Kisan Kathore : समृद्धी महामार्ग सोबत जोडला गेला अन् मुरबाड आणि बदलापूर हा जिल्हा समृद्ध झाला... मात्र, आपल्या मतदार संघात एकही रस्ता हा डांबरी राहू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार किसन कथोरेंनी झपाटून कामाला सुरुवात केली. आपल्या प्रयत्नाने राज्यातील पहिला डांबरमुक्त मतदार संघ म्हणून मुरबाडची ओळख होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Read More
एका उत्तुंग सुळक्यावर बांधलेला लिंगाणा किल्ला. त्याचं पठडीतला आणि ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात बसलेला उत्तुंग गिरीदुर्ग म्हणजे गोरखगड! लिंगाण्याप्रमाणेच याची बांधणी एका बेलाग सुळक्यावर केलेली. गोरखगडाला मच्छिंद्रगड नावाचा जोडदुर्ग असून त्यावर किल्ल्याची अथवा दुर्गस्थापत्याची कोणतीही निशाणी नसल्याने गिर्यारोहकांसाठी तो मच्छिंद्र सुळकाच आहे.
लोकसेवक म्हणून काम करताना राजकीय परिघात राहूनही सातत्याने स्वतःच्या प्रामाणिक विचारधारेची कास धरत, सामाजिक बांधिलकीची नाळ अंगीकारत, सामान्य माणसाच्या अखंड सेवेसाठी स्वतःला वाहून घेत सर्वव्यापी शास्वत विकासाची तळमळ असणारे व्यक्तिमत्त्व, ठाणे जिल्ह्यातील ‘विकासपुरूष’ म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो, असे सर्वसामान्यांचे जनसेवक, लोकनेते ही बिरूदावली असणारे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे. आज गणेशोत्सवाच्या शुभदिनीच त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी केलेली ही खास बात
समस्त दैवज्ञांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.गजानन रत्नपारखी संस्थपित " गुरुकृपा हार्ट फाऊंडेशन" च्या सौजन्याने व अभादैसपच्या संयुक्त विद्यमाने दि.५ डिसेंबर २०२२ रोजी आश्रम शाळा ,तळवली, मुरबाड येथे संपन्न झाला.सुमारे ६०० कुटुंबांनी याचा लाभ घेतला.
सुडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केल्याचा राजे यांचा दावा
कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड हद्दीतील माळशेज घाटाच्या दुरुस्तीकरिता दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही सदर घाटरस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
मुरबाड नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रामभाऊ दुधाळे यांची निवड होताच त्यांनी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांची शासकीय जाचातून सुटका करण्यासाठी हे अभियान हाती घेतल्याने नागरिकांची नगर पंचायतीमधील परवड थांबून कामे सोपी झाली आहेत.
प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करीत मुरबाडच्या दुर्गम गावातून थेट ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या राज जयश्री संजय खंडागळे या युवकाचा प्रेरणादायी प्रवास...
सरकारने पुनश्च ‘हरिओम’ म्हणत, ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू केले असले, तरी ‘लॉकडाऊन’चा भयावह प्रवास अजून संपलेला नाही. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडील आरोग्य यंत्रणा खूप तोकडी असल्याचा अनुभव सध्या येत आहे. कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी धडपड करण्याचे काम भाजपचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर (रामभाऊ) पातकर यांनी केले आहे. त्यांनी ‘कोविड’काळात केलेल्या कामाचा हा आढावा.
कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्या प्रत्येक निराधार व बेघर नागरिकांना मदतीचा हात भाजप ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांनी दिला. समाजातील शेवटचा घटक आपल्या मदतीपासून वंचित राहणार नाही, यांची काळजी कथोरे यांनी कायम घेतली. त्यांच्या कोरोनाकाळात घेतलेल्या मदतीचा आढावा.
वन विभाग आणि 'राॅ' प्राणिप्रेमी संस्थेचा पुढाकार
‘लॉकडाऊन’मुळे जगभरातील प्रमुख शहरांसह देशाची आर्थिक राजधानी, मायानगरी मुंबईही ओसही पडली. पण, कोणे एकेकाळी अशाच ओसाड मुंबईला आकार दिला तो नाना शंकरशेठ यांनी... तेव्हा, मुंबईचे शिल्पकार, शैक्षणिक कार्यात ज्यांनी अमूल्य योगदान दिले, त्या नाना शंकरशेठ यांचे स्मरण करुया...
मुरबाडच्या म्हसा यात्रेत ठरताहेत आकर्षणाचे प्रमुख केंद्र
विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे बारामतीचे उमेदवार अजित पवार यांनी भाजप उमेदवार गोपिचंद पडळकर यांचा १ लाख ४९ हजार मतांनी पराभव केला त्यानंतर हा रेकॉर्ड ब्रेक विजय मानला जात आहे. मात्र, भाजप आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदूराव यांचा तब्बल १ लाख ६७ हजार ८५९ मतांनी पराभव केला आहे.
मुंबईला लागून असलेले पण जवळपास ८० किमी. दूर असलेले ग्रामीण भाग आजवर नेहमी विकासकामांपासून दूर राहिलेले. मुंबईच्या ईशान्येला असलेला मुरबाड मतदारसंघ तर बोलून चालून आदिवासी-वनवासीबहुल मतदारसंघ.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकूण सात उमेदवार उभे असले तरी खरी लढत ही किसन कथोरे व प्रमोद हिंदुराव यांच्यात होणार, असे दिसून येत आहे.
मुरबाड तालुक्यात सावरणे गावामध्ये बुधवारी पहाटे बिबट्याचे ६ ते ८ महिन्याचे मादी पिल्लू मृत्यावस्थेत आढळले. स्थानिक वन विभागाचे कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून आईविना वावरणाऱ्या या पिल्लावर नजर ठेवून होते.
ग्रामस्थ व वनविभागाच्या प्रयत्नांना यश
म्हसोबा यात्रा विशेष : २०० वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्रातील प्रसिद्ध म्हसोबा यात्रा
अंबरनाथमध्ये आ. किसन कथोरे यांनी प्रशस्त प्रशासकीय भवन उभारून राज्यात नवा आदर्श घडविला होता. हीच क्रिया त्यांनी मुरबाडमध्ये करावी, अशी सर्वांचीच इच्छा होती. मुरबाडकरांची ही इच्छा कथोरे यांनी पूर्ण केली आहे.
मुरबाड येथे शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या संपर्क व संवाद सभेला कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला
घाट बंदीमुळे भाजीपाला महागला! ५० तास उलटून गेले तरी अजूनही दगड उचलन्याचे काम सुरु ! पावसाचा व धुके यांचा मोठा अडथळा
आधारकार्ड शासनाने सर्वांना बंधनकारक केले आहे. शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तरी आधार, बँकेत खाते उघडायचे असेल तरी आधार, वयोवृद्धाला बस प्रवासात सवलत पाहिजे असेल तरी आधार, परंतु आधारकार्ड काढण्यासाठी केंद्र सुरू नसल्याने या लोकांवर निराधार होण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्रात राज्य शासनाच्या विविध विभागाच्या कर्मचाऱ्या नी आपल्या मागण्यांसाठी तीन दिवसांचा राज्यव्यापी संप जाहीर केला आहे
एक हात मदतीचा उपक्रम अंतर्गत मतिमंद निवासी विद्यालय, मुरबाड येथील मुलांकरिता ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
गावांना मुरबाड-कल्याणकडे जाणार्या कामगार, विद्यार्थी यांना मासले-बेलपाडा या गावातुन जावे लागत आहे.
वर्षभरातील घाटातील आपघात व निकृष्ट दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कामे पाहाता पावसाळ्यात नेमके घाट काय आव्हान पेलवणार, याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत.