डाव्या मंडळींचा एक सुनियोजित ‘अजेंडा’ आहे. देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करायची. ती निर्माण करण्यासाठी बंदुकीतील गोळी म्हणून, अनुसूचित जाती-जमाती आणि मुसलमान यांचा उपयोग करायचा.
Read More
विचारधारेच्या नावाखाली धर्माला नख लावण्याचा प्रयत्न
जेएनयुतील गोंधळ घालणार्या टाळक्या आणि टोळक्यांव्यतिरिक्त दिल्लीत डाव्यांची विचारपूस करणारे कोणीही नसल्याचे स्पष्ट होते. पण असे का व्हावे? बरं, हे फक्त दिल्लीतच नाही, तर गेल्या काही वर्षांचा भारतीय राजकारणातील निवडणुकांचा अभ्यास केल्यास डावे पक्ष नेस्तनाबूत होत असल्याचेच आढळते.
नागरिकता कायद्याबाबत निर्माण करण्यात आलेल्या गैरसमजातून मुस्लीम समुदाय बाहेर पडत असतानाच आता डाव्यांनी या आंदोलनात विद्यार्थी व कामगार यांना उतरविण्याचा प्रयत्न चालविला आहे, हे दिल्लीच्या वादग्रस्त जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार व ८ जानेवारी रोजी डाव्या कामगार संघटनांच्या पुढाकाराने आणि आक्रमक सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या कथित ‘भारत बंद’ यामुळे पुरेसे स्पष्ट झाले आहे.
नव्या सत्रासाठी नावनोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला, सर्व्हर, वायफाय यंत्रणेची तोडफोड
विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणे शक्य व्हावे यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याने आणि त्यास विद्यार्थी प्रचंड प्रतिसाद देत असल्याचे पाहून डाव्या संघटनांचे नेते बिथरले आणि त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्याचे षड्यंत्र रचले.
डाव्यांनी आतापर्यंत जसे भिन्न विचाराला व तशा विचाराच्या माणसांना मारून टाकले, त्यांच्या रक्ताचा सडा शिंपला तेच काम जेएनयुतही करण्याचे नियोजन त्यांनी केले. विचारांचा विरोध विचारांनी न करण्याची डाव्यांची ही तशी वर्षानुवर्षांपासूनचीच परंपरा व रविवारचा विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला त्याचाच नमुना! परंतु, पायाखालची वाळू सरकलेल्या व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी झालेल्या डाव्यांनी अशा हिंसाचारातून आपलेच थडगे बांधण्याचे काम केले आहे.
‘प्रत्येक डाव्या विचारांचा माणूस नक्षलवादी नसतो,’ असे म्हणून सहानुभूती मिळविण्यापर्यंत डावी चळवळ मागे रेटली गेली आहे. आजची कारवाई अनेकांचे बुरखे फाडणारी आहे.
पंतप्रधानांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या हत्येच्या कटाशी संबंधित कागदपत्रांमध्ये या मंडळींची नावे येतात. नेहमीच असे का घडते, यावर चर्चा होण्यापेक्षा यांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डाव्यांच्या हिंसेला पुरोगामी परवाना आहे, असाच याचा अर्थ लावावा लागेल.