जिज्ञासेच्या पाऊलवाटांवरून... जीवनाची गती विलक्षण वेगाने जात असते, त्या गतीशी जुळवून घेताना जीवन कधी एकसुरी होते ते कळत नाही. जीवनातील हा एकसुरीपणा टाळण्यासाठी, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन निकोप हवा. काहीतरी शिकण्याची जिज्ञासा मनी असल्यास आयुष्य बरेच ज्ञान देऊन जाते, त्यासाठी जीवनाची कवाडे खुली ठेवावी लागतात...
Read More
खरेच ऋतूंची फुले होतात की फुलांचे ऋतू असतात? प्रश्न पडलाय का की ठराविक महिन्यामध्येच फुले का फुलतात? या सगळ्याचे कुतूहल शमवणारा हा लेख...
केवळ देवदर्शनाला शुचिभूर्त होऊन चाललेल्या ललनेचे हे वर्णन नाही, तर शांताबाई शेळके यांनी चक्क बरसणार्या त्यातही श्रावणातल्या सरीचे वर्णन व सरीच्या धरतीवर कोसळणार्या नृत्य प्रकाराला चक्क ‘लावणी’ नाव देऊन ‘लावणी श्रावणाची’ या गाण्यात चक्क लावणी सादर केली.
निरनिराळ्या देशातील कालगणना निरनिराळ्या आहेत. काही सूर्याच्या भ्रमणावर आधारित, तर काही चंद्राच्या भ्रमणावर. ऋतू हे सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून आहेत. सूर्याचे एक वर्ष ३६५ दिवसाचे, तर चंद्राचे वर्ष ३५४ दिवसांचे आहे. त्यामुळे आपल्या भारतीय कालगणनेत २५-३० महिन्यांनी एक अधिक महिना घेऊन याचे एकत्रीकरण केले आहे. मात्र, मुसलमानी कालगणना पूर्णपणे चंद्रावर अवलंबून आहे. आपला भारतीय दिवस, वार सूर्योदयानंतर सुरू होतो, तर इंग्रजी कालगणनेत तो रात्री १२ नंतर सुरू होतो, तर मुस्लीम कालगणनेत तो सूर्यास्तानंतर सुरू होतो.