महाराष्ट्र राज्याने जाहीर केलेले सांस्कृतिक धोरण, मराठी संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांना व्यापणारे आहे. या सांस्कृतिक धोरणात आपल्याला कुठल्या नवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत, या सांस्कृतिक धोरणाचा तुमच्या माझ्या जीवनाशी नेमका काय संबंध आहे, याविषयी सविस्तर जाणून घेतले. राज्यसभेचे माजी खासदार, तथा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडून. राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या निमित्ताने, दै. ‘मुंबई तरूण भारत’ला दिलेल्या या विशेष मुलाखतीमधला हा अंश.
Read More
दि. ९ एप्रिल २०२३ रोजी iccr (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स) स्थापनेला ७४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी २०२३-24 हे वर्ष माजी विद्यार्थी वर्ष म्हणून पळाले जावे अशी विनंती केली. भारतातून दरवर्षी अनेक राष्ट्रांतून अनेक विद्यार्थी विविध प्रकारचे शिक्षण घेतात व उत्तीर्ण होऊन आपापल्या देशांत परत जातात. या विद्यार्थ्यांशी भारताने सांस्कृतिक संबंध जोपासले असता भारतीय संस्कृतीचा प्रसार ऑइल अशी आशा सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
iccr (इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स) चा ७४ वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. त्यानिमित्ताने शेजारील राष्ट्रांसोबत भाषा सेतू सांधणारा प्रस्ताव iccr चे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी मांडला. भारत हा बहुभाषिक देश आहे. त्याचप्रमाणे इतर राष्ट्रातील भाषा शिकण्याकडेही भारतीय विद्यार्थ्यांचा कल असतो. साधारणपणे युरोपिय भाषा, फ्रेंच, जर्मन सोबतच काही आशियायी भाषा, जपानी, मँड्रिन या भाषा शिकणारा भारतीय विद्यार्थी मोठ्याप्रमाणावर आहे. परंतु, भारताच्या शेजारील राष्ट्रांतील भाषा शिकण्यावर भर देण्यात येणार अस
इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन (ICCR) ने २९ सप्टेंबर रोजी केलेल्या करारानुसार, आता संस्कृत वाचणे आणि समजणे सोपे होणार आहे. इंटरनेटवर संस्कृत समजून घेणे सोपे होण्यासाठी Google सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या अंतर्गत, संस्कृतमधील सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या एक लाख ओळी, त्यांच्या इंग्रजी आणि हिंदी अनुवादांसह उपलब्ध असणार आहेत. ICCR चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि Google च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
विमाने आणि विमानतळांवर भारतीय संगीत वाजविण्यात यावे, अशी मागणी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून करण्यात आली होती. त्या मागणीस केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
द्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या परदेशी अभ्यासकांना अवॉर्ड फॉर प्रमोशन ऑफ बुद्धिस्ट स्टडीज हा पुरस्कार सुरु करण्यात येत असल्याची माहिती भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद अर्थात आयसीसीआरतर्फे भुतान सरकारला भगवान गौतम बुद्धांची मूर्ती भेट देण्यात आली.
विविधतेतून एकता सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या खाद्यपदार्थांचा हेवा संपूर्ण जगाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खाद्यसंस्कृती जपणाऱ्या संस्थांचा गौरव करण्याचा विचार 'इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स'तर्फे (ICCR) करण्यात येणार आहे.
देशातील तरुण वर्गाने लोकमान्यांच्या विचारांचे अध्ययन करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले