मीपणाचा अर्थात अहंभावाचा त्याग करून रामाचा, स्वस्वरुपाचा शोध घेत असताना ते स्वरूप, ते तत्त्व आपल्याच ठिकाणी असल्याचे आढळते असे स्वामींनी मागील श्लोक क्रमांक १८६ मध्ये सांगितले. परमात्म तत्त्वाविषयी बोलताना स्वामी म्हणाले, ‘सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहे।’ अगदी जवळ असणार्या आपल्याच रुपाला आपण दुरावलो, याचे कारण आपला अहंभाव. मीपणाने आपण अंतरंगातील शाश्वत सत्याचा शोध घेऊ शकत नाही, त्या सत्याचा अनुभव घेऊ शकत नाही. स्वामींनी मनाला तेच तत्त्व शोधायला सांगितले आहे.
Read More
सर्वसाधारणपणे ज्ञान आणि अज्ञान या दोन कल्पना आपल्या परिचयाच्या आहेत. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. समर्थ ज्ञान व अज्ञान या कल्पनांशी न थांबता वेगळा विचार करतात. यातून स्वामींनी विपरित ज्ञानाची कल्पना मांडली आहे.
माणूस जन्माला आल्यानंतर जीवनात त्याला अनेक स्थित्यंतरे पाहावी लागतात. त्यातून त्यांचा स्वभाव, प्रवृत्ती तयार होत जाऊन व्यक्तिमत्व तयार होते. त्यात संगतीचा मोठा परिणाम दिसून येतो. मन वायूरूप असल्याने चंचल, अस्थिर असते. तथापि मनाची एक विशेषता म्हणजे एखादी गोष्ट मनाला पटली, तर मन तो विचार सहसा सोडत नाही. आपल्या जीवनातील ध्येय निश्चिती झाली की त्या ध्येयाकडे जाण्याचे जे मार्ग असतात, त्यावर सारासार विचार करून आपण अनुरूप मार्गाची निवड करतो. मनाला ध्येयविचाराची खात्री पटली की, त्याप्रमाणे आचरण घडू लागते आणि ध्येया
स्वामींनी त्याकाळच्या लोकांना माहीत असलेल्या पुराणकथांचा आधार घ्यायचे ठरवले असावे. आजच्या बुद्धिवादी काळात विज्ञाननिष्ठेला महत्त्व आल्याने त्या पुराणकथा-लोकांना भाकडकथा वाटतात. परंतु, ३५० वर्षांपूर्वी लोक या पुराणकथांतील तात्पर्यार्थ पाहत असत. तो श्रद्धायुक्त लोकांचा काळ होता. लोक पुराणकथांतील तार्किकतेपेक्षा त्यातील तात्पर्य भक्तिभावाने पाहत असत. त्यामुळे त्या पुराणकथा आहे तशाच स्वीकारीत. त्यांची चिकित्सा करीत नसत.
‘श्री समर्थ रामदास ः एक अभ्यास’ हा सुरेश जाखडी लिखित सुमारे ४५० पानांचा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. लेखकाने विविधांगांनी सादर केलेला हा परिपूर्ण अभ्यासग्रंथ आहे. एकंदर नऊ प्रकरणे व तीन परिशिष्टे यातून लेखकाने रामदासांचे अलौकिक चरित्र, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्तृत्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या अभ्यासाची प्रेरणा त्यांना कशी मिळाली, हे सांगताना लेखकाने डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, शंकरराव देव, ल. रा. पांगारकर, वि. का. राजवाडे, प्रा. के. पि. बेलसरे इत्यादी विचारवंतांचेे विचार वाचून प्रेरित केले असे सा
समर्थांच्या मते, आपली कृती, आपण करीत असलेली क्रिया महत्त्वाची आहे. नुसत्या क्रियाशून्य बडबडीला काही अर्थ नसतो. अशी बडबड, असा उपदेश लोक तेवढ्यापुरता ऐकतात व विसरतात. कारण, त्यामागे सांगणार्याच्या शब्दाला कृतीचे पाठबळ नसल्याने ते सांगणे, तो उपदेश प्रभावशाली होऊ शकत नाही.
गुरूने अतींद्रिय ज्ञान साध्य करून घेतलेले असते, तोच शिष्याला अतींद्रिय ज्ञानाची अनुभूती देऊ शकतो. नुसत्या पुस्तकी पांडित्यात नम्रता, अतींद्रिय अनुभूती त्यांचा अभाव असतो. शब्दज्ञान, अहंकार उत्पन्न करणारे असल्याने परमार्थात शब्दज्ञानाला, पुस्तकी ज्ञानाला काही किंमत नसते.
समर्थ सांगत आहेत की, तुमच्या हितासाठी जे सत्य आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या हितासाठी तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे. आत्मप्रचिती घ्यायची आहे. माझे सांगणे जसेच्या तसे न स्वीकारता खरे हित शोधण्याचा तुम्हीच प्रयत्न करा. आत्मप्रचितीने खर्या हिताची जाणीव होते.
समर्थ साक्षेप म्हणजे सततोद्योगाला महत्त्व देतात. माणसाने सतत उद्योगी असावे, असे स्वामींना वाटते. त्यामुळे वेळेचे महत्त्व, वेळेची किंमत ते जाणतात. ज्यातून काहीही निष्पन्न निघत नाही, अशा शुष्क वादविवादात माणसाने वेळ घालवावा, हे समर्थांना मान्य नाही.
रामनाम हा समर्थांच्या आवडीचा विषय असल्याने यापूर्वीच्या सुमारे २० श्लोकांतून स्वामींनी अनेक प्रकारांनी रामनामाचे महत्त्व विशद केले आहे. स्वामी म्हणतात की, “परमार्थातील सर्व साधनांचे सार रामनाम आहे.” “आपल्या विधानाच्या समर्थनार्थ सतत रामनाम घेणार्या महादेवाचे ते उदाहरण देतात. स्वतःला अष्टसिद्धी वश असूनही भगवान शंकर सतत रामनाम घेत असतात आणि पार्वतीमातेलाही रामनामाचा उपदेश करतात,” असे स्वामींनी म्हटले आहे.
सर्वसाधारणपणे कोप येण्यासारखे म्हणजेच आपल्या मनाविरुद्ध बाह्य परिस्थिती निर्माण झाली, तर राग आवरता येत नाही. बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नसते, त्यामुळे रागही आपल्या हाती नसतो, असे सकृददर्शनी वाटते. तथापि क्रोध, माणसाचे किती नुकसान करतो हे समजले तर संयमाने क्रोध हाताळता येतो.
रामाच्या साहचर्याबरोबर त्याच्या गुणांच्या कथा, आदर्शाच्या कथा करून स्तुतिस्तोमे गायिली, ऐकली अथवा त्यांचे कीर्तन, विवरण केले, तर रामाच्या गुणांचा आदर्शाचा प्रभाव आपल्या मनावर होऊन त्यापैकी थोडेफार का होईना गुण, आदर्श आत्मसात करावेसे वाटू लागतात. त्यातून रामाला आवडेल तसे वागण्याची प्रेरणा निर्माण होते. येथे अर्थातच प्रेमाची प्रीतीची दुसरी अट साध्य होते.
अत्यंत आदरपूर्वक रामनाम घ्यावे, असे सांगून समर्थांनी मनाच्या श्लोकांचे पहिले शतक संपवले आहे. येथून पुढे मनाच्या श्लोकांच्या दुसर्या शतकात प्रवेश करताना भक्तांना येणार्या समस्या विचारात घेऊन स्वामी विवेकाचे महत्त्व सांगणार आहेत. सगुणभक्ती आणि सदाचरण या विषयांवर चर्चा करणार आहेत.
राम आणि रामनाम यानेच आपली सर्व संकटे दूर होऊन आपण ‘पूर्णकाम’ होऊ. यासाठी सकाळी रामाचे, त्याच्या गुणांचे चिंतन करून आपल्या दिवसाची सुरुवात करावी. रामनाम हे सर्व साधनांचे सार आहे तेव्हा उगीच शंका, संशय न घेता रामनामाची प्रचिती घ्यावी.
शांत चित्ताने विचार करून जगाकडे पाहिले, तर लक्षात येते की, सर्व जीवांचा अन्नदाता, पालनपोषणकर्ता परमेश्वर आहे. याबाबतचे सविस्तर विवरण आपण मागील लेखात पाहिले. या परमेश्वराला कोठे पाहावे हे स्वामींनी दासबोधात सांगितले आहे.
समर्थ रामदासस्वामी शिष्यांना, महंतांना किंवा सामान्यजनांना उपदेश करीत. तेव्हा त्या विचारातील मर्म त्यांनी अनुभवलेले असे, त्याची प्रचिती घेतलेली असे. प्रचिती आल्यावर स्वामींच्या मुखातून तो उपदेश बाहेर पडे. थोडक्यात सांगायचे, तर स्वामींची वागण्याची पद्धत अशी होती की, ’आधी केले, मग सांगितले. यावरून विचारांच्या बाबतीत समर्थ आत्मप्रचितीला महत्त्वाचे स्थान देत असत, हे लक्षात येते. या संदर्भात दासबोधातील समर्थवाणी स्पष्टपणे सांगते की, हे प्रचितीचे बोलिलें। आधी केले मग सांगितलें। मानेल तरी पाहिजे घेतलें। कोणी येक
शारदीय नवरात्रोत्सवात आज सरस्वतीपूजन. सरस्वतीचं एक प्रतिभासंपन्न रूप म्हणजे प्रतिभाताई! ज्यांनी केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलेले आहे.
समर्थांचे आराध्यदैवत राम असल्याने ‘जगीं होईजे धन्य या रामनामे’ असे स्वामी म्हणाले. स्वामींच्या मते, राम हाच अंतरात्मा असून तो परब्रह्म आहे. रामनामाचा जप करीत असताना रामाच्या अंगी असलेल्या अनेक गुणांंची आठवण येते. रामचरित्राचा अभ्यास करताना लक्षात येते की, रामाच्या ठिकाणी अनेक उत्तमोत्तम गुण एकवटले आहेत. त्या रामाला आपला आदर्श मानून त्याच्या गुणांची उजळणी आपल्या मनात होत राहिली, तर त्या गुणांचा स्पर्श आपल्या अंत:करणाला होतो.
एखाद्या ग्रंथाची फलश्रुती त्या ग्रंथाच्या वाचकांसाठी सांगण्याची परंपरा जुनी आहे. फलश्रुतीचा शब्दश: अर्थ त्या ग्रंथाच्या वाचनाने, श्रवणाने मिळणारा लाभ किंवा निष्पत्ती असा आहे. आजकाल जी पुस्तके प्रकाशित होतात, त्यातील आशयाची, विचारांची ओळख अथवा संक्षिप्त माहिती पुस्तकाच्या मलपृष्ठावर देण्याची पद्धत आहे. ती माहिती वाचून त्याच्याशी वाचकांच्या आवडीनिवडी जुळल्या अथवा त्यातील हकिगतीचे नावीन्य जाणवले, तर लोक ते पुस्तक विकत घेतात. हा प्रकार फलश्रुतीसारखा वाटला तरी त्यातील फरक म्हणजे पूर्वीच्या फलश्रुतीत वाचकांच्या
मनाच्या श्लोकांतही फलश्रुती सांगताना स्वामी श्रवण करणे म्हणजे ऐकणे, असा शब्दप्रयोग करतात. या ठिकाणीही श्रवण करणे म्हणजे अभ्यासपूर्ण श्रवण करणे, असा अर्थ घ्यावा लागतो आणि समर्थांना तोच अपेक्षित आहे. मनाच्या श्लोकांचा नीट अभ्यास केला, तर आपल्यात असलेले सर्व दोष नाहीसे होतात, असे स्वामींनी म्हटले आहे, दासबोधाच्या फलश्रुतीतही स्वामी ‘नाना दोष ते नासती’ असे म्हटले आहे. एकंदरीत पाहता मनाच्या श्लोकांची फलश्रुती आणि दासबोध ग्रंथाची फलश्रुती यात बरेच साम्य आढळते.
मनाच्या श्लोकांची पार्श्वभूमी, त्यातील आशय, श्लोकांचे तत्कालीन समाजावर झालेले इष्ट परिणाम, आजच्या संदर्भात मनाच्या श्लोकांची उपयुक्तता, त्यांचे वैयक्तिक, सामाजिक फायदे, त्यांनी मानवी जीवनाच्या विकासाला लावलेला हातभार इत्यादी अनेक दृष्टीने विचारात घेऊन मनाच्या श्लोकांचा अभ्यास करता येतो. थोडक्यात, मनाच्या श्लोकांच्या अंतरंगाचा शोध घेतल्याशिवाय खरा अभ्यास होत नाही.
जे सांगायचे ते समर्थ मनाच्या श्लोकात निःसंदिग्धपणेसांगतात. स्वामी मनाच्या श्लोकांनी रचना करताना तत्त्वज्ञानाच्या भाषेऐवजी सहज समजेल, अशी सोपी भाषा वापरून परमार्थपोषक भक्ती, सदाचार, शुद्ध चारित्र्य, राघवाची निरपेक्ष आराधना इत्यादी गोष्टी समजून सांगतात. स्वामींनी मनाच्या प्रगल्भ अवस्थेत स्वानुभवाचे बोल मनाच्या श्लोकात सांगितले असल्याने त्यातील काही श्लोकांना सुभाषितांचा दर्जा प्राप्त झाला आहे.
दासबोधातील विचारांचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावता येतील. काही ओव्यांचे पाठांतर करून, त्यांचा संभाषणात वापर करून पांडित्य प्रदर्शन करता येईल. पण, त्याने ज्ञानाहंकार वाढेल आणि ‘माझ्यासारख्या ज्ञानी व दासबोध अभ्यासक कोणी नाही,’ अशी गर्वोक्ती केली जाईल. तसे झाले तर पारमार्थिकदृष्ट्या ते योग्य वाटत नाही. त्याने नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. हे टाळायचे असेल, तर दासबोधातील नुसत्या शब्दज्ञानापेक्षा पारमार्थिक प्रगतीसाठी दासबोधात सांगितलेल्या बद्ध, मुमुक्षू, साधक या अवस्था समजून घेऊन त्या पायर्या चढत चढत सिद
आता मानसपूजा म्हणजे काय, तेही समर्थांनी थोडक्यात सांगितले आहे. बाहेरील सर्व उपचार मनाने कल्पून अंतर्यामी असलेल्या भगवंतास अर्पण करावे. जे जे उत्तम प्रकारचे पदार्थ देवाला अर्पण करावे, असे वाटते ते सर्व कल्पनेने निर्माण करुन देवाला वाहावे, ही मानसपूजेची पद्धत आहे.दासबोधाच्या सुरुवातीलाच समर्थांनी सांगून टाकले की, या दासबोध ग्रंथात भक्तिमार्ग विशद केला आहे.
समर्थांचे ‘कवित्वनिरुपण’ समर्थांचे अवलोकन चौफेर असल्याने असल्याने त्यांनी या समासात कवित्वाचे तीन-चार प्रकार सांगितले आहेत आणि कवित्व प्रकारांची नावे स्वामींनी स्वतः दिलेली आहेत.
क्षत्रियाने कधीही धीर न सोडता, तलवार चालवली तर ‘जय’ अवश्य प्राप्त होतो. समर्थ सांगतात की, जसा तोफेचा गोळा गवताच्या गंजीत निर्भयपणे शिरतो, तसे क्षत्रियाने मुसंडी मारून शत्रूच्या सैन्यात शिरले पाहिजे. अशा रीतीने सैन्यातील प्रत्येकजण उसळून आला, तर शत्रूसैन्याची पर्वा करण्याचे कारण नाही. मर्दाने आपली ताकद, आपला उत्साह न सोडता लढले तर ‘जय’ प्राप्त होतो. समर्थांची ही चढाई करण्याची रणनीती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती. परंतु, समर्थांचा विवेक येथेही दिसून येतो.
परमार्थातील परमोच्च तत्त्वे जशीच्या तशी ऐहिकात शिरल्यामुळे समाजाचे, लोकप्रपंचाचे राष्ट्रीयदृष्ट्या किती नुकसान झाले, यावर मागील लेखात चर्चा झाली आहे. समाजातील प्रपंचविज्ञानाच्या नुकसानीची जाणीव तत्कालीन धुरिणांना प्रकर्षाने झाली नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागते.
समर्थांनी इ. स. १६३२ ते १६४४ या १२ वर्षांच्या काळात तीर्थाटनाच्या निमित्ताने सर्व देश पायी फिरून पाहिला. सूक्ष्म अवलोकन, अभ्यासूवृत्ती, विवेक, वैराग्य, सहृदयता, शिस्त, बुद्धिमता, लोकोद्धाराची तळमळ इत्यादी गुणांचा स्थायीभाव असलेल्या समर्थांचे देशाटन करताना एकंदर लोकस्थिती पाहून अंत:करण दु:खित झाले. या भ्रमंती काळात ‘भिक्षामिसे लहानथोर परीक्षून सोडावी’ या सिद्धांतानुसार वाटचाल करीत असताना त्यांनी अनेक प्रकारचे लोक पाहिले. त्यात काही साधेभोळे, मंद होते, तर काही लबाड, पापी, तोंडाळ, करंटे, भिकारी असेही लोकांचे न
वेदांमधील शुद्ध ज्ञानाचे रक्षण करून ते एका पिढीपासून दुसर्या पिढीकडे नेण्याचेकाम करणार्या अलका मुतालिक यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
समर्थ रामदासस्वामींनी संप्रदायाची स्थापना करून त्याच्या कार्याची आखणी विचारपूर्वक केली होती. कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून स्वामी लोकांना भक्तिमार्गाला लावून संस्कृती रक्षण करीत होते. तत्कालीन अन्यायी, जुलमी राज्यसत्तेपासून सोडवणूक कशी करून घ्यायची, या विचारात असलेल्या लोकांना स्वामींचे सांगणे असे की-
दासबोधात स्वामींनी साधकाची लक्षणे (५.९ या समासात) सविस्तरपणे सांगितली आहेत. हा साधक सत्संगतीत राहून आपल्या संशयांचे निराकरण करुन घेण्याचा प्रयत्न करतो. श्रवणाकडे तो अधिक लक्ष देता. शास्त्रग्रंथांचे वाचन करुन आपल्या मनातील संशय त्यात कसा सोडवला आहे, हे तो पाहतो.
साधनमार्गात उपयोगी पडणार्या ग्रंथांची लक्षणे स्वामींनी दासबोधात विस्तारपूर्वक सांगितली आहेत. त्याचे थोडक्यात सार म्हणजे ज्याच्या अभ्यासाने विरक्ती येते, आपल्यातील दोष सुधारतात तो खरा ग्रंथ. ज्याच्या अभ्यासाने धैर्य उत्पन्न होते, परोपकाराची सद्बुद्धी होते, देहसुखाची लालसा मावळते तो ग्रंथ या नावास योग्य. ज्यातून परमार्थ साधना कळते, आत्मज्ञान प्राप्त होते तो खरा ग्रंथ.
आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सर्वप्रथम देहबुद्धीचा व अहंकाराचा निरास करावा लागतो, म्हणजे देहबुद्धीला व अहंकाराला दूर करावे लागते. हे दोन्ही सोडल्याशिवाय आत्मज्ञानाच्या प्रांतात प्रवेश करता येत नाही.
‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’, तुकारामांची अभंगगाथा आणि ‘दासबोध’ हे संतांचे ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे वैभव आहे. या ग्रंथकारांच्या कर्तबगारीवर व पुण्याईवर महाराष्ट्राचा भाग्योदय आधारलेला आहे. नैतिकता, चारित्र्य, भक्तिभाव, प्रामाणिकपणा, सत्य या संतांच्या शिकवणुकीतून महाराष्ट्राला आताही भाग्योदयाचा मार्ग दिसू लागेल.
मृत्यू केव्हा येईल, हे कुणालाच माहीत नसल्याने माणसाला सर्वकाळ मृत्यूसमयाची जाणीव ठेवून वागावे लागते. मृत्यूची जाणीव व त्याचे सामर्थ्य समजून घेतले तर आपले आयुष्य किती क्षणभंगूर आहे, याची साधकाला कल्पना येते व तो आपल्या साधनेपासून ढळत नाही. समर्थांनी दासबोधात ‘मृत्यू निरूपण’ नावाचा स्वतंत्र समास या उद्देशानेच लिहिला आहे.
नाठाळांना प्रसंगी डोक्यात काठी घालून समर्थांनी वठणीवर आणले आहे. आज समर्थ ग्रंथरुपाने वैचारिक प्रहार करीत आहेत. आपण त्यांचे अध्ययन करून त्याला सामोरे गेले पाहिजे. समर्थ विचारांचे फटके दासबोधातून आणखीही शोधता येतील. त्यासाठी साधकाची दृष्टी हवी.
आज ‘व्यक्तिमत्व विकास’ ही आधुनिक काळातील उपपत्ती आहे. पण, साडेतीनशे वर्षांपूर्वी ग्रंथलेखन करताना सहज जाता जाता स्वामी त्यातील तत्त्वांवर भाष्य करतात, हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. तसेच ते अभ्यासण्याजोगे आहे.
'भक्तिमार्ग' हा जरी या ग्रंथाचा मुख्य विषय असला तरी हा भक्तिमार्ग सर्वांगाने पुढे नेऊन त्याला 'प्रपंच-परमार्थ' जोडणारा आवश्यक घटक करावा आणि राष्ट्रभावनेची जाणीव देऊन राजकारणही त्यात समाविष्ट करावे, असे रामदासांच्या मनात होते. रामदासांनी आरत्या लिहिल्या, स्तोत्रे लिहिली आणि भक्तिपंथाची प्रशंसा केली.
शनिवार, दि. १४ मार्च रोजी नाथषष्ठी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने एकनाथ महाराजांच्या विचारमूल्यांचा घेतलेला हा धांदोळा...
माणसाने आपले मन प्रसन्न ठेवून आत्मसुधारणेच्या मागे लागावे. आळस टाकून प्रयत्न करावा. काही झाले तरी प्रयत्नांची कास सोडू नये. प्रयत्न करताना आजूबाजूच्या लोकांना खूश ठेवावे. कोणाचे मन दुखवू नये. निरपेक्षपणे प्रयत्नपूर्वक कार्य करीत राहिल्यास महंताचे गुण आपल्या ठिकाणी येतात व प्रारब्ध अनुकूल होते.
दुराचारी पापी लोकांना मृत्यूनंतर यमयातना भोगाव्या लागतात हे निश्चित, असे समर्थ म्हणतात. समर्थांच्या काळी दिल्लीतील औरंगजेबाने केलेला हिंदू प्रजेचा छळ समर्थांनी पाहिला होता आणि त्यासंबंधी विश्वासू लोकांकडून ऐकले होते.
प्रपंच परमार्थाचे चाक आज उलट्या दिशेने फिरून प्रपंचाला विलक्षण महत्त्व आले आहे. त्यातून परमार्थाची अवहेलना सुरू झाली आहे. परमार्थ विचार अनावश्यक झाले असून त्यांच्या हद्दपारीची भाषा लोक करीत आहेत. याचा समन्वय साधायचा तर पुन्हा दासबोधातील विचारांकडे वळावे लागेल.
‘समाजसंघटन’ करणे हे तसे अवघड काम आहे. गप्पांच्या कट्ट्यावर माणसे एकत्र येणे किंवा भजन-कीर्तन ऐकण्यासाठी जनसमुदाय एकत्र येणे अथवा निवडणुकांच्या काळात नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी माणसांनी गर्दी करणे याला ‘समाजसंघटन’ म्हणता येणार नाही. एकाविशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन समाजहितासाठी माणसे आपणहून एकत्र येतात, त्याला ‘समाजसंघटन’ म्हणतात.
ब्रह्म समजणे हे फार कठीण आहे. तरी समर्थांनी शास्त्राधारे सूक्ष्म कालगणना, विष्णू, महादेव, आदिशक्तीचे कालखंड सांगून त्याच्या पलीकडे असलेल्या परब्रह्माची माहिती दिली आहे. वस्तुतः या परब्रह्माचे वर्णन वेदही करू शकले नाहीत, आमच्या देहबुद्धीमुळे देहाचे मोठेपण वाटून आत्म्याचे मोठेपण आम्हाला समजत नाही, देहबुद्धी नाहीशी करुन, कोणत्याही कारणाने न बदलणाऱ्या परब्रह्माचा विचार करु तेव्हाच ब्रह्मनिरुपण समजले.
एकनाथांचा काळ हा समर्थांच्या अगोदरचा होता. स्वराज्याची पहाट अजून उजाडायची होती. तरीही एकनाथ महाराजांच्या मनात अनेक सामाजिक परिवर्तनाचे व राजकीय स्वातंत्र्याचे विचार होते. परकीय जुलमी सत्तेच्या काळात ते उघडपणे मांडणे अत्यंत कठीण होते. याची एकनाथांना कल्पना होती. रामदासांचा काळ हा नंतरचा आहे. त्यांनी त्यांच्या कल्पना व विचार स्पष्टपणे मांडून हिंदू संस्कृती रक्षण व त्यासाठी हिंदवी स्वराज्याला मदत करून रामराज्य आणणे हे आपले ध्येय निश्चित केले. असे असले तरी समर्थांनासुद्धा अनेक प्रसंगी आपल्या कार्याची, योजनांची
सुसंस्कृत, धाडसी, विवेकी, स्वामीनिष्ठ समाज घडवण्याच्या कामात रामदासांनी मोलाचे कार्य केले आहे. त्यामुळे शिवरायांच्या स्वराज्यास अनुकूल असा मराठी भाषिक समाज तयार होत गेला. क्षात्रवृत्तीने तो परकीय सत्तेच्या जुलमी कारभाराच्या विरोधात ठामपणे उभा राहिला. शिवरायांचे ध्येय राजकीय स्वातंत्र्य हे धर्म, देश व स्वराज्य रक्षणार्थ होते.
समर्थवाङ्मयाचे अभ्यासक समर्थांचा राजकारणाशी संबंध नव्हता, हे प्रथम गृहित धरतात व त्यानुसार पुरावे शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रा. फाटक हे त्यापैकी एक नसले तरी समर्थांचा राजकारणाशी संबंध होता, हे मानायला ते तयार नाहीत. प्रा. फाटकांचा दासबोधाचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी दासबोधातील ‘देवकारण’ व ‘राजकारण’ या दोन शब्दांचा उल्लेख केला आहे. समर्थांनी ‘राजकारण’ या शब्दासारखाच ‘देवकारण’ हा शब्द वापरला आहे.
समर्थांचा 'महंत' हा आध्यात्मिक पुढारी असला तरी त्याला समाज एकत्र आणण्यासाठी सामाजिक पुढाऱ्याची भूमिका बजवावी लागे. समर्थांच्या मते, नेत्यावर त्याच्या समुदायातील लोकांचा विश्वास तर हवाच, पण त्या समुदायाबाहेरील लोकांचाही त्याच्यावर विश्वास हवा.
प्रपंच ‘नेटका’ होण्यासाठी प्रापंचिकांना दिलेली शिकवण प्रपंचापुरती न राहता ती सामाजिक होऊन जाते. सामान्यपणे वार्धक्याची स्थिती सर्व समाजात याच स्वरूपाची असते. अशा रीतीने सामान्य माणसाच्या जीवनातील यथार्थता स्वामींनी दासबोधात मांडली आहे.
जुगार, चोरी, बाहेरख्यालीपणा, चहाडी, परस्त्रीगमन इ. वाईट सवयी असलेल्यांचे उल्लेख दासबोधात येतात. कृतघ्न, वाचाळ, भित्रे, निर्लज्ज, घाणेरडेपणाने राहणारे अशा लोकांचेही संदर्भ येतात. ही मूर्खांची लक्षणे आहेत.