या देणे समाजाचे समाजासाठीचा १३व्या वर्षीच्या उपक्रमात गरजू व्य
मराठा समाजाचे आरक्षण सुप्रिम कोर्टात टिकविता येत नसल्याचे अपयश लपविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण धादांत असत्य व्यक्तव्ये करत आहेत व मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे विधिमंडळ, राज्यपाल व उच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला.
अशा व्हिडियोसाठी पक्षाला जाब विचारणे चुकीचे असल्याचे मतही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे
एकतिसाव्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘सोयरे सकळ’ या नाटकाने बाजी मारली. भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या या नाटकाला ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले