हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन ब्लॉकबस्टर चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भूलैय्या ३’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची दिवाळी अगदी धमाकेदार केली आहे. एकाच दिवशी दोन्ही चित्रपटांची टक्कर बॉक्स ऑफिसवर कसा परिणाम करणार या चर्चा रंगल्या होत्या खऱ्या पण दोन्ही चित्रपटांनी अनपेक्षितपणे कमालीची कामगिरी केली आहे.
Read More
अभिनेता कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. सिंघम अगेन या चित्रपटासोबत टक्कर देत भूल भूलैय्या ३ ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला अवघ्या तीन दिवसांत जमा केला आहे. दरम्यान, कार्तिकने नुकताच चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी त्याच्यासोबत घडलेला एक विचित्र किस्सा सांगितला आहे.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हिंदीतील दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. भूल भुलैय्या ३ आणि सिंघम अगेन या दोन चित्रपटांची चांगलीच टक्कर होणार आहे. अजय देवगण आणि कार्तिक आर्यन १ नोव्हेंबर २०२४ रोजी बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. दरम्यान, या दोन्ही चित्रपटांचे यापूर्वीचे प्रत्येक भाग यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आता नेमक्या कोणच्या चित्रपटाकडे प्रेक्षक वळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच, दोन्ही चित्रपटांसाठी प्री-बुकिंग जोरदार सुरु झाले असून काही अंशी वाद देखील सुरु आहे.
'भूल भुलैय्या' या चित्रपटाच्या दोन यशस्वी भागांनंतर आता भूल भूलैय्या ३ हा चित्रपट दिवाळी निमित्त प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडतेच पण त्याहून जास्त आवडली ती यातील गाणी खासकरुन 'आमी जे तोमार' गाणं. नुकतंच या गाण्याची तिसऱ्या भागातील पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली. डान्सिंग क्विन माधुरी दीक्षित आणि ओरिजनल मंजुलिका यांनी एकत्रित एकाच स्टेजवर आमी जे तोमार या गाण्यावर नृत्य केलं. शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये ‘आमी जे तोमार ३.o’ या गाण्यावर त्यांनी या दोन्ही अभिनेत्रीं
यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी फार खास असणार आहे. कारण, भूल भूलैय्या आणि सिंघम या दोन्ही सुपरहिट चित्रपटांचे सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. भूल भूलैय्या ३ आणि सिंघम अगेन हे दोन्ही चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून नेमकी बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान, 'भूल भूलैय्या ३'ची उत्सुकता शिगेला पोहोचली असून कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रुह बाबाच्या भूमिकेतून भुतांना बाटलीत बंद करायला तयार झाला आहे.
मंजुलिका परत येत आहे आणि यावेळी एक नाही तर दोन मंजुलिका असणार आहेत. हो सध्या कार्तिक आर्यन याची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भूलैय्या ३' सध्या चर्चेत आहे. भूल भूलैय्या ३ चित्रपटाच्या ट्रेलरमधून १५ वर्षांनी पुन्हा एकदा वेगळं कथानक दिसणार असं दिसत आहे. विशेष म्हणजे भूल भूलैय्या नंतर तिसऱ्या भागात पुन्हा एकदा विद्या बालन दिसणार असून प्रेक्षक अधिकच उत्सुक आहेत. अशातच 'भूल भूलैय्या ३'मध्ये आधीच्या भागातील एक पात्र पुन्हा एन्ट्री घेताना दिसणार आहे.
बहुचर्चित 'भूल भूलैय्या ३'ची उत्सुकता शिगेला आहे. तिसऱ्या भागात पुन्हा एकदा विद्या बालन अर्थात मॉंजोलिका पर येणार असल्यामुळे विशेष आनंद प्रेक्षकांना झाला आहे. आता पुन्हा एकदा कार्तिक आर्यन भूतांना आटोक्यात आणायला सज्ज आहे. नुकताच या चित्रपटाचा भयानक टीझर प्रदर्शित झाला आहे.
अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असणारा भूल भूलैय्या हा चित्रपट २००२ साली आला होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग २०२२ साली आला होता. आता लवकरच कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भूलैय्या ३' कधी येणार हे जाहिर करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कियारा अडवाणी होती तर आता तिसऱ्या भागात तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे. आणि महत्वाचे म्हणजे 'भूल भूलैय्या'चा पहिला भाग गाजवणारी विद्या बालन पुन्हा एकदा तिसऱ्या भागात झळकणार असल्याने चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे.
विद्या बालन आणि प्रतिक गांधी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दो और दो प्यार’ (Do Aur Do Pyaar) हा चित्रपट १९ एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. शिर्षा ठाकुर्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून एका स्त्री दिग्दर्शिकेच्या नजरेतून वैवाहिक जीवन आणि त्या नात्यांत येणारे दुरावे किंवा चांगले क्षण पाहता येणार आहेत. दरम्यान, या (Do Aur Do Pyaar) चित्रपटाने प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. एका तिकीटावर एक तिकीट मोफत अशी ऑफर चित्रपटाची टीम प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ब्युटी विथ ब्रेन असणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन (Vidya Balan). आपल्या अभिनयाचा जोरावर अढळ स्थान निर्माण करणारी विद्या आपल्या परखड मतांनी चाहत्यांची मने जिंकत असते. नुकतंच तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमवर विधान केले आहे. ही इंडस्ट्री कुणाच्या बापाची नाही असे तिने (Vidya Balan) म्हटले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत विविध विषयांवर प्रयोग केले जातात. भयपट आणि विनोदीपट यांचे मिश्रण असलेल्या ‘भुल भुलैया’ चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या अभिनयाचे प्रेक्षक चाहते झाले होते. यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ‘भुल भुलैया २’ देखील प्रेक्षकांच्. पसंतीस आला होता, ज्यात अभिनेता कार्तिक आर्यन याने अक्षय कुमारची जागा घेतली होती. आता पुन्हा एकदा ‘भुल भुलैया ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात परत एकदा अवनी अर
‘पुणे फिल्म फाऊंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी जाहीर केली. फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्यासोबत फाऊंडेशनचे सचिव रवी गुप्ता हेदेखील यावेळी उपस्थित होते. याबरोबरच विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यानमालेत चित्रपट दिग्दर्शक चैतन्य ताह्मणे यांचे ‘लेसन्स आय हॅव लर्न्ट सो फार’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यूटनच्या यशानंतर आता अमित मसुरकर घेऊन आला शेरणी
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने आपला बहुप्रतीक्षित चित्रपट 'शेरनी'च्या नव्या चित्ताकर्षक टीजरचे केले अनावरण; 2 जूनला येणार ट्रेलर!
‘गुलाबो-सीताबो’नंतर ‘शकुंतलादेवी’ अॅमेझॉन प्राइमवर होणार प्रदर्शित!
ह्युमन कॉप्युटर म्हणून सर्वपरिचित असलेल्या शकुंतला देवी यांच्यावरील जीवनपटाविषयी काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आणि प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली. आज या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि एक छोटीशी झलक प्रदर्शित करण्यात आली.
'मिशन मंगल' ने आत्तापर्यंत २००.१६ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.
तब्बल १३ वर्षानंतर भूलभुलैया हा चित्रपट एका नव्या अवतारात येत आहे. भूलभुलैया २ मध्ये कार्तिक आर्यन हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आज त्याच्या चित्रपटातील भूमिकेचा पाहिला लूक चित्रपटकर्त्यांनी प्रदर्शित केला.
जगन शक्ती दिग्दर्शित आणि आर. बल्की लिखित 'मिशन मंगल' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज या चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रदर्शित झाला.
एका स्वप्नवत अशा जगात घेऊन जाणारा 'मिशन मंगल' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित झाला. अक्षय कुमार या चित्रपटात एका शास्त्रज्ञाची भूमिका साकारणार आहे. भारताच्या एका सुवर्ण कामगिरीवर आधारित 'मिशन मंगल' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
अंतराळ संशोधनावर आधारित स्टार ट्रेक, स्टार वोर्स, ग्रॅव्हिटी यांच्यासारखे चित्रपट आत्तापर्यंत हॉलिवूड मध्ये बनवण्यात आले. मात्र बॉलिवूडमध्ये हा विषय तितक्या सक्षमतेने अद्याप कोणीही मांडलेला नाही. त्यामुळेच आता भारतातील एका ऐतिहासिक घटनेवर आधारित 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे
मराठीतील कॉफी आणि बरंच काही चित्रपटात तसेच मणिकर्णिका, बाजीराव मस्तानी सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या वैभव तत्ववादीची महान गणितीतज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनपटामध्ये एंट्री झाली आहे.
‘हम पांच’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
विद्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्याविषयी काही रंजक गोष्टी...