आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवरही कल्ला केला होता. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. कोकणातील लोककथेवर आधारित ‘मुंज्या’ यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी थेट टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
Read More
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. अभिनेत्री शर्वरी वाघ आणि अभिनेता अभय वर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला हा हॉरर कॉमेडी चित्रपट कमी कालावधीत १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. बॉक्स ऑफिसवर कल्की २८९८ एडी चित्रपटाची लाट आलेली असतानाही मुंज्याने चांगलाच तग धरला आहे. मुंज्याने २० व्या दिवसापर्यंत बॉक्स ऑफिसवर ९० कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर आता 'मुंज्या'ने भारतीय बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची यशस्वी कमाई केली आहे.
मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हिंदीतील पहिला दिग्दर्शकीय चित्रपट मुंजा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. कोकणातील मुंजाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आदित्य यांनी केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला तुफान यश मिळाले असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृह आणि बॉक्स ऑफिस गाजवत आहे. मुळात म्हणजे या चित्रपटात कोणताही मोठा स्टार कलाकार नसूनही हा चित्रपट केवळ कंटेटच्या जोरावर सुपरहिट ठरला आहे. ७ जून रोजी हे कोकणातील हे भूत अर्थात 'मुंज्या' प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि आता या चित्रपटाने १२ दिवसात ६५ कोटींचा टप्पा पार केला आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा हिंदी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींच्या पुढे यशस्वी कमाई केली आहे. मुंज्या चित्रपटातील चेटुकवाडीबद्दल आदित्य सरपोतदार यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित झाला. कोकणातील जुन्या परंपरेवर आधारित या चित्रपटाचे कथानक असून हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई केली असून २० कोटींचा टप्पा पार केला आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'मुंज्या' चित्रपट सध्या प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत आहे. शिवाय बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील तुफान झाले असून प्रेक्षक चित्रपट पाहायला गर्दी करत आहेत. ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट असून ती लेगसी या चित्रपटाने देखील कायम ठेवली याचा विशेष आनंद आणि कौतुक आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची बॉक्स ऑफिसची कमाई समोर आली आहे.