अवघ्या सहा महिन्यांत तिसऱ्यांदा, १७ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञानंधा रमेशबाबूने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. 'एफटीएक्स क्रिप्टो कप, चॅम्पियन्स चेस टूर'च्या अमेरिकन फायनलमध्ये, मियामीमध्ये सोमवारी दि. २२ ऑगस्ट रोजी प्रज्ञानंधा रमेशबाबूने हा विक्रम केला. या वर्षी मे महिन्यात प्रज्ञानंधा रमेशबाबूने चेसबल मास्टर्स ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेत मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता.
Read More