(Separate skill development training course on AI in Maharashtra) “शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करून कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत.
Read More
(Inspection in Vasai under the leadership of local MLA Sneha Dubey Pandit) वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार तसेच विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई विधानसभा क्षेत्रातील नाल्यांची व विविध विकासकामांची पाहणी केली.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, आपल्या गीतांच्या माध्यमातून लोकमानस जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या शांताबाई साठे यांनी वयाच्या ९०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवार दि. ४मे रोजी कांदिवली येथील सेव्हन स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बोरिवली येथील महापालिकेच्या दौलतनगर स्माशनभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
(Survey tribal villages in Mumbai suburbs) आदिवासी समाजासाठी असलेल्या केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे, याचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगरातील आदिवासी पाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याचा अहवाल दि. 30 मे रोजीपर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शुक्रवार, दि. 2 मे रोजी दिले.
वक्फ कायद्यातील दुरुस्तीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंदूंचा भीषण नरसंहार करण्यात आला. हा नरसंहार करणाऱ्या जात्यंध समाजकंटकांना पश्चिम बंगाल सरकारने संरक्षण दिले आहे. पश्चिम बंगालमधील सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे निवेदन भाजपच्या बंगाली प्रकोष्ठतर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना देण्यात आले.
गोव्यातील शिरगावमध्ये आयोजित लैराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला असून परिस्थितीबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून आढावा घेतला.
‘एआय’ प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा ठरला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. गुरुवार, १ मे रोजी सिंधुदुर्गातील शरद कृषी भवनात नितेश राणे यांच्या हस्ते ‘एआय’ प्रणालीचे उद्घाटन आणि लोगोचे अनावरण पार पडले. यावेळी ते बोलत होते.
विवेक फणसाळकर यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. संजयकुमार वर्मा, सदानंद दाते, रितेश कुमार, अर्चना त्यागी, देवेन भारती आणि अमिताभ गुप्ता यांची नावे चर्चेत होती. त्यापैकी देवेन भारती यांच्या गळ्यात माळ आयुक्तपदाची माळ पडली. डॅशिंग आयपीएस अधिकारी, अशी त्यांची ओळख. 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या तपासात त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. कुख्यात दहशतवादी कसाबला फाशीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कणा मोड
मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवार, ३० एप्रिल रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला.
Elphinstone Bridge Parel Mumbai ( Elphinstone Bridge Parel Mumbai ) “मुंबईतील प्रभादेवी येथील १०० वर्षांहून अधिक जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या पुनर्बांधणीत परिसरातील १९ इमारती प्रभावित होत आहेत. या प्रभावित इमारतींचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’ करणार असून या १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार आहेत,” अशी माहिती मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय पोलीस सेवेतील १९९४च्या तुकडीचे डॅशिंग अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती यांना मुंबई पोलीस दलात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे.
३५ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आयुक्तपदासाठी रितेश कुमार, अमिताभ गुप्ता, संजीवकुमार सिंघल या अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, आता मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत शासनाचा आदेश जारी करण्यात आला असून उद्या म्हणजे गुरुवार दि. १ मे रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.
( Vishwa Hindu Parishad morcha on Mumbai Police Commissionerate today ) हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून आकस भावनेने होणार्या कारवाईच्या निषेधार्थ ‘विश्व हिंदू परिषदे’चा मोर्चा मंगळवार, दि. 29 एप्रिल रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे. दुपारी 3 वाजता चर्चगेट रेल्वे स्थानक ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ येथे सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ‘विश्व हिंदू परिषद’ कोकण प्रांताचे प्र
( Special precautions in Mumbai after Pahalgam attack ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. “मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे,” अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे.
Independent authority in Mumbai for Last Mile Connectivity “मुंबईत नागरिकांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे,” असे स्पष्ट करत “यासाठी ‘एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण’ (युनिफाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी) स्थापन करावे,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
( Priority providing houses to mill workers in Mumbai DCM shinde ) “गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’समवेत तातडीने बैठक घ्यावी. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किमती कशा कमी करता येतील, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.
( mumbai public transport concluded ) मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे ‘बेस्ट’ उपक्रमाची आढावा बैठक पार पडली.
२६ एप्रिल शनिवार रोजी इराणच्या राजाई बंदरावर भीषण स्फोट झाला, त्यामध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आणि ७०० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे वर्तवले जात आहे. हा स्फोट नक्की अपघात होता की नियोजीत घातपात? असा संशय व्यक्त करण्यात येत आहे
पश्चिम बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान : अॅड. शेलार
Navi Mumbai Metro City वेगाने विस्तारणार्या नवी मुंबईतील वाढत्या गर्दीचे नियोजन आणि जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांसाठी, राज्य सरकारने बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर मेट्रो मार्गाची प्राधान्याने अंमलबजावणी केली व त्यासाठी ‘सिडको’ची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली. ‘सिडको’तर्फे एकूण 25 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाची अंमलबजावणी विविध टप्प्यांमध्ये करण्याचे नियोजित असून, यांपैकी पहिल्या टप्प्यातील सीबीडी-बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग-1 नोव्हेंबर 2023 पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
‘डीप क्लीन ड्राईव्ह’ अभियानांतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालये, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, मैदाने, शाळा आदींच्या स्वच्छतेसाठी पालिकेकडून विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. त्यानंतर आता पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे.
“सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे,” असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.
उत्तर मुंबई भाजपच्या निषेध मोर्चात कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी
मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करून याठिकाणी विविध वैशिष्ट्यांनी नटलेली ’टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने सोमवारी सांगितले की, “महानगरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकासाठी सुमारे ७५ टक्के उत्खनन काम पूर्ण झाले आहे.”
शहराच्या मध्यवर्ती भागातील १२५ वर्षे जुना एलफिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज अखेर काल रात्री शुक्रवार, दि.२४ रोजी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये काही ठिकाणी वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर ७ मार्ग ‘नो पार्किंग’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
iconic Mumbai International Cruise Terminal भारताचा सागरी दरवाजा म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई बंदर येथे, देशातील सर्वांत मोठे आणि आयकॉनिक क्रूझ टर्मिनल सोमवार, दि. 21 रोजी संपूर्ण जगासाठी खुले झाले. हे भारतातील सर्वांत मोठे क्रूझ टर्मिनल आहे. यामध्ये एकाचवेळी दोन मोठी जहाजे उभी राहू शकतात. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच खुल्या झालेल्या जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक पोर्ट मियामी येथील क्रूझ टर्मिनलचा आढावा घेऊया.
सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.
वृक्षांची खिळे ठोकून हानी करणा-यांवर तसेच वृक्षांवर विद्युत रोषणाई करून त्यांना इजा पोहचविणा-या व्यक्ती – संस्था यांना अशा प्रकारचे पर्यावरण विरोधी कृत्य न करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने वारंवार जाहीर आवाहन करण्यात येत असते व रोजीही आवाहन करण्यात आले होते
राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी आता ‘झोनल मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. विकासात्मक प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली आहे. सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी त्यांनी वॉररूम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
conversions आदिवासी बांधवांनो जागे व्हा! मी आदिवासींना बांधवांना जागृत करण्यासाठी चाकुलियाहून आलो आहे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत झारखंडमध्ये धर्मांतर थांबवावे लागेल, अन्यथा येथील परिस्थिती मुर्शिदाबादसारखी होणार आहे. जर धर्मांतर करणे थांबवले नाही तर आदिवासींचे अस्तित्व धोक्यात येईल असे, राज्याचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी रविवारी चाकुलियातील आदिवासी महासंमेलनात संबोधित करताना त्यांनी सांगितले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ‘राज्य वन्यजीव मंडळा’च्या बैठकीत वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले (gargai dam). या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली (gargai dam). बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णयांसंदर्भात स्वत: वन्यजीवप्रेमी असलेल्या प्रवीणसिंह परदेशी यांची घेतलेली ही मुलाखत...(gargai dam)
Mumbai Municipal Corporation ने जैन मंदिर पाडल्याने जैन समाजाने एकत्र येत निदर्शने केली आहेत. मुंबईतील विलेपार्ले विभागत असणार्या ९० वर्षांपूर्वील जैन मंदिर पाडण्यात आले. श्री १००८ पाश्वर्थनाथ देरासर, अवैध असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. हे प्रकरण वर्षानुवर्षे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले जरी असते तरीही मंदिर समितीच्या बाजूने कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.मंदिर पाडण्याची स्थगिती देण्यासाठी भाविकांनी अंतिम क्षणी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु कोणतीही सुनावणी ह
महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहेच. परंतू, हिंदी आणि इंग्रजीसह इतर भाषादेखील शिकू शकतात, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, १७ एप्रिल रोजी दिली.
Kerala High Court ने मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या कन्या वीणा यांना नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित आहे. या प्रकरणाशी संबंधित याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात सीबीआयने तपासाची मागणी केली आहे.
( Ravindra Prabhudesai thane satkar ) उद्योग क्षेत्रासह समाजकारण व अध्यात्मामध्ये विशेष योगदान देणार्या रवींद्र प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने ‘डी.लिट’ पदवी देऊन सन्मानित केले आहे. ठाणेकर प्रभुदेसाई यांचा सन्मान हा आपल्या ठाण्याचा गौरव आहे. ठाण्याची प्रतिष्ठा वाढवून उद्योजकतेच्या बहुमानानिमित्त डॉ. प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार आयोजित केला आहे. या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: ( Bhushan Gavai 52nd Chief Justice of India ) भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी औपचारिक नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून अधिकृतपणे शिफारस केली आहे आणि हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाकडे पाठवला आहे. सध्या, न्यायमूर्ती गवई हे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत.
(Congress MLA Indira Meena Assaults BJP Leader) राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात रविवारी १३ एप्रिलच्या रात्री राजकीय वादाला शारीरिक हिंसेचे स्वरुप मिळाल्याची घटना घडली आहे. काँग्रेस आमदार इंदिरा मीणा यांनी भाजप पदाधिकारी हनुमान दीक्षित यांच्या कानशिलात मारली. त्यांच्या गाडीवर चढले आणि जोरदार बाचाबाचीदरम्यान त्यांचे कपडे फाडले. व्हिडिओमध्ये कैद झालेले हे नाट्यमय दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली.
आपल्या ऐतिहासिक संपन्न वारसा सांगणार्या अनेक कलाकृती, शिल्पे देशभरात आहेत. महाराष्ट्रातही यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुंबईजवळ असणार्या अंबरनाथाचे शिवमंदिर हादेखील असाच एक समृद्ध इतिहासाचा वारसाच! शिलाहार राजांनी उभारलेल्या या मंदिराचा इतिहास, त्यातील नक्षीकाम व या मंदिराची वैशिष्ट्ये यांचा घेतलेला मागोवा...
(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली आण
Multi-modal AI ‘एआय’ जसे जुने होत आहे, तसेच ते अधिक प्रगल्भदेखील होत आहे. आता मानवाच्या दैनंदिन गरजांवर ते कौशल्याने काम करत आहे. मात्र, एकीकडे हा प्रगतीचा टप्पा जरी ‘एआय’ने ग़ाठला असला, तरी त्याच्या नैैतिकतेवर आणि मानवाला भेडसावणार्या संभाव्य धोक्यांवर चर्चा सुरू झाली आहे. तरीही सध्या जग हे ‘एआय’च्या या विविध क्षेत्रांतील उपयोजितेचा आनंद उपभोगत आहे. ‘एआय’चा मानवी आयुष्यातील दैनिक गरजांमध्ये होणार्या उपयोगाचा घेतलेला हा आढावा...
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ' निवडक जयवंत दळवी ' या कार्यक्रमात दिवंगत लेखक, पत्रकार जयवंत दळवी यांच्या साहित्याचा स्मृतीजागर पार पडला. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात जयवंत दळवी यांच्या साहित्याच्याअभिवाचनचा कार्यक्रम संपन्न झाला. दिग्गज लेखक तथा नाट्यकर्मींच्या उपस्थिती मध्ये हा साहित्य सोहळा संपन्न झाला.
( Minister Amit Shah visit Maharashtra ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवार, दि. ११ एप्रिल आणि शनिवार, दि. १२ एप्रिल असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते रायगड किल्ल्यावर भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वाद घेणार आहेत.
(Tahawwur Rana Extradition) २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वूर राणाचे अखेर गुरुवारी १० एप्रिल रोजी तब्बल १७ वर्षांनी भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. तत्पूर्वी, अमेरिकेने कडक सुरक्षेत कॅलिफोर्नियामध्ये राणाला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देतानाचे फोटो आता समोर आले आहेत. त्यांचे विमान संध्याकाळी ६.२२ वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. त्यानंतर, वैद्यकीय तपासणीनंतर त्याची रवानगी एनआयए कोठडीत करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका आणि केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन 'नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' आणि 'टीव्हीएस' यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकर आदींसह महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या रिक्षांचे वाटप करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रश
(Tahawwur Rana Extradiction) मुंबईतील २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अखेर अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात येत आहे. अमेरिकेने त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदिल दिल्यानंतर भारतीय पथक त्याला आणण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले होते. राणा याला अमेरिकेतून भारतात घेऊन जाणारे विशेष विमान दिल्लीतील पालम टेक्निकल विमानतळावर उतरले आहे. येथून तहव्वूर थेट एनआयएच्या मुख्यालयात नेले जाईल. एनआयए मुख्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
Narendra Mann मुंबईतील २६ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वुर राणा याला अमेरिकेतून भारतात आणले जाणार आहे. त्याचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केले जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेचा वापर करत संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी वकील नरेंद्र मान यांनी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.