ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील पाच शाळांमध्ये शौचालय बांधकामाचे कार्य जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC Re) आणि विरांगणा महिला मंडळ (VMM Foundation) यांच्या संयुक्त CSR उपक्रमांतर्गत यशस्वीरित्या पूर्ण झाले. या उपक्रमाचा लाभ किनवली, मुगाव, नारायणगाव, वेलोली आणि उमरई या गावांतील विद्यार्थ्यांना झाला आहे.
Read More
(West Bengal Teacher Recruitment Scam) पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळा प्रकरणातील सीबीआय चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणात, कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल मंत्रिमंडळाच्या शिक्षकांची २५ हजार अतिरिक्त पदे निर्माण करण्याच्या निर्णयाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी रद्द केला. त्यामुळे पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला दिलासा मिळाला आहे.
( Bengal government involved in corruption Teachers protest ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ भ्रष्टाचारात सामील असून आम्हाला त्यांनी केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप दिला आहे, अशी जळजळीत टिका नोकरी गमवावी लागलेल्या शिक्षिका सुमन बिस्वास यांनी केली आहे.
गरिबीवर मात करून स्वकर्तृत्वाने यशाची दमदार पाऊले टाकत मानद पी.एचडी मिळवणार्या आणि शैक्षणिक क्षेत्र ते सामाजिक क्षेत्र असा कार्याचा परिघ असणार्या सुनील पांचाळ यांच्याविषयी...
‘सशक्त आपुल्या राष्ट्रातें। करणें असल्या योग शिका॥’ हा मंत्र जपत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटणार्या नाशिकच्या स्वाती प्रमोद मुळे यांच्याविषयी...
National Youth Day स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत शिक्षक चळवळीतील युवा कार्यकर्ते डॉ विशाल कडणे यांच्या हेल्पिंग हँड फाऊंडेशनतर्फे (Helping Hand Foundation -NGO) मुंबईसह आसपासच्या विभागातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी विशेष प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये १७२५ स्पर्धकांनी सक्रिय सहभाग घेतला. १२ जानेवारी ‘राष्ट्रीय युवा दिन’ या संकल्पनेवर आधारित ह्या प्रश्नमंजूषा स्पर्ध्येमध्ये युवा दिनाबाबत ३० प्रश्न समाविष्ट होते.
१२ जानेवारी ‘राष्ट्रीय युवा दिन’ या संकल्पनेवर आधारित ही प्रश्नमंजूषा स्पर्धा असून त्यात युवा दिनाबाबत ३० प्रश्न विचारले जातील. सोबत दिलेल्या पर्यायापैकी (MCQ) एक पर्याय निवडायचा आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकास राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. प्रथम पाच स्पर्धकांना विशेष पारितोषिकाने गौरविले जाईल. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या गूगल फॉर्मची लिंक वर क्लिक करून आपली माहिती दिनांक १२ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.३० वाजण्यापूर्वी
(Fatima Shaikh) आधुनिक काळात स्त्रीशिक्षणासाठी पुढाकार घेणार्यांत सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रणी आहे. त्यासाठी सर्व समाज कृतज्ञ आहे. सावित्रीबाई आणि जोतिराव यांना यासाठी सहकार्य करणार्या अनेकांची नावे ब्रिटिश कागदपत्रांमुळे लोकांना माहीत झाली आहेत.
दिव्यांगत्वावर मात करत आपल्या वेगळ्या धाटणीच्या शिकवणीतून हजारो विद्यार्थ्यांना घडवणार्या आदर्श शिक्षक ( Teacher ) अंकुश नथुराम जाधव यांच्याविषयी...
भंडारा : आपल्या रोजच्या वापरात मोबाईल ( Mobile ) ही आवश्यक अशी बाब झाली आहे. प्रत्येकाचे जीवन हे मोबाईलशी निगडीत आहे. परंतु मोबाईल ही तितकीच घातक गोष्ट असल्याचे सध्याच्या काळात दिसून येत आहे. काही दिवसांपासून मोबाईलच्या स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमध्ये जीवावर बेतण्याचे प्रसंग जास्त प्रमाणात घडून येताना दिसत आहेत. अशीच घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाताना खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाला त्याचा जीव गमवावा लागला आहे.
ठाणे : कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी कार्य करणारे १५१ आदर्श शिक्षक, ३० शिक्षकेतर कर्मचारी आणि ११ आदर्श संस्थाचालकांना आज सन्मानित करण्यात आले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे ( Vasantrao Davkhare ) यांच्या स्मृत्यर्थ आमदार निरंजन डावखरे व भाजपा शिक्षक आघाडी-कोकण विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या पुरस्कारातून गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा सन्मान झाला असल्याची भावना शैक्षणिक वर्तुळातून
( Pravin Darekar ) ’युवा पिढीला मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचा सन्मान आणि गौरव आजच्या काळात कमी झाला आहे. मात्र, ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने अशा घटकांचा सन्मान सोहळा आयोजित केला, यासाठी विशाल कडणे यांचे अभिनंदन!’ असे गौरवोद्गार भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी काढले.
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (आयएमडीपीसीटी) यांच्या वतीने शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून वेगवेगळ्या श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. 'टीचर ऑफ इअर २०२३-२४' या शीर्षकाअंतर्गत वेगवेगळ्या विषयवार शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. उत्कृष्टपणे अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. मुंबई जिल्हा को.ऑप हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विशाल कडणे यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील कार्यरत शिक्षक मान्य
Mangalprabhat Lodha महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध नाविन्यपूर्ण कौशल्य विकसीत केले जात आहे आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत हे या विद्यापीठाचे यश आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
Hindu Students Injustice शाळेत नमाजी टोप्या परिधान केलेल्या चालतात पण कपाळाला लावलेला टीळा पुसायला सांगतात असा दावा विद्यार्थ्याने केला. आयशा नावाच्या शिक्षिकेवर हिंदू विद्यार्थ्यांनी आरोप करत सुनावले आहे. शाळेत नमाजी टोप्या घातल्या जातात मात्र कपाळावर टीळा लावलेला चालत नसल्याची व्यथा स्वत: विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. विद्यार्थ्याचे नाव मयंक असून त्याने शाळेत सुरू असलेल्या प्रकाराबाबत सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील ही धक्कादायक घटना आहे.
विद्या विकास एज्युकेशन सोसायटी व स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व संचालक श्री. प.म. राऊत यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वार्ध्यक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, एक कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शाळेतून ज्ञानदानाचे काम सुरु करून १९६२ साली पंतनगर, घाटकोपर येथे विद्या विकास एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शैक्षणिक कार्यास सुरुवात केली.
राजस्थानमध्ये वनवासी महिलांना हिंदू नसल्याचे शिकवणाऱ्या सरकारी शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. मनेका डामोर असे या शिक्षिकेचे नाव आहे. तिच्यावर राजस्थान आचारण नियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बांसवाडा येथील मानगढ धाम येथे दि. १९ जुलै रोजी आयोजित केलेल्या विशाल रॅलीत मनेका यांनी एका जाहीर सभेत वनवासी महिलांना हिंदू धर्माचे नियम पाळू नका असे सांगितले होते.
हिजाबच्या मुद्द्यावरून एका मुस्लिम महिला शिक्षिकेने कॉलेज सोडण्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. हे प्रकरण राजधानी कोलकाता येथील एका खाजगी विधी महाविद्यालयाशी संबंधित आहे, जिथे या शिक्षकाला हिजाब परिधान करून वर्गात शिकवण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, विरोध झाल्यानंतर तिला ओढणी डोक्यावर घेण्याची परवानगी देण्यात आली. आता तिने पुन्हा कॉलेजला जाणार नसल्याचे सांगितले आहे.
लवकरच विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूका होणार असून मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी घोषित केली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी गुरुवार, १३ जून रोजी ही घोषणा केली.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ जूनला मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजीराव नलावडे यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवार, दि. २८ मे रोजी यासंदर्भात घोषणा केली.
निवडणूक आयोगाकडून पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकांचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून पुढील महिन्यात २६ तारखेला मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे नवे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.
चांगले खेळाडू घडवित असतानाच त्यांना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी लढणारे क्रीडाशिक्षक लक्ष्मण इंगळे त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना निवडणूक आयोगाने राज्यातील कोकण व मुंबई पदवीधर आणि नाशिक व मुंबई शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार १० जूनला मतदान होणार असून १३ जूनला मतमोजणी होईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका आठवड्यातच या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १० जून रोजी ही निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणूकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असून त्यानंतर लगेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट उच्च न्यायालयावरच टिका केली आहे. भारतीय जनता पार्टीने उच्च न्यायालय विकत घेतले आहे असं त्यांनी म्हटलं आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी दिलेल्या निकालावर बोलताना त्यांनी असं वक्तव्य केलं आहे.
समाजाला आणि विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम देण्यासाठी सतत धडपडत असणारे शिक्षक हेमंत नेहते यांच्या विषयी...
बिहारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानंतर शिक्षकांना यावेळी ईदची सुटी मिळणार नाही. बिहारच्या शिक्षकांना होळीलाही सुट्टी देण्यात आली नव्हती. शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.के.पाठक यांनी जारी केलेल्या आदेशात दि. ८ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान निवासी प्रशिक्षण होणार आहे, तर ईद ११ एप्रिल रोजी येत आहे. त्यांचा सण पाहता निवासी प्रशिक्षणाची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम धर्मीय शिक्षक करत होते.
राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या व शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघ मागील ४० वर्षांपासून दरवर्षी राज्यस्तरीय वार्षिक शैक्षणिक कृतिसत्र भरवत असते. यंदाचे ४१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक कृतिसत्र शनिवार दि. २० व रविवार दि २१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटीचे के. आ. बांठीया माध्यमिक विद्यालय व एन. एन. उच्चमाध्यमिक विद्यालय, नवीन पनवेल, जि. रायगड येथे संपन्न होणार असल्याचे संघाचे उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.
कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून सरकारवर सतत ताशेरे ओढण्याचे काम सुरू होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचीच पोलखोल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात कंत्राटी शिक्षक भरतीला मान्यता देण्यात आली. हे संपूर्ण पाप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठा सरकारचं आहे. कंत्राटी शिक्षक भरतीवर बोलताना यांना लाजा कशा वाटत नाहीत. असा हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे.
राज्यात मुख्यत: गृहविभागात, महसूल विभागात, आरोग्य विभागात आणि शिक्षण विभागात सर्वाधिक सरकारी नोकऱ्या निर्माण होतात. यानंतर मुंबई महापालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही नोकरभरती होते. मुंबई महापालिकेतच १९९० च्या आसपास मुंबई महानगर पालिकेत दीड लाख कर्मचारी काम करत. यानंतर ही संख्या अशीच वाढत जाईल, अशी अपेक्षा होती. २०२२च्या आकडेवारीनुसार, मुंबई पालिकेत ९७ हजार इतकेच कर्मचारी शिल्लक आहेत. मंजूर पदांची संख्या एक लाख वीस हजारांच्या आसपास आहे. म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत ५० हजार कर्मच
मिखील मुसळे दिग्दर्शित ‘साजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची फौज काम करताना दिसणार आहे. यात अभिनेता सुबोध भावे वेगळ्या पठडीची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका शिक्षिकेच्या अर्थात सजनी शिंदेच्या जीवनात एक प्रसंग घडतो आणि ती गायब होते, त्यानंतर चित्रपटात अनेक रहस्यमय घटना घडतात असे या चित्रपटाचे कथानक आहे. शिक्षकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल ‘महाएमटीबी’शी बोलताना अभिनेता सुबोध भावे म्हणाला की, “सामान्य माणसांप्रमाणेच प्रत्ये
पुण्यातल्या एका आयटी कंपनीत नोकरी ते अभिनयाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेला हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे हा शाळेत अतिशय मस्तीखोर मुलगा होता याची कबूली त्याने स्वत:च दिली आहे. 'साजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ' या त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना सुबोध म्हणाला की, “आत्ता तुम्हाला दिसणारा मी आणि शाळेतला मी या दोन्ही वेगळ्या व्यक्ती होत्या. कारण शाळेत मी प्रचंड मस्तीखोर होतो आणि त्याचमुळे शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाचा मी मार खाल्ला आहे”. 'बालगंधर्व', 'कट्यार काळजात घुसली', '
मुंबईसह राज्यातील शिक्षकांचे व शिक्षणक्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेत मुंबई विभागातून शिक्षक असलेला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी शिक्षकांची नोंदणी होणे आवश्यक असून शिक्षकांच्या भवितव्यासाठी शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त ५ सप्टेंबर, २०२३ रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
‘बीएड’ पात्रताधारक उमेदवार हे प्राथमिक शाळेत शिकवण्यासाठी पात्र ठरत नसल्याचा निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्राथमिक व माध्यमिक स्तरासाठीच्या व्यावसायिक पात्रता भिन्नच राहतील, यावर नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी ‘राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदे’च्यावतीने २०१८ मध्ये प्राथमिक स्तरावर ‘डीएड’ पदविकेसोबत ‘बीएड’ उमेदवार शिक्षक म्हणून निवडले जाऊ शकतात, अशी अधिसूचना जारी केली होती.
गुजरातमधील वडोदरा येथे रामायणाला 'बनावट' संबोधून भगवान हनुमानाच्या मूर्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील एक विद्यार्थी हनुमानजींच्या दर्शनासाठी गेला होता, त्यामुळे तो शाळेत येऊ शकला नाही. यावर शाळेतील शिक्षकाने रामायण आणि हनुमानाबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलल्या. हिंदू संघटनांनी याचा निषेध करत आरोपी शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.
पुण्यातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे बंद केल्यामुळे येथील एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सहा उपनगरीय रूग्णालयांमध्ये 'डीएनबी' (डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड प्रोग्राम ) अभ्यासक्रमाकरिता शिक्षक पदांची भरती होणार आहे. या पदांसाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली असून १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे. महानगरपालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात अर्ज उपलब्ध आहेत. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.
राज्यातील मशिक्षकांच्या रिक्त पदापैकी ३० हजार पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. तसेच, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २२ फेब्रुवारी, २०२३ ते २३ मार्च,२०२३ या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली असून, परीक्षेमध्ये उमेदवारांस प्राप्त गुणांकनाच्या आधारे राज्यात अंदाजे ३० हजार शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एकलव्य मॉडल रेजिडेंशियल स्कूलमध्ये विविध पदांसाठी तब्बल ३८ हजार ४८० पदांची भरती काढली जाणार आहे.प्राचार्य, उपप्राचार्य, कला-संगीत शिक्षक, पदव्युत्तर शिक्षण आणि अन्य जागांसाठी ही भरती आहे. पण अजून अर्ज करण्याची तारीख जाहीर करण्यात आली नाही. यामध्ये १८ हजार ते अडीच लाख रूपयांपर्यत अंदाजे पगार मिळू शकतो.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने उत्तर प्रदेशातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आपल्या मूळगावी उन्हाळी सुट्टीत जाता यावे याकरिता शिक्षक विशेष ट्रेन सोडण्यात यावी याकरिता रेल्वे प्रशासनाशी दिनांक २०.मार्च पासून पत्रव्यवहार करण्यात आले असून दिनांक २१ एप्रिल रोजी शिक्षक स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे.
शाळांची संचमान्यता ही विद्यार्थी संख्येवर आधारित असते. त्यामुळे एकूण विद्यार्थी आणि त्यासाठी आवश्यक शिक्षकांची संख्या लक्षात घेण्यात आली आहे. तरीही सध्याची रिक्त पदे लक्षात घेता शिक्षक पद भरतीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबईतील मतदानास पात्र शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांची मागणी मान्य झाली आहे
प्रा. राजेंद्र महाजन हे व्यासंगी कलाशिक्षक जसे आहेत, तसे ते सृजनशील दृश्यकलाकार म्हणून अधिक रमणारे व्यक्ती आहेत. प्राचार्य महाजन सरांच्या माध्यमातून आणखी एका स्थायी शिक्षकाची संख्या, महाराष्ट्रातील कलाध्यापकांच्यातून कमी होणार आहे. वैयक्तिक प्रा. राजेंद्र महाजन यांच्या कलाध्यापनातील विविध कंगोरे शोधण्याबरोबरच त्यांच्या कलोपासनेतून साकारलेल्या कलाकृतींबद्दल मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या माध्यमातून गेली तीन वर्षे सातत्याने ५० टक्के केंद्रप्रमुख पदे पदोन्नतीने भरण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. या प्रयत्नांना यश आले असून आता शासन मान्यता मिळाल्याने राज्यभरातील विविध जिल्ह्यांत शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर शालेय शिक्षण विभागाने ५० टक्के पदोन्नतीने व ५० टक्के विभागीय स्पर्धा परीक्षेने पदे भरण्याचे निश्चित केले आहे.
आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने एकूण ५० शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. नावे जाहीर करण्यात आलेल्या शिक्षकांना येत्या काही दिवसांमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे. सोमवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
भारतीय जनता पार्टीचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक दिनाच्या मुहूर्तावरच जिल्ह्यातील ढिसाळ शिक्षण व्यवस्थेची पोलखोल केली
शाळा-महाविद्यालयाच्या प्रांगणात पाऊल टाकताच वर मान उचलून पाहण्याची हिंमत न करणारा शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण कसा करू शकणार? या व्यवस्थेने त्याला मूकबधिर करून टाकले आहे. कान असून ऐकायचे नाही, डोळे असून पाहावयाचे नाही. संस्थाचालकांचे सर्व प्रकारचे शोषण निमूटपणे सहन करायचे. त्यांच्या गैरवर्तनाविषयी चकार शब्दही बोलायचा नाही. आजच्या शिक्षक दिनी शिक्षणक्षेत्रातील शिक्षकांच्या अवस्थेचा घेतलेला आढावा व त्यांना केलेले आवाहन...
१४ विद्या, ६४ कलांमधील ‘भाषाज्ञान’ ही एक महत्त्वपूर्ण कला अवगत असलेल्या, ‘अॅक्मी एज्युकेशन’च्या सर्वेसर्वा आणि भाषाविषयक महत्त्वपूर्ण कार्य करणार्या दीप्ती गोरे यांच्याशी गप्पा..