पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक नवीन माहिती पुढे आली आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूची गंभीर दखल घेत त्यांच्या दोन्ही बाळांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत २४ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हस्ते व्हर्चुअल बेल वाजवून शुक्रवार, दि. २ मे रोजी जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) 'निफ्टी वेव्हज् इंडेक्स'चा शुभारंभ करण्यात आला. ‘निफ्टी वेव्हज् इंडेक्स’च्या माध्यमातून या कंपन्यांमध्ये जगभरातील गुंतवणूक होईल. निफ्टी वेव्हज् इंडेक्स मध्ये मीडिया, मनोरंजन आणि गेमिंग क्षेत्रातील ४३ सूचीबद्ध कंपन्या समाविष्ट आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन गुरुवार, दि. १ मे रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे.
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महानुभाव पंथाचे प्रवर्तक आणि १२ व्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा भाद्रपद शुक्ल द्वितीया हा दिवस ‘अवतार दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
(IMEC SUMMIT 2025) "एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था हे लक्ष्य ठेवून महाराष्ट्र प्रगती करत आहे. भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी (आयमॅक) महाराष्ट्र पूर्णपणे सुसज्ज आहे. शिवाय पायाभूत सुविधांची कामे ही प्रामुख्याने प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आयमॅक केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर यात सहभागी सर्वच राष्ट्रांसाठी गेमचेंजर ठरेल", असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत सुरू असलेल्या दोन दिवसीय 'आयमॅक समीट २०२५'च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
दि. १५ ऑगस्ट २०२५ पासून शासनाच्या सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणार नाही, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिला.
हलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आले असून सर्व व्हिसाधारक आणि अवैध पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, २६ एप्रिल रोजी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
मुंबईत नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (युनि फाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.या प्राधिकरणाच्या कायद्यासाठी जनतेकडून सूचना व हरकती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटी (UMTA) बिल, २०२५'च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.
सार्वजनिक परिवहनाच्या आर्थिक मॉडेलमध्ये नवा मापदंड निश्चित करत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२४–२५ या आर्थिक वर्षात नॉन-फेअर रेव्हेन्यूमध्ये म्हणजेच प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न तिप्पट म्हणजेच जवळपास १२२ कोटींची भरघोस वाढ नोंदवली आहे.
"उबाठा गट या देशाचा इतिहास विसरलेला दिसतो. युद्धाची किंवा युद्धसदृश्य परिस्थिती असताना आणि देशावर हल्ला झालेला असताना, भारतातील राजकीय पक्षांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका घेतलेली आहे. हा या देशाचा इतिहास आहे. मात्र अशा परिस्थितीत उबाठा गटाकडून विरोध करणे, उपहास करणे किंवा मूर्खासारखी वक्तव्ये करणे सुरू आहे. देशाची जनता त्यांना माफ करणार नाही”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी केला.
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' प्रकल्प व्यवस्थापन पोर्टलचे अनावरण देखील केले.
राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिल
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवार, २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दरम्यान, माझे आणि मुख्यमंत्र्यांचे फार जुने नाते असून आम्ही अधूनमधून भेटत असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
२६/११ दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.
मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी या व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवार, २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी आता ‘झोनल मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. विकासात्मक प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली आहे. सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी त्यांनी वॉररूम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ कक्षामार्फत नाशिकमधील नऊ वर्षांच्या चिमुकलीवर ‘कॉक्लियर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. यासाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून दीड लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात वाढणारी रहदारी, साधू-संत-महंत आणि भाविकांची होणारी गर्दी यांचा विचार करुन योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा (Nashik Ring Road) प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी दिले. तसेच नाशिक शहरात येणाऱ्या भाविकांना उत्तमोत्तम वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात मंगळवार, १५ एप्रिल रोजी सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार, राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली सारखा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि शेवटचा जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पालकत्वात वेगाने 'स्टील सिटी' होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हे साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते, पूल तसेच रोजगार विषयक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याच उपक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास नुकत्याच पार पडलेल्या मंत्
छत्रपती शिवरायांना केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका. तर देश आणि जग शिवरायांकडून प्रेरणा घेत आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
रायगडला केवळ पर्यटनस्थल नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवार, १२ एप्रिल रोजी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राजसभा, रायगड किल्ला येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासादार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
Devendra Fadnavis भुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन, नव्याने निविदा काढण्यात याव्यात आणि ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी दिले.
( Mulund dumping ground ) मुलुंड कचराभूमीमधील (डंपिंग ग्राऊंड) कचऱ्यावर प्रक्रिया करून एका वर्षात तो हटवला जाणार आहे. महापालिकेने निवड केलेल्या जागेवर हा सर्व कचरा टाकला जाईल, अशी ग्वाही महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी दिली.
( Chief Minister's Relief Fund Cell help )बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरातील एका गावात रसवंतीच्या मशिनमध्ये केस अडकून १६ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. मात्र, गावकऱ्यांच्या तत्परतेने, सरपंचाच्या पुढाकाराने आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या त्वरित मदतीमुळे या मुलीचे प्राण वाचले. अवघ्या दोन तासांत १ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. या मदतीमुळे हवालदिल झालेल्या मुलीच्या कुटुंबाला आधार मिळाला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ एप्रिल रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ९ निर्णय घेण्यात आले आहेत.
( Chief Minister Devendra Fadnavis ramnavmi programe ) “प्रभू श्रीराम हे आपले राष्ट्रपुरुष आहेत. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. जीवनाची मूल्ये काय असावी, याचा सर्वोच्च बिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांचे जीवन आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. ५ एप्रिल रोजी केले. मानखुर्द येथे ‘संजोग सोसायटी’च्यावतीने आयोजित संजोग देवस्थान प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
(CM Fellowship Programme 2025-26) राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.
(CM Devendra Fadnavis pays tribute to Veteran Actor Manoj Kumar) देशभक्तीपर चित्रपटांच्या मालिकेमुळे भारतकुमार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते - चित्रपट निर्माते मनोजकुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Waqf Amendment Bill विषयी उबाठा शिवसेनेने गोलमाल भूमिका घेऊन वक्फ सुधारणांना विरोध आहे की पाठिंबा हे सांगण्याचे अपेक्षेप्रमाणेच टाळले आहे. त्यामुळे उबाठाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत खरे ठरले आहे.
( Government support for Vedic mathematics; Chief Minister Devendra Fadnavis ) “भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. वैदिक गणिताची महती व उपयोग येणार्या पिढ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. ३१ मार्च रोजी दिली.
(CM Devendra Fadnavis on Sonia Gandhi's Article) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी नुकतेच एका लेखाच्या माध्यमातून भारताच्या नवीन शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कडाडून टीका केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी सोनिया गांधींनी आता तरी भारतीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Happy Gudipadwa महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार करूया. हा राष्ट्रधर्म वाढवू या, विकासाची महागुढी उभारू या! असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना मराठी नववर्ष प्रारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारने मुंबईतील फनेल झोनमधील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा करुन मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच फनेल झोनसारखे निर्णय स्वयंपुनर्विकास चळवळ पुढे घेऊन जाण्यास नक्कीच प्रोत्साहित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.
Devendra Fadnavis अर्थसंकल्पीय अधिवेशन कायमच वादळी ठरते. विरोधकांना पुरेसा निधी न मिळाल्याने ते सत्ताधार्यांवर राग काढतात, वेगवेगळी कारणे शोधून सभागृह बंद पाडतात. यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहांचे ‘फ्लोअर मॅनेजमेंट’ अशा रितीने केले की, कॅमेर्यासमोर गरजणारे विरोधक सभागृहात बेजार झाले.
electric Vehicles महाराष्ट्राला देशाची इलेक्ट्रिक वाहननिर्मितीची राजधानी म्हणून विकसित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला निर्णय सर्वस्वी स्वागतार्ह असाच. यामुळे राज्यात केवळ प्रदूषणमुक्त हरित वाहतुकीलाच चालना मिळणार नाही, तर वाहननिर्मिती, संलग्न उद्योग-व्यवसायांना ऊर्जा मिळून, रोजगाराच्या लाखो संधींमुळे विकासाचा ‘महा’मार्ग प्रशस्त होईल.
सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात भाजप-शिवसेना युती २०१४ साली कशी तुटली? याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दिली. “२०१४ साली शिवसेनेला १४७ जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल, हेसुद्धा ठरले होते. पण, शिवसेना १५१ जागांवर ठाम राहिली आणि युती तुटली,” असे ते म्हणाले. मात्र, राऊतांनी यावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा उबाठा गटाची गोची झाली. ‘भाजपने युती तोडली’, ‘धोका दिला’, ‘दिलेला शब्द मोडला’, अश
( Chief Minister Devendra Fadnavis on license of restaurant runs hookah parlor will be permanently revoked & law for strict action ) “वर्ष २०१८ मध्ये अवैध हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. त्यासाठी कायदा तयार केला आहे. त्यात अत्यावश्यक सुधारणा करण्यात येतील. यापुढे अवैध हुक्का पार्लर चालू करताना दुसर्यांदा सापडल्यास सहा महिन्यांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येईल. तसेच तिसर्यांदा सापडला, तर परवाना कायमचा रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित दोषी मालकांवर अजामीनपात्र गुन्हा नोंद केला जाईल,” असा इशारा गृहम
( Chief Minister Devendra Fadnavis in vidhansabha on jaykumar gore case ) मंत्री जयकुमार गोरे यांना अडकावण्यात शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे आणि आ. रोहित पवार यांचा हात आहे. गोरे यांच्याविरोधात तयार केलेले व्हिडिओ आरोपींनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले असून त्या तिघांमध्ये अनेक फोन कॉल झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २५ मार्च रोजी विधानसभेत केला. अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
( CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office ) आमदार प्रविण दरेकर यांनी सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी 'कर्तव्यपथ' या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आलेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
( CM devendra fadnavis on the discussion of final budget week proposal ) कुठलीही घटना झाली आणि कुणीही केली तरी काही लोक त्याला थेट माझा सगा सोयराच करून टाकतात. पण भारताचे संविधान माझा सगा आणि महाराष्ट्राची १३ कोटी जनता माझे सोयरे आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंगळवार, २५ मार्च रोजी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
( No one has the right to violate the freedom Chief Minister Devendra Fadnavis on Kunal Kamra ) स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. परंतू, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळे कुणाल कामराने माफी मागावी अशी प्रतिक्रिया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी सोमवार, २४ मार्च रोजी दिली.
राज्यतील पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी आणि राज्यातील कोणत्याही भागातून गतिमान रस्ते प्रवासासाठी राज्यात विविध रस्ते प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व रस्ते प्रकल्पांची कामे गतीने हाती घेण्यासोबतच नवीन प्रकल्पांसंदर्भात प्राधान्याने मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.
Disha Salian मृत्यू प्रकरणात न्यायालय काय म्हणते? न्यायालयात काय पुरावे दिले जातात? त्यावर पुढची भूमिका ठरेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २१ मार्च रोजी दिली.
Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
( comprehensive policy benefit local industries from thermal power plants Chief Minister Devendra Fadnavis ) औष्णिक केंद्रांमधील राखेबाबत २०१६ मध्ये शासनाने केलेल्या धोरणात २० टक्के राख स्थानिक उद्योगासाठी आणि ८० टक्के लिलाव असे प्रमाण होते. परंतु केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार १०० % लिलाव करावा लागतो. या राखेचा स्थानिक उद्योगांना लाभ होऊन उद्योग वाढीसाठी शासन सर्वंकष धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.