संत एकनाथ महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी २०१८ पासून देण्यात येणारा ' भानुदास एकनाथ पुरस्कार' यंदाच्या वर्षी संत साहित्याचे अभ्यासक व संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांना देण्यात येणार आहे. दि. २१ मार्च रोजी पैठण इथल्या नाथमंदिर परिसरातील संत नरहरी सोनार महाराज धर्मशाळेत हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पैठणकर, वारकरी व नाथभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन योगिराज महाराज गोसावी यांनी केला आहे.
Read More
खरुजचा उल्लेख संत एकनाथ महाराजांच्या भारुडातदेखील आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आजार. कारण, हा संसर्गजन्य आहे. व्यवस्थित उपाय न केल्यास ही खरुज कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये पसरण्याची शक्यता असते. शाळेतील एका मुलाला खरुज असल्यास त्याद्वारे ती वर्गातील सर्व मुलांमध्ये पसरु शकते. गलिच्छ वस्तीत राहणारी मुले, ग्रामीण भागातील मुले, म्युनिसिपल शाळेतील मुले यांच्यामध्ये खरुजचे प्रमाण अधिक आढळते. स्वच्छतेचा आभाव व व्यवस्थित उपचार न घेणे यामुळे हा आजार बराही होत नाही व त्याचा संसर्ग इतरांना हो
या संत एकनाथ महाराजांनी रचलेल्या ओव्या महती सांगतात, त्या श्रीदत्तात्रेयांची. कार्तिक महिन्यातील अमावस्या संपल्यानंतर पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू होतो. याच मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीदत्तात्रेयांचा जन्म झाला. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी या महिन्याला महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला भगवान श्रीदत्तात्रेयांचा जन्मदिवस हा सर्वत्र ‘श्रीदत्त जयंती’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आज दत्तस्मरण करुया...
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील चिह्नसंकेतांचा परिचय करून घेतल्यानंतर संत एकनाथांच्या लिखित साहित्यातील चिह्न आणि चिह्नसंकेतांचा अभ्यास आता करायचा आहे. त्याआधी आपण त्यांच्या वैविध्याने नटलेल्या साहित्याचा थोडक्यात परिचय करून घेणे आवश्यक आहे.