कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र, येत्या सोमवार, दि. २१ जूनपासून ही लसीकरण मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि. १८ जून रोजी दिली.
Read More
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोविड-19 फ्रंटलाइन वर्कर्ससाठी क्रॅश कोर्स सुरू केला. पीएम मोदी यांनी २६ राज्यांमधील १११ प्रशिक्षण केंद्रांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. या क्रॅश कोर्सच्या माध्यमातून १ लाख योद्धा तयार होणार असून त्यांना रोजगार मिळणार आहे.
कोरोना काळातदेखील स्वतःचा जीव धोक्यात घालुन वृत्तपत्र विक्रेते ग्राहकांना सेवा देत असुन एकप्रकारे समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी अवघ्या एका वर्षात त्यावरील लस तयार करण्यात आली. ही लस बाजारात सुध्दा आली आहे. मात्र ही लस टोचून घेण्याबाबत फ्रंटलाईन वर्कर्सच्या मनात अजूनही भिती आहे. त्यामुळेच लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
“शनिवार दि.१६ जानेवारीपासून सुरू होणार्या कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, सैन्यदले, पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दले, सफाई कर्मचारी, कोरोना व्यवस्थापनात कार्यरत कर्मचारी आदींना प्राधान्य असणार आहे. या तीन कोटी ‘कोरोना योद्धे’ आणि ‘फ्रंटलाईन वर्कर्स’च्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार आहे,” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दि.११ जानेवारी रोजी दिली. देशात दि.१६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास प्रारंभ होत आहे.