(Sandip Raut) 'नेत्यांच्या पुढे -पुढे करणाऱ्यांनाच शिवसेना उबाठा पक्षामध्ये पद दिले जाते, शिवसेना उबाठा पक्षामध्ये एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होतो' असा गंभीर आरोप संदीप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांचे सख्खे बंधू संदीप राऊत उर्फ आप्पा राऊत यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. यानंतर काही वेळातच ती डिलीट केल्याचं दिसून आले. मात्र संदीप राऊत यांनी केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत.
Read More
आज तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच समाज माध्यमांचं आकर्षण आहे. हेच ओळखून आजच्या डिजिटल युगात सर्व प्रशासकीय विभाग, मंत्री, राजकीय पक्ष आणि नेते, कार्यकर्ते समाजमाध्यमांमध्ये आपला आवाका वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच माध्यमातून अनेक प्राधिकरण आणि सरकारी कार्यालये नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या थेट हाताळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र क्षेत्रविकास आणि गृहनिर्माण प्राधिकरण (म्हाडा)ने देखील समाजमाध्यमांवर झळकण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे. नागरिकांना थेट सोशलमिडीयाच्या माध्यमातून म्हाडाशी
सोशल मीडिया युजर्सना आज निराशेला समोरे जावे लागले आहे. कारण दि. ५ मार्च रोजी फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालेले आहे. तरी फेसबुक वापरण्यासाठी अॅप ओपन केल्यावर आपोआप फेसबुक अकाऊंट लॉगआऊट होते आहे. तरी काही तांत्रिक कारणामुळे ही समस्या येत असल्याचं बोलल जात आहे. या परिस्थितीमुळे लाखो युजर्सना कोट्यावधींचा तोटा झालेला आहे. तरी युजर्सकडून फेसबुक पुर्ववत चालू होण्याची वाट पाहिली जात आहे.
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेमुळे चर्चेत होते. पण आता रोहित पवारांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईल फोटोलो सिया राजपूत हे नाव असलेले पोस्टर दिसत आहे. दरम्यान रोहित पवार समर्थकांनी खातं हॅक झाल्याचे तिथेच कमेंटमध्ये सांगितले आहे.
इन्स्टाग्राम किंवा फेसबुक या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय असणाऱ्यांना नेहमीच एका गोष्टीचा कंटाळा येतो तो म्हणजे जाहिराती. जर आपण पाहिलं तर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर स्क्रोलिंग करत असताना बऱ्याचदा जाहिराती येत असतात. त्यामुळे युझर्स वैतागतात. यावर मेटा कंपनीकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उत्तम छायाचित्रणकारसुध्दा आहेत हे सर्वांनाच माहित आहे. राजकारणाव्यतिरिक्त हा कलागुण त्यांच्या अंगी आहे. उध्दव ठाकरे यांनी आपल्या करिअरची सुरुवात छायाचित्रणापासून सुरु केली आहे. १८ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिवस म्हणून गणला जातो. छायाचित्रण कलेविषयी सबंध जगाला माहिती मिळावी यामुळे हा दिवस पाळण्यात येतो.
बाहूबली चित्रपटापासून खरं तर प्रेक्षकांच्या मनात घर केलेला तेलुगु अभिनेता प्रभास सध्या अडचणीत आला आहे. प्रभास तसा समाज माध्यमावर फारसा सक्रिय नसला तरीही त्याचे फेसबुक पेज हॅक झाल्याचे सांगण्यात येत आहे. खुद्द प्रभासने ही माहिती दिली आहे. गुरुवारी २७ जुलैच्या रात्री प्रभासचे फेसबुक पेज हॅक झाले असून हॅकर्सनी त्याच्या फेसबुकवरून ‘अनलकी ह्युमन’ आणि ‘बॉल फेल्स अराउंड द वर्ल्ड’ असे दोन व्हिडिओ शेअर केले होते. या घटनेनंतर प्रभासने ट्वीटरवर माहिती देत फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती दिली.
डिजिटल क्रांतीच्या जगात एआयमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून येत आहेत. दरम्यान, मेटाने आता आपले एआय टुल मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, BARD आणि ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी Meta चे नवीन AI टूल लवकरच येणार आहे. मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी इतर अधिकाऱ्यांसह तशा पध्दतीच्या चर्चा सुरु केल्या आहेत. मार्क झुकरबर्ग यांनी मेटाच्या एलएलएमच्या माध्यमातून एआय चॅटबॉट्स विकसित करण्याचा हेतू दर्शविला आहे.
‘भीम आर्मी’ या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर दि. २८ जून रोजी उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला. ते कारने देवबंदला जात असताना अज्ञातांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले. त्यावेळी माझ्यासोबतच्या लोकांनी हल्लेखोरांना ओळखल्याचे आझाद यांनी सांगितले होते. त्यावरूनच पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. अमेठी येथून विमलेश सिंह नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. चंद्रशेखर यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी युवकाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर चक्क एका शिक्षकांने फेसबूक पोस्ट केली म्हणून सिद्धरामय्या यांनी त्या शिक्षकाला निलंबित केले आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसादुर्ग तालुक्यातील शिक्षक शांतमूर्ती एमजी यांनी फेसबुकवर सिद्धरामय्या यांच्यावर टिप्पणी केली. यानंतर शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले फोटो डिलीट केले आहे. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाण्यात महाविकास आघाडीची 'जनप्रक्षोभक यात्रा' सुरु झाली आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेद्र आव्हाड मोर्चात सहभागी झाले आहेत. ठाण्याच्या शिवाजी मैदानातून हा मोर्चा काढयात आला आहे. तर मविआच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. यावेळी आदित्य ठाकरे सभेदरम्यान म्हणाले, "उध्दव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हमुळे हजारोंचे प्राण वाचले आहेत."
मूळचा गुजरात येथील दर्शन सोळंकी या ‘पवई आयआयटी’च्या विद्यार्थ्याने दि. १२ फेब्रुवारी रोजी ‘आयआयटी’ वसतिगृहाच्या परिसरातच आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने समाज ढवळून निघाला. काही संघटनांनी ठामपणे सांगितले की, दर्शन मागासवर्गीय होता म्हणून त्याच्याशी जातीभेद केला गेला. या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. यावर ‘पवई आयआयटी’ने अंतर्गत अहवाल सादर केला. महाराष्ट्र सरकारने दर्शनच्या मृत्यूसंदर्भात विशेष तपास पथक नियुक्त केले. दर्शनच्या मृत्यूनंतर झालेले आरोप-प्रत्यारोप आणि घटना यांचा मागोवा घेणारा हा लेख..
'समाजकंटक’ हा शब्द सगळ्यांनाच परिचित. त्यात हल्लीच्या ‘स्मार्ट’ युगात नवनवे तंत्र आणि प्रणाली येत असल्याने नवनव्या शब्दांचीही भर पडत आहे. यात ‘माध्यमकंटक’ हा एक नवा शब्द गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. माध्यमकंटकाचे जनक काहीतरी आक्षेपार्ह मजकूर तयार करून किंवा फोटो अथवा व्हिडिओत फेरफार करून विविध प्रकारच्या समाजमाध्यमांत ते ‘व्हायरल’ करत असतात.
आज मराठी राजभाषा गौरव दिन. मराठी भाषेविषयी बोलताना तिच्या शुद्धलेखनाचा विचार करणेही आवश्यक आहे. मग आज सर्रास प्रश्न विचारला जातो की, मराठी मुद्रितशोधनाचे कोणते सॉफ्टवेअर नाही का? अनुत्तरित असलेल्या या प्रश्नाला आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. कारण, ’अक्षरा’ हे मराठीमुद्रितशोधनाचे सॉफ्टवेअर लवकरच लोकार्पित होत आहे. जाणून घेऊया त्याविषयी...
खोटे वृत्त छापणाऱ्या ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाविरोधात भाजपचे माहिती व तंत्रज्ञानप्रमुख आणि पश्चिम बंगाल सहप्रभारी अमित मालवीय हे फसवणूक आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
बड्या उद्योग समूहांनी आपले प्रकल्प परराज्यात हलवल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीला तत्कालीन सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असे उद्योजकांनी म्हटले आहे.
बलाढ्यातील बलाढ्य कंपन्या कालानुरुप संदर्भहीन झाल्याचा इतिहास आपल्याला २१व्या शतकातही जुना नाही. विज्ञान-तंत्रज्ञान असो वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील बलाढ्य कंपनीला गाशा गुंडाळावा लागतो, हे चांगले लक्षण तर मुळीच नाही. डेटा चोरी आणि ग्राहकांशी नसलेल्या प्रामाणिकतेमुळे भविष्यात असा धोका जर सोशल मीडियातील ‘जाएंट’ कंपन्यांना बसणार नाही ना, याचा विचार करण्याची आज गरज आहे. एखाद्या बलाढ्य कंपनीचे कालबाह्य होण्याच्या प्रक्रियेत थेट रोजगार अवलंबून असलेल्यांना किमान काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळूनही जाते. मात्र, अशा
जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व संघ तसेच संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे.
विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या ज्येष्ठ भगिनी शैलजा बेडेकर या ‘मनोरंजन वाचनालय’ चार दशके यशस्वीपणे चालवणार्या म्हणून ठाणेकरांना परिचित आहेत.
बांगलादेशमध्ये अनेक हिंदू मंदिरांची नासधूस करण्यात आली. घरांची तोडफोड करण्यात आली. एकूणच जहाल धर्मांधांना ज्या देशामध्ये राजरोस मोकळीक दिली जाते आणि त्या देशातील अल्पसंख्य हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांना सातत्याने त्यांच्या रोषास बळी पडावे लागते. तेथील सरकारेही आंतरराष्ट्रीय दबाब आला की, काही तरी केल्याचे दाखवत असतात. त्यानंतर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न!’
तमाम भारतीयांनी दाखवलेल्या प्रेमामुळे भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या अधिकृत फेसबुक पेजच्या लाईक्सची संख्या एक कोटींच्या वर गेली आहे. त्यामुळे सुनिल देवधर यांनी आभार व्यक्त करणारा एक व्हिडीओ सोशल मिडियावर मंगळवारी (दि. १९ जुलै) पोस्ट केला. "आज तुम्ही मला खऱ्या अर्थाने 'करोडपती' बनवलं. करोडपती केवळ पैशांनी न होता, मिळणाऱ्या प्रेमाने, लाईक्सने सुद्धा होता येतं. म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे.", असे म्हणत देवधर यांनी जनतेचे आभार मानले.
आपल्या राजकीय गुरुसमोर नतमस्तक होणे हे वेगळे आणि त्याच्या पूजनाचे अवडंबर करणे हे वेगळे आहे. यंदा ‘भेटला विठ्ठल’ या गाण्यावर फेसबुक ‘रील’ बनवण्याच्या नादात बहुतांशी अवडंबर बघायला मिळाले. हे कार्यकर्ते आणि नेते दोघांकडून झाले. बघायला गेले, तर त्याने आपल्याला काय फरक पडतो, तर मित्रांनो फरक पडतो. एक आदर्श लोकशाही स्वीकारलेल्या देशातील काही पक्षातील मंडळी अशा प्रकारे एखाद्या सणाचे भरकटलेले अवडंबर माजवत असतील, तर ते लोकशाहीसाठी घातक असेल.
राज्यात सुरु असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यावर व्यक्त होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि.२२ जून) जनतेशी फेसबुक लाईव्ह मार्फत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. 'सकाळी कोविड टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.', असा स्पष्ट उल्लेख यावेळी त्यांनी केला. त्यामुळे 'मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह असूनही वर्षावरून मातोश्रीवर जाताना ते लोकांच्या सानिध्यात आले. त्यामुळे त्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.', अशी ऑनलाईन पं
ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना १३ जून रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राहुल गांधी भारताला राज्यांचा संघ म्हणतात, त्याचा अर्थ त्या त्या राज्यांची भारतात राहण्याची इच्छा नसली, तर ती फुटून निघण्यासाठी स्वतंत्र आहेत, असा होतो. जम्मू-काश्मीरला भारतापासून तोडण्यासाठी कारवाया करणार्यांना फुटीरतावादी म्हटले जाते, पण त्यांच्यापेक्षाही मोठा फुटीरतावादी काँग्रेसचा शीर्षस्थ नेता आहे, हेच राहुल गांधींच्या विधानावरुन स्पष्ट होते.
"पुरंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार जेम्स लेन याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गलिच्छ मजकूर लिहिला. त्यामुळे मला पुरंदरे यांच्यावर टीका करणे योग्य वाटते." असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी (दि. १३ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.
वैयक्तिक आयुष्यापासून ते कार्यक्षेत्रापर्यंत, जगाच्या प्रत्येक भागात राहणारे लोक या मायावी जगात उपस्थित राहिल्यामुळे उद्भवणारे धोके आणि संघर्ष समजून घेत आहेत. परिणामी, गेल्या काही महिन्यांपासून या आभासी जगापासून दूर जाणार्या वापरकर्त्यांना हे जाणवू लागले आहे की, कृत्रिम जग हे वास्तवाशी सांगड घालण्यात अडचणीचे ठरू शकते
व्हॉट्सॲपवरसुद्धा आता इमोजींद्वारे रीॲक्शन देण्याची सुविधा येणार असल्याचे व्हॉट्सॲपची मालक कंपनी ' मेटा ' कडून सांगण्यात आले आहे.
१ फेब्रुवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब खात्याने १० मिलियन म्हणजेच १ करोड सब्सक्राईबर्सचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले राष्ट्रप्रमुख ठरले आहेत.
'बुवा बाबुआ' या फेसबुक पेजवरील कारवाईबाबत सपाच्या एका नेत्याने गुन्हा दाखल केला आहे. या पेजवर व्यंगचित्र आणि व्हिडिओ पोस्ट करून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली जात असल्याचा आरोप आहे. कन्नौजमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्गसह 49 लोकांची नावे यात आहेत. यामध्ये पेज ऑपरेटरपासून ते कार्टून लाईक, कमेंट, शेअर करणाऱ्यांपर्यंत सपा नेत्याचा आक्षेप आहे.
फेसबुकचे नाव बदलून आता 'मेटा' असे नामकरण करण्यात आले
फेसबुक वर नियंत्रण कोणाचे?
सध्या सर्वात जास्त समाजमाध्यमे वापरणाऱ्यांमध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो. म्हणून फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आदी अॅप्स सात तासांसाठी नुकतीच जगभरात ठप्प झाली आणि या सेवा देणाऱ्या कंपन्यांना जवळपास ४२ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले, असे फेसबुक या कंपनीचा मालक मार्क झुकरबर्गने सांगितले.
मार्क झुकरबर्गसाठी सध्याचा कालावधी काही ठिक नाही. ५ ऑक्टोबरला जेव्हा फेसबुक, व्हॉट्सएप आणि इन्स्टाग्राम एकत्र कित्येक तास ठप्प झाले होते, त्यानंतर फेसबूकसह कार्यरत असणाऱ्या फ्रान्सेस हॉगेन यांनी धक्कादायक आरोप लावले आहेत. झुकरबर्ग यांच्या प्रोडक्टमुळे त्यांच्या मुलांचे नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यातच आता टाईम मासिकानेही झुकरबर्गला लक्ष्य केले आहे. 'डिलीट फेसबुक' या नोटीफिकेशनसह कॅन्सल या डिलीट असा पर्याय ठेवला आहे.
जगभरात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या सेवा अचानक बंद पडल्या. यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. सर्व्हर डाऊन झालेली सेवा सुमारे सहा तासांनी पूर्ववत करण्यात आली. मात्र, हे काही तास मार्क झुकरबर्गसाठी जड ठरले आणि त्यांचे खूप मोठे नुकसान झाले. फेसबुकचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झुकेरबर्ग यांची संपत्ती सात अब्ज डॉलर (सुमारे ५२,१९० कोटी रुपये) कमी झाली आहे. यामुळे तो अब्जाधीशांच्या यादीत एक पायरी खाली घसरला आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला वर्ष उलटल्यानंतर त्याच्या फेसबूक अकाऊंटद्वारे कुणीतरी त्याचा प्रोफाईल फोटो अपडेट केल्याचे त्याच्या चाहत्यांना निदर्शनास आले होते. सुशांतच्या आत्महत्येचा तपास सुरू असताना अशाप्रकारे फोटो बदलल्याने साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या. सुशांतच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्समध्ये तू पुन्हा यायला हवंसं, तु आत्महत्या करायला नको होती, अशा आशयाच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. मात्र, हा फोटो कुणी बदलला याबद्दलचा खुलासा फॅशन ब्लॉगर लकी गुप्ता याने केला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरती अल्पवनीय बलात्कार पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख उघड केल्याने ट्विटरनंतर आता त्यांच्यावर इन्स्टाग्राम आणि फेसबुकने पोस्ट हटवली आहे.
२००६ साली मुख्यत्वे अमेरिकेत सुरु झालेल्या ट्विटरने अल्पावधीत जगभरात आपले हातपाय पसरवले. आज याच ट्विटरचे भारतात २२ दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. तेव्हा, या बदलत्या माध्यमजगतात ट्विटरची भूमिका आणि त्यानिमित्ताने वृत्तसंकलनाचे बदललेले आयाम यांचा या लेखात आढावा घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेसबुक विरुद्ध दिल्ली विधानसभा प्रकरणाची सुनावणी करताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सशक्तीकरण करणाऱ्यांना जबाबदार धरण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मिडीयावरील हेराफेरीमुळे निवडणूक आणि मतदानाच्या प्रक्रियेला धोका निर्माण होऊ शकतो, असे कोर्टाने सुनावणीदरम्यान नमूद केले.
जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह १४ जून २०२१ पासून सुरू झाला आहे. हे सप्ताहाचे दुसरे वर्ष असून जागतिक मराठी उद्योजकता दिवस साजरा करण्याचे तिसरे वर्ष आहे. मी मराठी व्यवसायिक एकीकरण समितीच्या फेसबुक पेजवर कार्यक्रम लाईव्ह बघता येणार आहे.
आधुनिक काळात अभिव्यक्त होण्यासाठी समाजमाध्यम हे एक उत्तम साधन सर्वांच्या हातात आले आहे. 'I am not answerable to anybody, it's my space' या व अशा प्रकारच्या आविर्भावात अनेक लोक सोशल मीडियाचा वापर अनिर्बंध पद्धतीने करताना दिसतात. आपण आपले काम इतके बेमालूम पद्धतीने करतो की, कोणतेही डिजिटल फूटप्रिंट मागे सोडत नाही. असा एक दुर्दम्य आत्मविश्वास काही लोकांना असतो.
मतभेद वैचारिक न राहता व्यक्तिगत होऊ लागलेत. अभिनिवेश इतका वाढलाय की, चांगुलपणादेखील नाकारला जातो आहे. सर्वोच्च त्यागाची खिल्ली उडवली जातेय. राजकीय पक्षांचे ‘आय.टी. सेल’ आणि वृत्तवाहिन्यांनी बेजबाबदारपणाचा कळस गाठला आहे.
केंद्र सरकारची नवी नियमावली म्हणजे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आता हे ऐकून देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सैनिक तातडीने मोदी सरकार ‘फॅसिस्ट’ आहे यावर शिक्कामोर्तब करतील. मात्र, प्रकरण न्यायालयात गेलेच आहे, तर तेथे हा युक्तिवाद कचर्याच्या डब्यात फेकला जाईल, यात कोणतीही शंका नाही.
फेसबुकच्या 'या' निर्णयामुळे शंकेला वाव!
नवीन नियम लागू करण्याची मुदत आज संपली; फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या मनमानी करणाऱ्या सोशल मीडियावर कारवाई शक्य होणार
सरकारचची नेमकी अट काय आहे ?
लोकशाहीचे एकमेव संरक्षणकर्ता असा आव आणणाऱ्या ट्विटर या समाजमाध्यमाने ट्रम्प यांची ट्विटरसह फेसबुक, इन्स्टाग्राम खाती रद्द केली. असे करण्यामागे ट्रम्प यांची लोकशाहीविरोधी वागणूक कारणीभूत असल्याचा जावईशोध लावला गेला. मात्र, त्याचे खरे कारण वेगळेच असल्याचा संशय आहे. कारण ट्रम्प यांनी जरी राडा घातला असला तरीदेखील अमेरिकेतील एक मोठा वर्ग त्यांच्यामागे आहे. त्यातही जनभावना कशी ओळखायची आणि जनमत आपल्या बाजूने कसे वळवून घ्यायचे, त्यांच्या भावनांना कसा हात घालायचा, हे त्यांना चांगलेच अवगत आहे.
२०१९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये समाजमाध्यमांच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध दुष्प्रचार करण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले होते. आता या कंपन्यांच्या एकाधिकारशाही आणि मनमानी कारभाराविरुद्ध आरपारची लढाई सुरू झाली आहे.
इन्स्टाग्रामवर कुठल्याही प्रकारची शिविगाळ करणारा किंवा DM करताना अश्लील संदेश पाठवणाऱ्याला युझरवर कडक कारवाई केली जाणार आहे. इन्स्टाग्रावर आता अशा युझर्सवर नजर ठेवून आहे. इंस्टाग्राम आपल्या नियमावलींमध्ये आमुलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. एखाद्या युझरबद्दल रिपोर्ट केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी लागणारे आवश्यक पुरावे दिल्यानंतर त्याचे अकाऊंट कायमचे बंद करण्याचा निर्णय इन्स्टाग्राम करणार आहे.