( block on Central Railway to remove girder ) कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे डी-लॉन्चिंग करण्यासाठी शनिवार, दि. २९ व रविवार, दि. ३० रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
Read More
विलिनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव तसेच राहणार
कोकण रेल्वे मार्गावर मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना नेहमीच गर्दी असते. विशेषतः कोकणातील गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि यात ट्रेनचे तिकीट न मिळणे, रेल्वेला प्रचंड गर्दी यामुळे चाकरमान्यांचे हाल होतात. याच पार्श्वभूमीवर कोकणात गावी येण्यासाठी मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई येथील चाकरमान्यांना सोप व्हावे यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे होळी उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे २४ कोच गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १२ आणि १३ चा विस्तार करण्यात आला. या प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळे प्रवाशांची सोय आणि कार्यक्षमता वाढेल. हा प्लॅटफॉर्म ३०५ मीटरने वाढवण्यात आला असून एकूण लांबी ६९० मीटर झाली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी सीएसएमटी येथे नुकत्याच पूर्ण झालेल्या नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामांची आणि प्लॅटफॉर्म १२ आणि १३ च्या विस्ताराची पाहणी केली.
मध्य रेल्वेमार्गावर अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान पादचारी पुलाच्या मेन गर्डर लॉंचींगसाठी अंबरनाथ (सर्व क्रॉसओवर आणि साइडिंग वगळून) आणि वांगणी (सर्व क्रॉसओवर वगळून) दरम्यान, दि. २२/२३ फेब्रुवारी म्हणजेच शनिवार/रविवार मध्यरात्री १:३० ते ०३:०० वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मुंबईस्थित चाकरमानी होळीनिमित्त कोकणातील मुळगावी जाण्याच्या तयारीत असतात. कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव या दोन्ही सणांना विशेष महत्त्व आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
उत्तर प्रदेशमधील महाकुंभ मेळाव्याला जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या आठ विशेष सेवा धावणार आहे. प्रयागराज येथे सुरु असणाऱ्या कुंभमेळा- २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि बनारस तसेच नागपूर आणि दानापूर दरम्यान ८ अतिरिक्त विशेष सेवा चालवणार आहे. कुंभमेळा विशेषचे सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in संकेतस्थळावर विशेष शुल्कासह बुकिंग सुरू आहे. या विशेष गाड्यांमध्ये, सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जातील आणि तिकिटे यूटीएस द्वारे बु
रेल्वे मार्गाचे अपग्रेडेशन झाल्यानंतर पुणे-दौंड नंतर आता सोलापूर-दौंडदरम्यानच्या मार्गावरही रेल्वे गाड्या ताशी १३० कि.मी. वेगाने येत्या काही दिवसांत धावतील. लवकरच याची अंमलबजावणी होणार असून पुणे-सोलापूर या मार्गावर रेल्वे ताशी १३० धावणार आहे. दौंड-सोलापूर-वाडी विभागांत एकूण ४४ जोड्या रेल्वे (LHB रेकसह ८८ट्रेन सेवा) सध्याच्या ११० किमी प्रतितास वरून १३० किमी प्रतितास वेगाने धावतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वे दि. ०५ जानेवारी रोजी आपल्या उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेणारा आहे. याकाळात माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत आणि नेरुळ/बेलापूर-उरण पोर्ट लाईन वगळता पनवेल - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल, अशी माहिती मध्यरेल्वेने दिली आहे.
नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मध्य रेल्वेवर रविवार, दि.२९ रोजी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा ‘खोळंबा’होणार आहे.
नवीन वर्षांसाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन लाइन्स गिरगाव, दादर, माहिम, जुहू, वर्सोवा या पर्यटन स्थळी थर्टी फर्स्टचा आनंद घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. मुंबईकरच नव्हे तर पुणे, रायगड आणि राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेकडून खोट्या भरतीचा पर्दाफाश
भारतीय रेल्वेने धुक्याच्या परिस्थितीत गाड्यांना अधिक सुरळीतपणे धावण्यास मदत करण्यासाठी १९,७४२फॉग पास उपकरणे स्थापित केली आहेत. यामुळे एकूण प्रवासी सुरक्षितता वाढेल, विलंब कमी होईल आणि रेल्वे सेवा अधिक विश्वासार्ह बनतील. सोशल मीडिया साइट एक्सवरून रेल्वे मंत्रालयाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी म्हटले आहे की,“भारतीय रेल्वे देशभरात धुके सुरक्षा उपकरणांच्या अंमलबजावणीमध्ये अनेक पटींनी वाढ करून सतत सुरक्षा उपायांची हमी देते”.
मध्य रेल्वेने या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ५१.७३ दशलक्ष टन इतकी प्रभावी मालवाहतूक केली आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर-२०२४ महिन्यातील ६.७२ दशलक्ष टन समाविष्ट आहे. मध्य रेल्वेच्या अन्नधान्य, साखर, कंटेनर आणि पेट्रोलियम उत्पादने यांसारख्या वस्तूंच्या लोडिंग क्षेत्रात कामगिरी सुधारली आहे, ज्यामुळे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढीव लोडिंग साध्य करता आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मुंबई : ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेबांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे आदरांजली वाहण्यासाठी राज्य आणि देशातून मोठ्या संख्येने येतात. यासाठी मध्य रेल्वेने ( Central Railway ) महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या आहेत.
मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीचे उपाययोजना करण्यासाठी विविध निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. याचाच भाग म्हणून मध्य रेल्वे शुक्रवार,दि. ६ डिसेंबर रोजी निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालणार आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मध्य रेल्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दि. ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री (गुरूवार-शुक्रवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
भारतीय रेल्वेने अलीकडेच विविध झोन, विभाग आणि कार्यशाळा यामधील गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी आणि तांत्रिक श्रेणी या दोन्हींमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली होती. देशभरातील २१ रेल्वे भर्ती बोर्डमार्फत ही अधिसूचना जारी करण्यात आली होती.
मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या दादर स्थानकावरील फलाट क्रमांक बदलण्यात आले आहे. दादर स्थानकातून मेल गाडयांनाही थांबे देण्यात येतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांचा गोंधळ होतो. अशातच दोन्ही मार्गांवरही समान फलाट क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. हा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मध्य रेल्वेने दादर स्थानकावर रात्री १२ वाजेपासून aलागू केला आहे.
१ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षणदलाने एकूण ४१४ मुलांची सुटका केली आहे. या मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी एकत्र येण्यास मदत केली. रे
महाराष्ट्रात आज दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया आरामात आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रेल्वे, मेट्रो १, मेट्रो ३ आणि मेट्रो २ए आणि ७ तसेच, बीएसटीनेही त्यांच्या सेवा पहाटे ४ ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वसामान्यांचा रेल्वे प्रवासाकडे कल वाढतो आहे. हे पाहता प्रवाशांना वेळेत तिकीट उपलब्ध व्हावे आणि रेल्वे प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेने गेल्या तीन महिन्यांत विविध गाड्यांमध्ये सामान्य श्रेणीचे (GS) सुमारे सहाशे नवीन अतिरिक्त डबे जोडले आहेत. एवढेच नाही तर चालू नोव्हेंबरच्या अखेरीस सुमारे ३७० नियमित गाड्यांमध्ये असे एक हजाराहून अधिक सामान्य श्रेणीचे डबे जोडले जाणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. रेल्वेच्या ताफ्यात हे नवीन डबे जोडल्यामुळे दररोज सुमारे एक लाख प्रवाशांना फायदा होईल असा अंदाज आहे
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने ( Local ) रात्रकालीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) ते कल्याण आणि पनवेल यादरम्यान धिम्या मार्गावर बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या गाड्या सोडण्यात येणार आहेत. निवडणूक कर्तव्य बजावणार्या अधिकारी, कर्मचार्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनादेखील या सेवांचा फायदा होणार आहे.
मध्य रेल्वे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कर्मचारी आणि जनतेच्या हालचाली सुलभ करण्यासाठी दि. १९-२० नोव्हेंबर (मंगळवार-बुधवार रात्री) रोजी आणि दि. २०-२१ नोव्हेंबर (बुधवार-गुरुवार रात्री) रोजी विशेष उपनगरीय गाड्या चालवणार आहे. या गाड्या मेन लाइन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण) आणि हार्बर लाईन (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल) वर खाली सूचीबद्ध केलेल्या सुटण्याच्या आणि आगमनाच्या वेळेसह चालतील.
मुंबई, पुणे, नागपूर इ. येथून देशभरातील विविध स्थळांसाठी विशेष गाड्या
मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या "ऑपरेशन नन्हे फरिश्ते" अंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हरवलेल्या ८६१ बालकांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात रेल्वे संरक्षण दलाला यश आले आहे. त्यामुळे नन्हें फरिश्ते हे रेल्वे स्थानकावर हरविलेल्या बालकांसाठी सुरु करण्यात आलेल्या अभियानाला यश मिळत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.
दिवाळी, छटपूजेसारख्या सणासुदीच्या काळात रेल्वेला होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते. मात्र, सणासुदीचा काळ संपल्याने ९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या ऑन ड्युटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या हरवलेल्या व विसरलेल्या मौल्यवान वस्तू परत करण्याबाबत दाखविलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल प्रवाशांनी भारतीय रेल्वेचे आभार मानत कौतुक केले. मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा दलाने जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ याकाळात तब्बल ४.६० कोटी रुपयांच्या वस्तू आणि सामान शोधले व प्रवाशांना परत केले आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. नुकतेच वांद्रे टर्मिनस येथे अंत्योदय एक्स्प्रेसच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलत नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार आता विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई लोकलने प्रवास करताना वैध तिकीट घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या मध्यमातून वारंवार केले जाते. मात्र तरीही सातत्याने तिकीट न काढता नागरिक प्रवास करताना आढळून येतात. याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वे या विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विविध मोहीम आखत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून मध्य रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात नवदुर्गा तेजस्विनी ही विशेष मोहीम राबवत तब्बल ११ हजार विनातिकिट प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून मध्य रेल्वेने ३३ लाख ९८ हजार ५०८ इतकी रक्कम दंडापोटी वसूल केली.
मुंबई उपनगरीय लोकल सेवेद्वारे दररोज लाखो प्रवासी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून पश्चिम आणि मध्य रेल्वेवरून ये-जा करतात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी १७ स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. सुमारे ९४७ कोटी रुपये खर्च करून ही विकास कामे करण्यात येत असून प्रवाशांसाठी विविध सुविधांची निर्मिती आणि स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी यांनी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सुरु विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतला. याच पार्श्वभूमीवर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया.
ओव्हर हेड वायर तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि लोकल जागच्या जागी थांबल्याची घटना डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे मार्गावर घडली.
रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी, तसेच देखभाल-दुरूस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवार, दि. 27 जुलै रोजी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवार, दि. 28 जुलै रोजी दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. दरम्यान, ब्लॉक कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चुनाभट्टी / वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (ACP) पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' या मध्य रेल्वेच्या अनोख्या उपक्रमाअंतर्गत आता दादर रेल्वेस्थानकाबाहेरील 'दादर दरबार' हे उपहारगृह रेल्वे प्रवाशांना उत्तम जेवणाचा आनंद देण्यासाठी सज्ज झाले आहे. मध्य रेल्वेने जुन्या रेल्वे डब्यांना उपहारगृहामध्ये रूपांतर करण्याची ही संकल्पना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. याच पार्श्वभूमीवर बँड वॅगनमध्ये सामील होणारे नवीनतम रेस्टॉरंट ऑन व्हील्स हे "दादर दरबार" आहे जे मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर उघडण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे आता सुसाट धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील टिळकनगर-पनवेल विभागावरील गाड्या ताशी ९५ किमी वेगाने धावतील. त्यामुळे धीम्यागतीने धावणाऱ्या या लोकल रेल्वे आता सुसाट वेगात धावणार आहेत.
पावसाळ्यात विना विलंब आणि विनाअडथळा लोकल वाहतूक सुरु राहावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे टीमने मे-जून-२०२४ दरम्यान १.५५ लाख घनमीटर गाळ काढला असल्याचा दावा केला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने नेरळ ते अमन लॉज मिनीट्रेन सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या सुरू राहणार आहेत.
पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गातील सर्वाधिक लांबीच्या वावर्ले बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. सध्या ठाणे-दिवा दरम्यानचा पारसिक बोगदा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा आहे. मुंबईतील सीएसएमटी कर्जत मार्गावर धावणाऱ्या लोकलवर ताण येत असल्याने प्रवाशांना प्रवास गैरसोयीचा सामना करावा लागतो.
मध्य रेल्वेने लोकल रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने भायखळा स्थानकावर फलाट क्रमांक १ वर नवीन स्वच्छतागृहाची उभारणी केली आहे. भायखळा येथील अमृत स्थानक योजनेअंतर्गत पुरुषांसाठी ०२ शौचालय आणि दिव्यांगजनांसाठी ०१ प्रसाधनगृह आणि महिलांसाठी १ , महिला दिव्यांगांसाठी ०१ स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत अजून २ शौचालयाचा स्थानकावर समावेश आहे. एक फलाट नंबर १ वर (कल्याण च्या शेवटी) आणि दुसरा प्लेटफॉर्म नंबर ४ वर (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या शेवटी) जवळपास तयार आहेत. हे स्वछतागृहे देखील
मध्य रेल्वेवरील ३ दिवसीय जम्बो मेगाब्लॉक कालावधीत राज्य निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य होणार नसल्याने सदर दिवसांची भरपाई देण्यात यावी, असे परिपत्रक राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर आजपासून ६२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.३० मे रोजी रात्री पासून हा ब्लॉक सुरू होईल. डाऊन फास्ट लाईन साठी ६२ तासांचा तर, अप स्लो लाईनवर १२ तासांसाठी हा ब्लॉक असणार आहे. दरम्यान, १ आणि २ जूनला सीएसएमटी स्थानकात ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केले आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सर्वाधिक प्रभावित लोकलसेवा होते. हे पाहता पावसाळा काही आठवड्यांवरच आला असताना आता मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विस्तृत नेटवर्कवर अखंड सेवा आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवित आहे. पावसाळ्यात रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि मान्सूनसाठी संचलन सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वतयारीसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
चोवीस डब्यांच्या मेल एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक १०-११ ची लांबी वाढवण्याचे काम सुरू आहे. मध्य रेल्वेकडून हे काम सुरू आहे. अभियांत्रिकी-विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलॉकिंग कामे करण्यासाठी मध्य रेल्वेकडून मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. २३ मे ते १ जूनपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या काळात काही ट्रेन रद्दही करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे टिटवाळा ते सीएसएमटीला जाणाऱ्या ट्रेन २० मिनिटे उशीराने धावत आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. सकाळी ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून आला.
पनवेल कर्जत रेल्वे मार्गावर मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून बोगद्यांची कामे वेगाने सुरू आहेत. २०२५मध्ये या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे.