अभिनेता अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा २' चित्रपटाने २०२४ हे वर्ष विशेष गाजवलं. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या या चित्रपटाला एका महिलेच्या मृत्यूमुळे गालबोट देखील लागलं होतं. आता असाच प्रकार अभिनेता रामचरण याच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटाबाबत घडलं आहे. राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या एका इव्हेंटनंतर अशीच दुर्दैवी घटना घडली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Read More
दाक्षिणात्य सूपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ - द रुल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच १०० कोटींचा गल्ला पार केला होता. त्यानंतर चित्रपटाने अवघ्या कमी कालावधीत १००० कोटींचा पल्ला बॉक्स ऑफिसवर पार करत भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे.
सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपाटांचे रेकॉर्ड मोडले. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात १०६२ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमध्ये विशेष प्रिमियर आयोजित करण्यात आला होता ज्याच्यासाठी अल्लू अर्जूनसह रश्मिका मंदाना आणि इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी चाहत्यांनी अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात एका महिलेला जीव गमवावा लागला होता.
२०२४ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली. अवघ्या काही दिवसांनी २०२४ हे वर्ष संपेल आणि २०२५ हे वर्ष नव्याने मनोरंजनासाठी सज्ज होईल. जाणून घेऊयात २०२४ या वर्षात कोणत्या टॉप १० चित्रपटांनी तुफान कमाईसह प्रेक्षकांची मने जिंकली. ‘सॅकलिंक’ने २०२४ वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमांची यादी दिली आहे. यात हिंदीतील ४ तर आणि ६ दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे.
अभिनेता अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटामपळे चांगलाच चर्चेत आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. जगभरात या चित्रपटाने ७ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे अल्लूच्या 'पुष्पा २' ची चर्चा सुरु असून दुसरीकडे तो लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशाही चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, यावर आता अभिनेत्याच्या टीमने स्पष्टीकरण दिले आहे.
'पुष्पा २ : द रुल' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैदराबाद मधील संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत २ जणांचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि आता त्यावर तेलंगणा पोलिसांनी कारवाई करुन अल्लु अर्जुनला ताब्यात घेतले आहे.
९० च्या दशकातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा आवडता सुपरहिरो म्हणजे ‘शक्तिमान’. अभिनेते मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान आजही पुन्हा पाहावासा वाटतो. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ‘शक्तिमान’ हा चित्रपट येणार असे सांगितले जात आहे. पण नेमकी यात शक्तिमान कोणी साकारावा यावरुनही वेगळा वादंग आणि चर्चा सुरु आहे. पण मुकेश खन्ना यांनी स्वत:च दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याचे नाव सुचवले आहे.
‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटामुळे दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन प्रेक्षकांचा आवडता अभिनेता झाला आहे. 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडित काढून नवा इतिहास रचला आहे. दरम्यान, जितका या चित्रपटात अल्लू अर्जूनचा अभिनय गाजला त्याच प्रमाणे अभिनेता फहाद फालिसच्याही अभिनयाची तितकीच चर्चा झाली. पण या चित्रपटातील त्याची भूमिका कदाचित फारशी प्रेक्षकांना आवडली नसल्यामुळे अशी माहिती मिळत आहे की फहाद फासिल 'पुष्पा ३'मध्ये दिसणार नाही.
बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांच्या मनावर सध्या एकाच चित्रपटाने अधिराज्य गाजवलं आहे तो म्हणजे अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २' या चित्रपटाने. देशभरात ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १०० कोटींच्या पुढे कमाई करण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांनी दिलेला दणकून प्रतिसादामुळे ‘पुष्पा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे नवे रेकॉर्ड तयार करत इतिहास रचला आहे.
अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २'ची सध्या देशभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. एकीकडे प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मात्र, दुसरीकडे चित्रपटाच्या शोदरम्यान काही दुर्घटना देखील घडल्या आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. यावरुन अभिनेता अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला असून या सर्व प्रकरणावर अल्लू अर्जुनने मौन सोडलं आहे.
सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ ( Pushpa 2 ) हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अल्लू अर्जूनने प्रमुख भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांनीही महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. जाणून घ्या नेमका चित्रपट आहे तरी कसा..
मुंबईतच नाही तर संपूर्ण देशभरात सध्या पुष्पाचीच हवा आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनित पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून दुसरीकडे मात्र अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनापुर्वी ४ डिसेंबरच्या संध्याकाळी हैदराबादमध्ये विशेष प्रीमियर झाला होता. यावेळी अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि चित्रपटाची टीम त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह हैदराबादच्या संध्या चित्रपटगृहामध्ये च
सध्या चित्रपटसृष्टीत एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे पुष्पा २ : द रुल ची. ५ डिसेंबर २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत १८६.२७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळवला आहेच पण त्यासोबत अनेक ठिकाणी राडे झालेले पाहायला मिळाले आहेत.
भुरळ पाडणारे संवाद आणि ‘बिग बजेट’ चित्रपटांचे अलौकिक उदाहरण
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिकपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला होता. पण आता या चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे विकी कौशलच्या छावा चित्रपटाची टक्कर अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ सोबत होणार आहे.
देशात सध्या लोकसभा निवडणूकीचीच गडबड सुरु आहे. २० मे २०२४ रोजी लोकसभा निडणूकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा (Loksabha Elections 2024) संपन्न होणार आहे. शिवाय आयपीएल देखील दुसरीकडे सुरु आहे. याचा परिणाम मात्र चित्रपटसृष्टीला थोड्याफार प्रमाणात भोगावा लागणार आहे. मे महिन्याची सुट्टी असल्यामुले प्रेक्षक कुटुंबासह चित्रपट पाहायला जाणार असतील खरे पण तेलंगणामध्ये चक्क १० दिवस चित्रपटगृह बंद असणार आहेत.
अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा १’ आणि ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. पहिल्या भागाच्या अप्रतिम यशानंतर दुसरा भाग कधी येणार याची चाहते वाट पाहात असतानाच ‘पुष्पा २’ (Pushpa 2) ची घोषणा झाली. यानंतर अल्लू अर्जूनचा थक्क करणारा पहिला लूक समोर आला होता. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक अवाक् करणारी बातमी समोर आली आहे. या चित्रपटातील प्रसंगांसाठी चक्क ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीवर दाक्षिणात्य चित्रपटांचा आणि कलाकारांचा पगडा अधिक वाढत चालला आहे. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पुष्पा चित्रपट आणि अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun). “पुष्पा राज... मैं झुकेगा नहीं साला” म्हणणाऱ्या अल्लू अर्जुनचे सर्व वयोगटातील चाहते आहेत. आज अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ४२ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात अल्लू अर्जुनबद्दल काही खास माहिती...
दाक्षिणात्य चित्रपटांची सध्या प्रेक्षकांना भूरळ पडली आहे. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली होतीच. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या पुष्पा या चित्रपटाचा सिक्वेल कधी येणार याची चाहते वाट पाहात होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून 'पुष्पा २' चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २०२४मध्ये प्रदर्शित करण्यात येणार असून स्वांतत्र्यदिनाचा मुहुर्त निश्चित करण्यात आला आहे.
'पुष्पा' सिनेमाच्या भरघोस यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन अधिकच चर्चेत आला आहे. कारण त्याच्या 'पुष्पा' चित्रपटानं संपूर्ण भारताला वेड लावलेलं पहायला मिळालं.