( Thane Zilla Parishad ) ठाणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हयात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण काम हाती घेण्यात आले असून आरोग्य विभागाच्या वतीने ३ हजार २६१ पाण्याचे स्त्रोत तपासले जाणार आहेत. ही मोहीम महिनाभर सुरू राहणार असून त्यानंतर ग्रामपंचायतींचे वर्गीकरण करण्यात येणार आहे.
Read More
गेले वर्ष हे मानवी इतिहासातील सर्वात तप्त वर्ष ठरले. पृथ्वीवरील वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे जगभर तापमानवाढीची समस्या जाणवत आहे. पण, पर्यावरणातील या बदलांमध्ये मानवी जीवनशैलीचा सर्वात मोठा हात आहे, ही गोष्ट चिंताजनक. जगातील विकसित देशांनी गरीब देशांच्या साधनसंपत्तीची लूट करून, आपले समाज विकसित केले. ते करताना पर्यावरणाचा समतोल बिघडविला. त्याचे परिणाम आता संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत.
रिझर्व्ह बँकेने असुरक्षित कर्जाच्या नवीन नियमावली बनवण्यासाठी लाल कंदील दिला आहे.अजून अभिप्रेत नसलेली अशी परिस्थिती न उद्भवल्यामुळे आरबीआयने आहे त्याच नियमावलीला पुढे ठेवायचे काम केले आहे.ही माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेला आरबीआयच्या सुत्रांनी दिल्याची बातमी रॉयटर्सने दिली आहे
' टाईम्स ऑफ इंडिया ' ला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अदानी यांच्यावरील 'Stock Manipulation' वर आधारित गुप्त अहवाल ईडीने सेबीकडे सुपूर्त केला आहे. त्यातील माहितीनुसार, फॉरेन पोर्टफोलिओ इनव्हेसटर्स (FPI's) सगट खाजगी क्षेत्रातील भारतीय बँकांच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी हा रिपोर्ट असल्याचे समजते आहे. टाईम्स ऑफ इंडियाचा बातमीनुसार या १५ ते १६ संस्थांशी निगडित व्यवहारांचा लेखाजोखा सेबीकडे पाठवण्यात आला. ईडीकडे PMLA ( Prevention of Money Laundering) या गुन्ह्याखाली कारवाई करण्याचा अधिकार नसला तरी अनैतिक
नुकत्याच सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’अंतर्गत १९ हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद केली. तसेच भारतीय रेल्वेनेही लवकरच ३५ मार्गांवर हायड्रोजन रेल्वे धावणार असल्याचे जाहीर केले. त्यानिमित्ताने ‘ग्रीन हायड्रोजन’ या पर्यायी इंधनस्रोताविषयी संशोधक हर्षल अगरवाल यांच्याशी बातचित करुन या ऊर्जास्रोताची उपयोगिता आणि त्यासंदर्भातील आव्हाने याविषयीची ही सविस्तर मुलाखत...
नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे की, जगात सर्वात मोठ्या प्रमाणात भूजल पातळी ही उत्तर भारतात कमी होते आहे आणि त्याचे केंद्रबिंदू दिल्ली आहे. त्यानिमित्ताने भारतीय भूजलाच्या या गहिरे होणार्या संकटाविषयी...