कोरोना महामारीशी संबंधित औषधे, लसी, उपचार पद्धती यांच्या बदलत्या नियमांमुळे जनसामान्यांमध्ये एकप्रकारे गोंधळाचे वातावरण आहे. त्यातच सोशल मीडियावरून फिरणार्या संदेशांनी या गोंधळात अधिकच भर टाकलेली दिसते. महामारीच्या प्रारंभी काळात असा संभ्रम आणि शास्त्रज्ञांची हतबलता जनसामान्यांनीही ग्राह्य धरली. कारण, कोरोनाचा विषाणू आणि एकूणच महामारीचे स्वरूप हे जनसामान्यांबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसाठीही तितकेच नवीन होते.
Read More
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे सांगितले होते. अखेर कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियाच्या औषधाच्या ट्रायल बंद करण्याची शिफारस WHO ने मागे घेतली आहे.
भारताने अमेरिकेसहित अनेक देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा पुरवठा केल्यानंतर अँटोनियो ग्युटेरेस यांनी हे वक्तव्य केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (HCQ) या औषधाची मागणी वाढत आहे. याच्या पुरवठ्यासाठी अनेक देश भारताकडे आशा लावून बसले आहेत. भारतानेही आधी देशांतर्गत मागणी पूर्ण केल्यानंतर या औषधांची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. मलेरियावरील औषध असलेले हायड्रोक्सीक्वोरोक्वीन एकूण ५५ देशांना निर्यात करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विनसाठी मदत मागणाऱ्या देशांमध्ये आता पाकिस्तानचाही समावेश
मुंबई महापालिकेकडून खबरदारीचा उपाय; महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती
भारतीय रसायनशास्त्राचे जनक आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक प्रभावी उपचार म्हणून संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष वेधायला भाग पाडणारे औषध ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’चे निर्माते आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्याविषयी...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनवरील व्यापारी जगताचा उडालेला विश्वास आणि भारतीय औषध कंपन्यांसाठी सध्या खुली झालेली जागतिक बाजारपेठ अशा अनेक गोष्टी गृहीत धरून भारताने ह्या संधीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर फायदा उठविण्याची एक मोठी संधीच भारतासमोर चालून आली आहे.
'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन'चा रामबाण चीन, अमेरिका व अन्य भारतद्वेष्ट्यांच्याच पोटात घुसला आहे, असे मुळीच नाही. गेल्या तीन-चार दिवसांतील ब्रिटिश काळापासून आपल्या मजकूराचा डंका पिटणाऱ्या माध्यमाचे मजकूर वाचले की 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन'चा रामबाण किती खोलवर जाऊन घुसला आहे, याची वेदना समजते.
भारताने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ निर्यातबंदी उठवताच डोनाल्ड ट्रम्पकडून मोदींचे कौतुक
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधांची भारताकडे केली मागणी कोरोनाशी लढा देण्यासाठी अमेरिकेने भारताकडे मदतीचा हात मागितला आहे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाची मागणी केली आहे. कोरोनावर उपचार म्हणून मलेरियावर उपचार म्हणून वापरण्यात येणारे हे औषध परिणामकारक आहे.