सोलापूर रेल्वे स्थानकात घोरपडीच्या गुप्तांगाची विक्री करण्यासाठी आलेल्या शिकाऱ्यांना वन विभागाने रविवार दि. २ मार्च रोजी ताब्यात घेतले (monitor lizard trafficking). चौकशीअंती यापूर्वी या आरोपींनी जवळपास १ हजार घोरपडी मारल्याचे पुराव्यानिशी समोर आले आहे. (monitor lizard trafficking)
Read More
हिमालयाच्या पर्वंतरांगांमधून वाहणार्या सुबानसिरी नदीच्या खोर्यामधून सरड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (Calotes sinyik). या प्रजातीचे नामकरण कॅलोटस सिनिक (Calotes sinyik), असे करण्यात आले असून ही प्रजात दिनचर आहे. (Calotes sinyik)
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यातून दि.१८ जून रोजी एका शिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जंगलातून घोरपड पकडून तस्करी साठी घेऊन जात असताना या शिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर वनविभागाने ही कारवाई केली आहे.
साताऱ्यातील कुमठे गावामधून घोरपडीची शिकार केल्याबद्दल दोन आरोपींना दि. ९ मे रोजी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाकडून आरोपींना चार दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
पालींच्या काही दुर्मिळ प्रजातींचा नव्याने शोध लागला आहे. शरीरावर उंचवटे, गोल बुबुळ आणि भरपूर खवले असणाऱ्या पालींच्या दुर्मिळ प्रजाती शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी अशा तीन दुर्मिळ पालींचा शोध लावला आहे. जर्मनीमधून प्रकाशित होणाऱ्या ‘व्हर्टब्रेट झुलॉजी’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचा यासंबंधीतील शोध निबंध प्रकाशित झाला आहे.
महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी अरुणाचल प्रदेशामधून सापसुरळीच्या नव्या प्रजातीचा नवीन आणि कुळाचा शोध लावला आहे. अरुणाचल प्रदेशातील आपाटानी या जमातीच्या नावावरून या नव्या प्रजातीेचे नामकरण प्रोटोब्रेफेरस आपाटानी असे करण्यात आले आहे. राज्यातील तरुण संशोधकांनी अरुणाचल प्रदेशात २०१९ साली केलेल्या मोहिमेव्दारे पाच नव्या सरपटणाऱ्या प्रजातींचा शोध लावला आहे.
पश्चिम घाटामध्ये अधिवास करणार्या अनेक दुर्मीळ जीवांपैकी एक जीव म्हणजे उडणारा सरडा. साधारण मध्य आणि दक्षिण पश्चिम घाटामध्ये आढळणार्या या सरड्याची नोंद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातूनही करण्यात आली आहे. जाणून घेऊया या रहस्यमयी उडणार्या सरड्याविषयी...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि संशोधक तेजस ठाकरे यांच्या नावाने एका प्रजातीचे नाव 'निम्यास्पीस ठाकरेइ' असे ठेवण्यात आले आहे.
डापावमध्ये मृत पालीचे पिल्लू आढळून आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथच्या रेल्वे स्थानक परिसरात घडल्याने अंबरनाथवासियांचे धाबे दणाणले आहेत.