Land jihad मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील व्हीव्हीआयपी परिसरात सरकारी निवासस्थानी दोन कबरींचे बांधकाम करण्यात आले होते.महत्त्वाची बाब अशी की, ही जागा माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि तमाम आयएएस ते सरकारी निवासस्थानांपासून फक्त १ किमी अंतरावर आहे. मात्र, संबंधित प्रकरणाची माहिती अद्यापही कोणत्याच अधिकाऱ्याला मिळाली नव्हती. हे प्रकरण समोर आल्यानंतर हिंदू संघटनांनी संबंधित प्रकरणास लँड जिहाद असे नाव दिले आहे.
Read More
देशातील उत्तराखंड राज्यात दशकांपूर्वी बांधलेल्या बेकायदेशीर मशिद पाडण्याची मागणी केली आहे. देवभूमीत बेकायदेशीर बांधण्यात आलेले बांधकाम हटवण्याची आज खरी गरज असल्याचे उत्तरखंड येथील हिंदूंचे म्हणणे आहे. हिंदू गटांनी लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या घटनांविरोधात लोकांना एकजुटीचे आवाहन केले आहे.
केरळ मधील वायनाड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जात आहे. त्याच बालेकिल्यात आता वक्फचे वर्चस्व बघायला मिळते आहे. वायनाड मधील तळपुझा या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. यामुळे सबंध परिसारात एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये एकूणच भीतीचे वातावरण पसरले आहे.
(Shirish Maharaj More) चौदाशे वर्षांपासून भारत आणि हिंदूंवर अन्याय अत्याचार होतच आहेत. ते संपले, असे छातीठोकपणे कोणीही सांगू शकणार नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही गावागावात जाऊन अनेकांना समजवण्याचा प्रयत्न करतोय. या घटनांविरोधात आम्ही हिंदू समाज म्हणून एकवटायला हवे. ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’, धर्मांतरण हे विष आपल्या घरांपर्यंत पोहोचत आहे. येत्या काळात एक झालो नाही, तर हिंदू रसातळाला जाईल, असे मत संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी व्यक्त केले. त्यांनी दै. ‘मुंबई तरु
Land Jihad मध्य प्रदेशात जबरलपूर हिंदू संघटनांनी लँण्ड जिहादचा आरोप केला आहे. अनेक शतकानुशतके जुन्या मंदिरांवर कब्जा करण्यात आला आहे. त्याठिकाणी कबर बांधून ही जागा वक्तची असल्याचा दावा वक्फ बोर्डाने केला असल्याचा हिंदूंनी आरोप केला आहे. मात्र आता याविरोधात कारावाईची मागणी हिदूंनी केली आहे. या जागेचे इस्लामीकरण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मुंबई : “वक्फ बोर्ड’ सुधारणा विधेयक आणण्याची मुळात गरजच नाही. कारण, संविधानात ‘वक्फ’ शब्दाचा उल्लेखच नाही. त्यामुळे ‘वक्फ अॅक्ट १९९५’ पूर्णतः नष्ट झाला पाहिजे,” असे स्पष्ट मत हिंदू मंदिरांसाठी कायदेशीर संघर्ष करणारे वरिष्ठ अधिवक्ता अॅड. विष्णू शंकर जैन ( Vishnu Shankar Jain ) यांनी व्यक्त केले.
निवडणुकांच्या तोंडावर हिंदूंनी आपल्यातील भेदाभेद बाजूला ठेवून केवळ एक हिंदू म्हणून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने केवळ हिंदूहिताचा विचार करायला हवा. महाराष्ट्रातल्या निवडणुकीबाबत सांगायचे झाल्यास, हिंदूहित पर्यायाने देशहित साधण्यासाठी हिंदूंनी काहीही संभ्रम न बाळगता, एक जागरूक हिंदू म्हणून केवळ महायुतीने दिलेल्या उमेदवाराचाच विचार करायला हवा.
शेतकऱ्यांच्या जमीनी बळकवण्याचा प्रयत्न केल्या नंतर, कर्नाटकतील वक्फ बोर्डाने आपला मोर्चा ऐतिहासिक वास्तूंकडे वळवला आहे. वक्फ बोर्डाने कर्नाटकातील किमान ५३ ऐतिहासिक वास्तूंवर दावा केला आहे, ज्यावर सध्या काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. या स्मारकांमध्ये गोल गुम्बाझ, इब्राहिम रौझा, बारा कामन, बिदर आणि कलबुर्गी येथील किल्ले आणि इतरांचा समावेश आहे. ५३ पैकी ४३ स्मारके कर्नाटकातील विजयपुरा (जी एकेकाळी आदिल शाह्यांची राजधानी होती) येथे आहेत. ६ हम्पीमध्ये आहेत तर ४ बेंगळुरू सर्कल येथे स्थित आहेत.
Illegle Masjid मध्य प्रदेशातील जबलपूर येथे मंदिराच्या जागी अवैध मशीद (Illegle Masjid) बांधल्याने हिंदू एकवटले आहेत. लँड जिहादचा आरोप करत हिंदू संघटनांनी गुरूवारी २६ सप्टेंबर रोजी निदर्शने केली. या मशिदीवर बुलडोझर चालवण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे. १० दिवसांत कारवाई न झाल्यास कारसेवाही जाहीर करण्यात आली आहे. कट्टरपंथी समाजातील लोकांनी हिंदू संघटनांनी केलेले दावे फेटाळून ही जमीन स्वत: ची असल्याचे सांगितले. प्रशासनाने दोन्ही पक्षांना समजावून सांगून चौकशी सुरू केली आहे.
(Dharavi Land Jihad) धारावीतील ९० फूट रस्त्यावरील सुभानिया मशिदीचे अतिक्रमित बांधकाम काढण्यासाठी दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी पालिकेचे पथक त्याठिकाणी पोहोचले होते. २५ वर्ष जुन्या या सुभानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम पाडू नये यासाठी संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या पथकाला रोखले. पालिकेच्या वाहनाच्या काचांची तोडफोड केली. पालिकेच्या पथकाचा रस्ता अडवण्यात आला. इतक्या मोठ्या संख्येने जमाव अचानक जमा झाल्याने आधीच मशिदीच्या नावे फतवे काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे धारावीतील लँड जिहादचे
Land Jihad लँड जिहादविरोधात (Land Jihad) छत्तीसगड येथील भिलाईच्या महानगरपालिकेच्या पथकाने अवैध अतिक्रमण उद्घ्वस्त केले. करबला समितीने धार्मिक बाबींसाठी संबंधित जागा दिली होती. मात्र त्या जागांवर कट्टरपंथींनी दुकाने, हॉल बांधले आहेत. यामुळे आता उच्च न्यायालयाने महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने संबंधित जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सांगितले. यामुळे महापालिकेच्या पथकाने संबंधित जागेवरील अतिक्रमण हटवण्याचे काम केले आहे.
Waqf Board हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे लँड जिहादचे धक्कादायक प्रकरण आढळून आले आहे. कोरोनाकाळात बेकायदेशीर जागेत मशीदीवर तीन मजले बांधण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे संतप्त हिंदू जमावाने मोर्चा काढत निदर्शन केले. तसेच मशीदीच्या भोवताली अनेक कट्टरपंथींनी बेकायदेशीर दुकाने उघडली आहेत, यामुळे वातावरण बिघडवण्याचे काम कट्टरपंथी करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ही घटना शिमला येथील संजौली येथे घडली आहे.
Land Jihad आदिवासी लोकांच्या जागेवर कट्टरपंथींनी ताबा मिळवला आहे. झारखंड येथील जामताड़ा जिल्ह्यातील ही घटना आहे. आदिवासी लोकं ज्या ठिकाणी देवाची पूजा करायचे त्याच जागेवर कट्टरपंथींनी कबर बसवल्या आहेत. याचा अर्थ कट्टरपंथींनी जामतडा येथील आदिवासींच्या जागेवर ताबा मिळवला आहे. यामुळे हे लँड जिहादचे प्रकरण बोलले जात आहे. यामुळे झारखंड येथील आदिवासी आणि कट्टरपंथींमध्ये वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी भाजपने हेमंत सोरेन यांना धारेवर धरलं आहे, त्यांच्या सरकारला जाब विचारलेला आहे.
शहरात मागासवर्गीय समाजातील व्यक्तीच मोठ्या प्रमाणात ‘लॅण्ड जिहाद’चा बळी होताना दिसते. कधी दहशतीने, कधी बेकायदेशीररित्या तर कधी कायद्याच्या पळवाटांचा आधार घेत ‘लॅण्ड जिहाद’च्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाच्या बांधवांचे जमीन, घर अतिक्रमित करणे या घटना सर्रास घडताना दिसतात. या परिक्षेपात ‘लॅण्ड जिहाद’चे वास्तव काय आहे? याचा मागोवा घेणारा हा लेख...
भारतातच नाही, तर २०१० ते २०२१ या काळात जपानमध्येही मुस्लिमांची लोकसंख्या ११० पटीने वाढली. त्यांना आता कब्रस्थान अपुरी पडत आहेत. त्यामुळे मृतदेह दफन करण्याऐवजी चक्क जाळावा लागतो. नवीन दफनभूमीसाठी परवानगी द्या, अशी मागणी तेथील मुस्लीम करतात. मात्र, भूजल प्रदूषण होईल, म्हणून एकही नवीन दफनभूमी नको, या भूमिकेवर जपानी नागरिक ठाम आहेत. त्यांना वाटते की, जपानी मुलींशी निकाह करून जपानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढली. म्हणजे आता लोकसंख्यावाढीसाठी निकाह?
सोलापूर आणि मालेगावात वक्फ बोर्डाकडून लॅण्ड जिहाद सुरू आहे. एका विशिष्ट समाजाचे लोक येथील रहिवाशांना वारंवार त्रास देऊन घर सोडून जाण्यासाठी भाग पाडत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेत केली.
योगीजींनी ज्याप्रमाणे बुलडोझर पॅटर्न आणलं तसाच आता महाराष्ट्रात 'बुलडोझर देवा' नावाचा पॅटर्न सुरु झालेला आहे, अशी माहिती भाजप आमदार नितेश राणेंनी दिली आहे. रविवारी रात्री मीरा रोडच्या नया नगर परिसरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यास सुरुवात झाली.
बांग्लादेशमध्ये हिंदू समुदायातील लोकांचा कट्टरपंथीयांकडून छळ होत असल्याने त्यांना आपले घर सोडून स्थलांतर करावे लागत आहे. येथील कट्टरपंथीयांकडून होणाऱ्या हिंदू समाजातील महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या हत्येमुळे लँड जिहादसारख्या घटना घडत आहे.
“धर्म आणि संस्कृतीला सर्वात जास्त धोका हा जातीनिहाय जनगणना, ‘लव्ह जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’ यांचा आहे. पण, ज्या देशात धर्म आणि संस्कृती टिकून आहे, तिथे या कोणत्याही समस्या नसतात,” असे मत दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. उज्ज्वला मंडळ, कल्याणतर्फे शारदोत्सवअंतर्गत ‘धर्म, संस्कृती आणि समस्या’ या विषयावर बुधवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी व्याख्यान आयोजित केले होते, यावेळी साळवी बोलत होत्या. अभिनव विद्यामंदिर, कल्याण येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निलेश लिमये, डॉ. रत्नाकर फाटक, दी
लव्ह जिहाद पाठोपाठ आता 'लँड जिहाद' ने डोकं वर काढले असून या प्रकरणात दस्तरखुद्द प्रशासनातील काही मंडळी झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. यासंदर्भात उच्च स्तरावरून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असे लेखी निवेदन राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. कुणी म्हणेल साप-साप म्हणत भुई थोपटत आहात; पण ‘लव्ह, ड्रग्ज आणि लॅण्ड जिहाद’चा कली आता भस्मासूर होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी समाजाला या सगळ्यांपासून सुरक्षित ठेवायचे असेल, तर संस्कार, संस्कृती आणि धर्मजागृती आवश्यक आहे . यासंदर्भातला उहापोह करणारा हा लेख...
भाईंदर : राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत माजलेल्या अनागोंदीचा फायदा घेत दोन वर्षांपूर्वी भाईंदरमध्ये तब्बल २४ एकर सरकारी जमिनीवर इस्लामी अतिक्रमण करण्यात आले आहे. ’लॅण्ड जिहाद’चे हे प्रकरण ’हिंदू टास्क फोर्स’ने केले उघड केले आहे.
उत्तराखंड : उत्तराखंडमधील पुरोला येथे मुस्लिम लोकसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. पुरोला येथील स्थानिक लोक म्हणाले की, मुस्लिम लोकसंख्या आणि त्यांचे व्यवसायावरील वर्चस्व यांमुळे येथील जनता त्रस्त असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पुरोला येथील अनिल अस्वाल यांचा दावा आहे की, सन १९७८ मध्ये येथे मुस्लिमांची फक्त 3 कुटुंबे होती. आजमितीस त्याच पुरोळ्यात ४० हून अधिक मुस्लिम दुकाने असल्याचे ते म्हणाले. या दुकानांमध्ये अनेकांनी कायमस्वरूपी वस्ती केल्याचा दावा केला जात आहे. अनिल यांच्या म्हणण्यानुसार, ही ४० दुकाने
अनधिकृत मशिदी, मजारी, दर्गे, पीर उभारून जागा बळकावण्याच्या प्रकाराविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ( मनविसे) ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा - भांजे डोंगरावरील 'लँण्ड जिहाद' उघडकीस आणला आहे. पर्यटकांचा राबता असलेल्या येऊरमधील या मामा-भांजे दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हेरी हिल येथील भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाला आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींनी लॅण्ड जिहादविरोधात आघाडी उभी केली आहे. देवभूमीवर होणाऱ्या जिहादी आक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. देवभूमीवर सुरू असलेल्या मजार जिहादाला खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील अधिक माहिती देताना धामी म्हणाले की, "आमच्या सरकारने एक हजार बेकायदा मजारींची यादी तयार केली."
“देशभरात श्रद्धा वालकरसारख्या घटना मोठ्या संख्येने घडत आहे. वनवासी बांधवांसह अनेक हिंदूधर्मीयांचे आमिष दाखवून धर्मांतरण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर धर्मांतरण विरोधात तत्काळ कायदा करून भारताला हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करा, अशी मागणी सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी केली.
देशभरात वाढत असलेले ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार, ‘लॅण्ड जिहाद’, धर्मांतरण याविरोधात नाशिकध्ये मराठी नववर्षदिनाच्या दिवशी हिंदू हुंकार जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेतून हिंदू राष्ट्र निर्माणाची हाक देण्यासाठी साधू-महंत तसेच लाखो हिंदू भाविकांच्या उपस्थितीत सभा होणार असल्याची माहिती स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. बुधवार, दि. २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदनावर सभा होणार आहे.
हिंदू धर्माच्या मुळावर येणार्या ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने दि. १२ मार्च रोजी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते. मोर्चेकर्यांच्या हातात भगवे झेंडे आणि फेटे परिधान केलेल्या जनसमुदायामुळे येथील रस्त्यावर भगवे वादळ जाणवत होते.
वसई विरार महानगरपालिकेतर्फे वसई रोड (पश्चिम)येथील सनसिटी येथे निर्माण करण्यात येणाऱ्या स्मशानभूमीत कबरस्थान ही तयार करण्यात येत असून ती जागा ही हिंदू बहुल असल्याने येथे दफनभूमी निर्माण करण्यात येत असल्याचा निषेध करून हजारोंच्या संख्येने वसई विरारमधील हिंदू बांधवांनी जनआक्रोश मोर्चा काढला होता . दि. २६ फेब्रुवारीला निघालेल्या या मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग होता. यावेळी जय श्रीराम , वंदे मातरम अश्या घोषणांसह हनुमान चालीसा पठण करण्यात आली. तसेच कबरस्थान विरोधी विविध फलक मोर्चातील सहभागीच्या हातात होते. हा मो
‘श्री श्री शंकर देव सेवा समिती’ आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून महापे येथे ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ सभेचे शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेच्या प्रमुख वक्ता समाजसेविका साक्षी गायकवाड म्हणाल्या की, “ ‘लव्ह जिहाद’ म्हणजे भारतीय समाज आणि संस्कृतीला प्रताडित करण्याचे षड्यंत्र आहे.” यावेळी ‘लव्ह जिहादमुक्त नवी मुंबई’ या विषयी प्रास्ताविक गायत्री गोहाँई यांनी केले. नवी मुंबईमध्ये घडलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटना आणि त्यांचे परिणाम त्यांनी मांडले. तसेच, रविवार, दि. २
सकल हिंदू समाज वसई, विरार आणि नालासोपारातर्फे येत्या रविवारी (दि. २६ फेब्रुवारी) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ विरोधात वसईत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘अब फिर एक बार हिंदुओकी हुंकार’ची घोषणा घेऊन रविवारी सकाळी ९.३० वाजता वसई पश्चिमेतील सन सिटी येथे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. वसईच्या श्रद्धा वालकरची झालेली निर्घृण हत्या, अवैद्य प्रार्थनास्थळे, भूमी जिहाद आदी विरोधात हा मोर्चा असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळेंचा म्हणाल्या की, एकविसाव्या शतकात ५जी फोन आलेत. आपल्याला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून बसून कळेल की अमेरिकेचा राष्ट्रअध्यक्ष काय करतोय. तसेच 'लव्ह' चा अर्थ मला माहिती आहे. पंरतू ' लव्ह जिहाद'चा अर्थ मला माहित नाही. तसेच नव्याने 'लँण्ड जिहाद' नाव माझ्यासमोर आले आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत हे मला माहित नाहीत, असे विधान सुप्रिया सुळेंनी भर सभेत केले आहे.
‘कब्रस्तान हटाओ, आरे कॉलनी बचाओ’, ‘नही बनेगा, नही बनेगा, मंदिर के बाजुमे कब्रस्तान नही बनेगा,’ अशा गगनभेदी घोषणांनी रविवारी, दि. 12 फेब्रुवारी आरे कॉलनीतील राम मंदिर परिसर दुमदुमला होता. सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने हिंदू बांधवांची उपस्थिती होती.
आजच्या मोर्चात आम्ही केवळ हिंदू म्हणून सहभागी झालो आहोत. कुठलाही राजकीय अभिनिवेश किंवा राजकीय भूमिका या सहभागाच्या मागे नाही. लोकांनी सर्वप्रकारच्या भिंती तोडून एक हिंदू म्हणून पुढे येणे आता गरजेचे बनलं आहे आणि त्यासाठी हा मोर्चा नक्कीच मोठी भूमिका बजावेल. ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ या दोन मुख्य मुद्द्यांवर मुंबईतील हिंदू समाज आक्रमक बनला असून त्यावर मोठी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या सर्व घटनांना रोखण्यासाठी आम्ही कायद्याची मागणी करत आहोत आणि तो कायदा नक्कीच होईल. हिंदूद्रोह्यांना हिंदूंची ताक
‘ऐसा कोई सगा नहीं नीतीशने जिसको ठगा नहीं।’ होय...हे खरयं. बिहारच्या राजकारणात स्वतःला विकासपुरूष म्हणून मिरवून घेणार्या नितीश कुमार यांनी धोका दिलेल्या लोकांची यादी खूप मोठी आहे. आधी देवीलालनंतर लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव आणि मागे भाजपसोबतही त्यांनी दगाबाजी केली. नुकतेच भाजपत येण्याच्या प्रश्नावर त्यांना विचारले असता त्यांनी मी मरेन, पण भाजपसोबत जाणार नाही, असे म्हटले.
भाजप नेते अजयेंद्र अजय यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून सरना गावातील समाजातील लोकांना त्यांची जमीन कवडीमोल भावाने विकत घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या रहिवाशांनी आमिष दाखवले आणि धमकावल्याचा आरोप केला होता.
“भाजपच्या जाहीरनाम्यात आसामसाठी अनेक गोष्टी आहेत. मात्र, त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आसाममध्ये पुन्हा सत्तेत आल्यावर भाजप ‘लव्ह’ आणि ‘लॅण्ड जिहाद’विरोधी कठोर कायदा करेन,” असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी आसाममध्ये प्रचारसभेत दिले.
आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे रण चांगलेच तापले आहे. आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर भाजप ‘लव्ह’ आणि ‘लॅण्ड जिहाद’विरोधी कठोर कायदा करेन असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी आसाममध्ये प्रचारसभेत दिलंय. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’विरोधी कायदा नक्की काय? आसामच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून याकायद्यांचे महत्व जाणून घेऊया.