बाळासाहेब देवरस आणि दत्तोपंत ठेंगडी यांनी वर्णन केलेला ‘टिपिंग पॉईंट’जवळ येत आहे. रवींद्रनाथ टागोरांचा आदिवासी समाज सक्रिय होत आहे, असे दिसते. राष्ट्रीय जीवनाच्या अनेक क्षेत्रांत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले राष्ट्रहिताचे मूलभूत बदल एकामागून एक होत आहेत. देशाच्या संरक्षण धोरणात आणि परराष्ट्र धोरणात जग मूलभूत बदल अनुभवत आहे.
Read More
सप्टेंबर २०२३ मध्ये ’युनेस्को’ने आपली जागतिक वारसा स्थळांची ताजी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत भारतातील दोन ठिकाणं आहेत. एक म्हणजे बंगालमधील शांतिनिकेतन आणि दुसरं म्हणजे कर्नाटकातील होयसळ राजांनी बांधलेली अप्रतिम वास्तुकलेचे नमुने असलेली तीन मंदिरं.
जगप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित असलेल्या शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. रविवारी सौदी अरेबियामध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात शांतिनिकेतन आश्रम आहे.
नुकतीच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आणखी एका भारतातील स्थळाची भर पडली. या यादीत आता शांतीनिकेतनचा समावेश करण्यात आला आहे. सौदी अरेबियामध्ये रविवारी झालेल्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सध्या अवघ्या जगाचे लक्ष अवकाशातून येणार्या शुभ संकेतांकडे लागले आहे. ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने पाठविलेले ‘चांद्रयान-३’ मजल दरमजल करत चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचले. ‘चांद्रयाना’चा हा प्रवास जेवढा सुखद वाटतो, तेवढाच तो आव्हानात्मक होता.
जी जमीन अमर्त्य सेन यांनी ताब्यात घेतली आहे, ती कायद्याद्वारे ‘विश्व भारती’ या संस्थेची आहे. ‘विश्व भारती’च्या मालकीची ही जमीन परत मिळविण्याचा प्रयत्न कुलगुरू करीत आहेत. ते आपली जबाबदारी पार पडत आहेत. आपले कर्तव्य पार पाडण्याचे कार्य करीत असलेल्या कुलगुरूंना तसे करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
जंगल म्हटलं की, डोळ्यांसमोर समोर उभं राहत ते विविध वृक्षं आणि गवतांनी आच्छादित, पशुपक्ष्यांनी समृद्ध, छोट्या -छोट्या आदिवासी खेड्यांनी नटलेला रमणीय प्रदेश. या जंगलाच्या व्यवस्थापनाच्या आणि संशोधनाच्या बाबतीत माणसाचा दृष्टिकोन कसा विस्तारित होत गेला, हे पाहणं खूप रंजक आहे. चला तर जाणून घेऊया पूर्वापार चालत आलेल्या वन व्यवस्थापनाच्या वळण वाटा...
भारत भाग्य विधाता राष्ट्रगीतातील हे सहज सोपें तीन शब्द आहेत. खरंतर रवींद्रनाथ टागोर यांनी "भारतो भाग्यो बिधाता" या नावाने रचलेले हे मूळ बंगाली गीत आहे. राष्ट्रगीत हे म्हणायला खरंतर फक्त ५२ सेकंद लागतात पण पांच कडव्याचे हे गीत मुळातून कसे आहे हे जाणून घेण्याचा या निमित्ताने प्रयत्न करणार आहोत. आज या माध्यमातून प्रत्येकाच्या घरावर तिरंगा बघितला आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक जागरूक झाली आहे. विद्यमान केंद्र सरकारने घरोघरी तिरंगा या मोहिमे अंतर्गत अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्र प्रथम ही भावना या निमित्ताने मनामन
एकीकडे आज आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे, एक राष्ट्र म्हणून भारत आपल्या ‘स्व’च्याॉजोरावर एक नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे या परिश्रमाचा विरोध होतोय. विरोधकांचा नेमका हेतू शोधून काढण्यासाठी विचारमंथन व्हायला हवे.
देवेंद्रनाथ टागोर (१८१७ ते १९०५ ) हे प्रसिद्ध आणि नामांकित टागोर घराण्यातील एक महान विचारवंत आणि रवींद्रनाथ टागोरांचे पिताश्री होते. देवेंद्रनाथांनी १८४३ ला ‘तत्त्वबोधिनी पत्रिका’ आणि १८६५ ला ‘नॅशनल पेपर’ ही दोन महत्त्वाची मुखपत्रे सुरू केली. तसेच ते राजकीय संघटना ‘"British Indian Association’चे काही काळ सचिव होते. स्वतः श्रीमंत घराण्यातील असूनही गरीब गावांवरील चौकीदारी कर कमी करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले. बहुपत्नीत्व आणि बालविवाहाला त्यांचा प्रखर विरोध होता, तसेच ते विधवापुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होत
“एकीकडे उच्च शिक्षित आणि कुशल लोक कोरोनासारख्या महामारीविरोधात लढा देऊन सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे जगात दहशत आणि हिंसा पसरविण्याचे काम करण्यातही उच्च शिक्षित लोक आघाडीवर आहेत. त्यामुळे अशा विचारसरणींविषयी आता गंभीर विचार करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, दि. १९ फेबु्रवारी रोजी केले. पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळ्यात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ममता बॅनर्जींवर घणाघाती हल्ला
साहीत्य देशपातळीवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या आणि भारतातील पहीले नोबेल पारितोषिक विजेते असणाऱ्या रविंद्रनाथ टागोर यांची आज १५८ वी जयंती आहे. त्यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथील जोरासंको येथे झाला. बंगाली दिनदर्शिकेनुसार त्यांचा जन्मदिवस ९ मे रोजी साजरा केला जातो. रविंद्रनाथ टागोर केवळ कवी नसून एक चित्रकार, लेखक आणि संगीतकारही होते.
ज्योतिरिंद्रनाथ टागोरांचे संगीत, कला, साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. भारतातील इतर भाषांमधील संगीतापेक्षा बंगाली संगीताचे वेगळेपण सिद्ध करण्यामागे त्यांचा मोलाचा वाटा आहे.