पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ संपल्यामुळे संसद १० ऑगस्टला भंग करण्यात आली. संसद भंग केल्यानंतर तीन दिवसांच्या आत पाकिस्तानच्या सरकारला काळजीवाहू पंतप्रधानाची नियुक्ती करायची असते. पण आता पाकिस्तानमध्ये काळजीवाहू पंतप्रधानावरुन राष्ट्रपती आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात वाद सुरु झाला आहे.
Read More
पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात झाला असून या अपघातात २२ जण ठार तर ८० प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, कराचीहून रावळपिंडीला जाणारी हजारा एक्स्प्रेस रुळावरून घसरली त्यामुळे ही रेल्वे दुर्घटना घडली आहे. तसेच, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे. रावळपिंडीहून धावणाऱ्या हजारा एक्सप्रेसचे दहा डब्बे रुळावरून घसरल्यामुळे सहारा रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली आहे. सहारा रेल्वे स्टेशन हे शहजादपूर ाणि नवाबशाह यादरम्यान आहे.
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात राजधानी इस्लामाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इम्रानला आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.
ही परिषद आणखी एका कारणाने चर्चेचा विषय ठरली. ते म्हणजे पाकिस्तानच्या पंतप्रधानांची झालेली जाहीर फजिती. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू असताना हा सर्व प्रकार घडला. विशेष म्हणजे, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या या फजितीवर पुतिन यांना हसू आवरणेदेखील कठीण झाले होते
पाकिस्तानच्या शांततेच्या इच्छेमागे दुसरा कुठला तरी डावही असू शकतो. पाकिस्तान विश्वास ठेवण्यालायक देश नाही, त्यामुळे आता शांततेचा मुद्दा उपस्थित करून त्या देशाचा भारताविरोधात कटकारस्थान करण्याचाही हेतू असू शकतो. म्हणजे, शांततेची चर्चा करायची, त्यातून स्वतःचे चांगले रुप पेश करायचे, जगभरातून निधी लाटायचा, पण तो पैसा देशाच्या उन्नतीसाठी नव्हे, तर पुन्हा भारताविरोधातच वापरायचा, अशी काही पाकिस्तानची योजना असू शकते.