पर्यावरणवादी ‘सायकल मॅन’ म्हणून पिंपरी-चिंचवडच्या राजेंद्र चोथे यांची ओळख. अशा या कर्मयोगाचा सिद्धांत प्रत्यक्षात जगणार्या राजेंद्र चोथे यांच्याविषयी...
Read More
कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहा, हा भगवद्गीतेतील उपदेश. पण, बरेचदा प्रत्यक्षात कर्म न करताही फळाची चव चाखण्याची आणि जबाबदारी न स्वीकारण्याची मानवी वृत्ती दिसून येते. म्हणूनच आपण केलेल्या कर्मांपासून ते आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयासाठी आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत, ही भावना स्वीकारणे हे निकडीचे. हे नेमके कसे करावे? त्यामागचे मानसशास्त्र काय सांगते? याचा आढावा घेणारा हा लेख...
नवी दिल्ली : सामाजिक सेवा संस्था ‘माय होम इंडिया’च्या वतीने ११ वा कर्मयोगी पुरस्कार ( Karmayogi Award ) यशस्वीरीत्या संपन्न झाला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह श्री कृष्ण गोपाल यांनी डॉ. विश्वामित्र बत्रा यांना सन्मानित केले.
आपल्या प्रत्येक फोटोतून एक गोष्ट सांगणारे आणि ५० वर्षांचा दांडगा अनुभव गाठीशी असणारे फोटोग्राफर रमेश करमरकर यांच्याविषयी...
निवृत्ती ही मनाला चटकाच लावणारी असते. भारताच्या दोन सुकन्यांनी देखील निवृत्ती जाहीर केली आहे. दीपा करमाकर आणि राणी रामपाल यांनी निवृत्ती जाहीर केली असली, तरी खेळाप्रतीची समर्पण भावना संपवलेली नाही. म्हणूनच त्या आता देशाचे क्रीडा भविष्य घडवण्याकडे जातीने लक्ष देणार आहेत. या दोन्ही कन्यांच्या क्रीडा कारकीर्दीचा घेतलेला हा आढावा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे ‘कर्मयोगी सप्ताह’ – राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा प्रारंभ केला. या कार्यक्रमाच्या अंर्तगत पंतप्रधानांनी मिशन कर्मयोगीच्या यशावर भाष्य केले आणि सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनी अभिनव विचार आणि नागरिक केंद्रीत दृष्टीकोन अवलंबण्याची गरज असल्याचे म्हटले.
'कर्मवीरायण’ शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवण्यासाठी धडपडणाऱ्या एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनपट, महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली असून, अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेला हा चित्रपट आता उद्या म्हणजे १९ जुलै पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
भारताने टी-२० विश्वचषक जिंकला. सर्व सामने जिंकल्याने भारताला पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. भारतीय खेळाडूंनी जगाला जिंकले. असेच जगाला आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडत, जिम्नॅस्टिकसम्राज्ञी नादिया कोमनेसी हिनेही कौतुक करावे, अशी कामगिरी करणार्या दीपा करमाकर आणि तिच्या बार्बी डॉलविषयी या लेखात जाणून घेऊया...
रा. स्व. संघाच्या महाराष्ट्र प्रांतातील प्रमुख प्रचारक व प्रांताचे बौद्धिक प्रमुख असलेल्या गोविंद श्रीधर तथा नानाराव ढोबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने या पुण्यात्म्याचे पुण्यस्मरण करणारा हा लेख...
आदित्य जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचा या चित्रपटाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू-काश्मिरमधूल ‘कलम ३७०’ हटवण्यात आले. या ‘कलम ३७०’ चा स्वातंत्र्यांनंतरचा संपुर्ण ७५ वर्षांचा इतिहास उत्तमरित्या या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेत अभिनेते किरण करमरकर दिसत आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...
नाशिकमध्ये देव, धर्म, देश आणि समाजाच्या उन्नतीसाठी अखंड सेवा आणि जागृती करणारे स्वामी श्रीकंठानंद म्हणजेच कर्मयोगी संन्याशी. त्यांच्या विचारकार्याचा थोडक्यात घेतलेला मागोवा...
महाराष्ट्राच्या मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, समलोचक व माजी क्रीडा संपादक वि. वि. करमरकर यांचे सोमवार, दि. ६ मार्च रोजी निधन झाले. मुंबईतील अंधेरीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वि. वि. करमरकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्ये, तर अर्थशास्त्रात एम.ए.चे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय शैलीवर पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदया’च्या तत्वज्ञानाचा सर्वाधिक प्रभाव आहे. ‘अंत्योदया’मध्ये कोठेही आक्रमकता नाही, जबरदस्ती नाही आणि हिंसाही नाही. त्यामुळेच गरीब कल्याणाचा दावा करणार्या कम्युनिस्ट तत्त्वज्ञानापेक्षाही मोठे सामर्थ्य ‘एकात्म मानवतावाद’ आणि ‘अंत्योदया’त आहे. ‘अंत्योदया’चे प्रतिबिंब गेल्या आठ वर्षांत सरकारी धोरणांमध्ये आणण्याचे श्रेय निश्चितच पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल.
गुण आणि कर्म विभागाने माझ्याद्वारे म्हणजे परमशुद्ध बुद्धीद्वारे चातुर्वर्ण्य रचले गेले आहेत. त्यांचा मी कर्ता असलो, तरी मी त्या कर्तृत्वाच्या वर असलेला परमात्मा आहे. चातुर्वर्ण्य ही एक प्राचीन समाजरचना आहे, जिचा वरील श्लोकाद्वारे गीतेत स्पष्ट उल्लेख आला आहे
कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित ‘पूर्णयोगा’ची मांडणी योगी श्रीअरविंदांनी केली. पूर्णयोग तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याचा प्रयत्न करण्यावर भर आहे. आज महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी श्रीअरविंद यांची जयंती. त्यानिमित्त जाणून घेऊया योगी श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानात्मक विचार व पूर्णयोगाविषयी...
आतापर्यंत आपण कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोगाचे विवेचन पाहिले, तरी सर्व योगाचे उद्दिष्ट अंतिमत: समाधी प्राप्त करणे, आज आपण पतंजलीच्या राजयोगाबद्दल माहिती बघूया. पातंजल योग दर्शनशास्त्राच्या द्वितीय साधनापादामध्ये २९ व्या सूत्रामध्ये याचे वर्णन केले आहे, त्यांच्या ‘अष्टांगयोगा’लाच राजयोग म्हणतात.
योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय आध्यात्मिक शास्त्र आहे. योगशास्त्रामध्ये योगाचे अंतिम उद्दिष्ट समाधी, मोक्षाचे वर्णन केले आहे. तसेच, या अंतिम उद्दिष्टाची प्राप्ती करण्यासाठी अनेक मार्गांचे वर्णनदेखील आहे.
“शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीची केलेली घोषणा म्हणजे ठाणेकरांना ‘विश्वासघाताची वचनपूर्ती’ आहे,” अशी खरमरीत टीका भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सोमवारी केली.
सारे जग झपाट्याने पुढे वाटचाल करीत आहे. कारण, गतिशीलता हा प्रत्येकाचा स्थायी गुणधर्म होय. किंबहुना, हे सारे जगच चलायमान आहे. जिकडे पाहाल तिकडे सर्वांचे येणे-जाणे चालूच आहे. येथे कोणीही थांबलेला नाही. कारण, ‘थांबला तो संपला’ किंवा ‘आराम हराम आहे’ या म्हणी आम्हाला गतिशील होण्याकरिता नेहमीच प्रेरणा देत असतात. पण, अशा या परिवर्तनशील जगात आपले चालणे किंवा गतिमान होणे हे मात्र विधायक असले पाहिजे.
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्यावर आधारित विविध मान्यवरांच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘कर्मयोद्धा राम नाईक’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
रंगकर्मी, लेखक व कवी विद्याधर ऊर्फ आबासाहेब करमरकर यांनी वयाच्या ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रशासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचार्यांची क्षमता वृद्धी आणि त्यांना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून ‘मिशन कर्मयोगी’योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ‘राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगा’च्या (नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन) सदस्यपदाचा कार्यभार मराठी भाषा विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी स्वीकारला आहे.
परदेशी यांचे प्रशासकीय कौशल्य वादातीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगास त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल.
श्रीगणेशाला वंदन। कुलस्वामी मातेला नमन। श्रीगुरूचरणी प्रणिपातून। कथिते विचार
नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन सदस्यपदी प्रवीण परदेशी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे
“मातृत्वाची जबाबदारी आल्यानंतर दोलायमान स्थितीमुळे काही काळ आपणही ‘सी-सॉ’ अनुभवला. तेव्हा, निराश न होता चिकाटीने आपण आपले सर्वस्व कलेला अर्पण करण्याची प्रेरणा आईकडून मिळाली,” अशी जाहीर कबुली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आईची भूमिका साकारणार्या मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांनी दिली.
जनमानसातील, दलित चळवळीतील एक महत्त्वाचे नेते, मुत्सद्दी भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा आज ४९वा स्मृतिदन. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणारा हा लेख...
कोकणात जाणाऱ्यांसाठी दोन विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर २० डिसेंबरपासून मध्य रेल्वेतर्फे मुंबई-करमळी मुंबई-तेजस विशेष आणि मुंबई-मंगळुरू सुपरफास्ट विशेष या दोन आरक्षित गाड्या धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर २० डिसेंबर पासून मध्य रेल्वेकडून ०२११९/०२१२० मुंबई करमळी मुंबई- तेजस विशेष आणि ०११३३/०११३४ मुंबई- मंगळुरू सुपरफास्ट विशेष या दोन आरक्षित गाड्या धावणार आहेत.
कुणाला त्यांच्यासारख्या ज्येष्ठापुढे आता बोलावं तरी काय हेच सुचेना, इतके ऐकणारे मनातून हलले होते! प्रशंसा करायची तरी कशी, शब्द सुचेनात आणि आमचे शब्द केवळ हवेचे बुडबुडे ठरावेत, अशी दाजींची कृती मोठी होती. मी तर धन्य धन्य झाले! इतका निर्लोभीपणा, असा श्रेष्ठ विचार, लगेच व्यवस्थित योजना आखण्यातली तत्परता म्हणजे कृती करण्याची सिद्धता... असा निष्ठावंत आणि नि:स्वार्थी कर्मयोगी साक्षात आपण पाहतोय, या काळात! हा अनुभवच रोमांचित करणारा होता.
भारताची प्रशासकीय चौकट म्हणजेच ‘स्टील फ्रेम’ आता गंजली आहे. गंजलेली कोणतीही वस्तू ही मोठी इजा करीत असते. त्यामुळे या ब्रिटिशकालीन ‘स्टील फ्रेम’चा गंज काढून त्यास नवे रुप देण्याची गरज होती आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन कर्मयोगी’द्वारे एक चांगली सुरूवात केली आहे.
भीषण अपघातात १४ जण जागीच ठार; तर ५ जणांची प्रकृती गंभीर
भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू
आत्मशक्ती ही अनेक संकटांवर मात करून मानवाला विजयी बनवितो. आत्मिक बळाने परिपूर्ण माणूस सार्या जगाचा नेता बनतो. जग त्याच्या मागोमाग धावू लागते. आत्मबलिष्ठ महामानवाचे शब्द जनसमूहासाठी प्रमाण बनतात. याच आत्मशक्तीच्या सामर्थ्यामुळे प्रबळ शत्रूवर मात करता येते.
मागील लेखात सशस्त्र क्रांतिकारक म्हणून सावरकरांविषयी महत्त्वाचे क्रांतिकारक आपल्या भावना कोणत्या शब्दांत व्यक्त करत होते, त्याचा थोडक्यात आढावा घेतला. या भागात आपण त्यांच्या इतर काही पैलूंविषयी काही निवडक मान्यवरांच्या भावना जाणून घेऊ.
डॉ. अशोकराव कुकडे यांचे प्रतिपादन ते ‘परममित्र प्रकाशन’ व ‘दीनदयाळ प्रेरणा केंद्रा’च्यावतीने अरूण करमरकर अनुवादीत रविकुमार अय्यर लिखित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामध्ये बोलत होते
लोकनेते गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान, जालगाव ता. दापोली, जि. रत्नागिरी या संस्थेच्यावतीने कर्मवीर दादासाहेब इदाते यांचा सत्तरी सोहळा आणि ‘कर्मवीर दादासाहेब इदाते सामाजिक समरसता पुरस्कार’ कार्यक्रमाचे आयोजन २ जून रोजी दापोलीला करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त दादा इदातेंच्या शब्दातीत व्यक्तिमत्त्वाचा, कार्याचा घेतलेला हा आढावा...
सचिनने पाड्यांमध्ये सौरउर्जेवर चालणारी उपकरणे आणि दिवे लावण्यास सुरुवात केली. या कामामुळे त्यांची ओळख आता 'सोलारमॅन' अशी झाली आहे.
कर्तृत्व स्वत:कडे घेण्याची चूक बहुतेक सगळे मानव करतात आणि सुख-दु:खावर हेलकावे खात राहतात. कर्माचं कर्तृत्व स्वत:कडे घेतलं की, ते कर्मफळ देतं. याउलट केलेलं कर्म भगवंताला अर्पण केलं की, सगळं सोप्पं होऊन जातं.” भगवंताने सोप्पा उपाय सांगून ग्रंथ, गीता कशी जगायची ते कथन केलं आहे.
पनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले
विशेष म्हणजे दुखापतीमुळे तब्बल दोन वर्षांच्या अंतरानंतर तिने पुन्हा एकदा स्पर्धेत पुनरागमन केले असून पहिल्याच प्रयत्नात तिने सुवर्णपदक मिळवले आहे.
भारतीय राज्यघटना निर्मितीची पार्श्वभूमी, प्रक्रिया आणि औचित्य याविषयी चे लेख पहिल्या अंकात समाविष्ट करण्यात आले होते. दुसर्या अंकात त्यापुढील काही महत्त्वाच्या विषयांचा उहापोह करीत आहोत.
केंद्र सरकारमधील कायदा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री श्री. रविशंकर प्रसाद यांची विशेष मुलाखत,