आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात आर्थिक सेवा आणि त्यांच्या प्रभावी वापराचे ज्ञान हे यापुढे चैन राहणार नसून, ते समान आर्थिक वृद्धी आणि विकासासाठी गरजेचे ठरणार आहे. आज देशातील आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये उल्लेखनीय प्रगती असूनही, भारतातील लाखो लोकांमध्ये मूलभूत आर्थिक साक्षरतेचा ( Financial Literacy Needs ) अभाव दिसून येतो, ज्यामुळे औपचारिक आर्थिक सेवांच्या संभाव्य वापराची त्यांची क्षमता मर्यादित आहे. या अज्ञानामुळे व्यक्तींना बचत आणि गुंतवणुकीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मर्यादा येतात.
Read More
‘टोरेस’ कंपनीच्या बातम्या सध्या चर्चेचा विषय ठरल्या. अनेकांनी यात सरकारला दुषणेही दिली. पण, अशा घोटाळेबाज कंपन्यांना चाप कसा बसेल? अशा अन्य कंपन्यांवर काही कारवाई होणार नाही का? सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असतानाही गुंतवणूकदार अशा प्रलोभनांना ग्राहक बळी का पडतात? घोटाळेबाजांना चाप कसा बसणार? याचे हे आकलन.
स्वत:सोबतच अनेकांच्या आयुष्यात आर्थिक साक्षरता आणि सक्षमता आणणार्या विक्रोळीच्या मानसी मिलिंद शिंदे ( Manasi Shinde ) यांच्या आयुष्याचा मागोवा घेणारा लेख...
अमलीपदार्थ आणि ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या घटनांमुळे चर्चेत आलेल्या पुण्यातील साक्षरतेचे प्रमाण घटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण हे अकोला, अमरावती, वर्ध्यापेक्षाही कमी; तर मुंबई उपनगर जिल्हा राज्यात सर्वाधिक साक्षर असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे. सगळ्यात कमी साक्षरतेचे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे.
भारतीय राज्यघटना ही पूर्णतः लोकशाहीवर अवलंबून आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांचे, लोकांकरिता चालविलेले राज्य होय. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. भारतीय राज्यघटनेवर विविध पाश्चात्य राज्यघटनांचा प्रभाव आहे. भारतीय राज्यघटना ही अत्यंत साधी, सरळ, सोपी, लिखित व लवचिक आहे. ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या चार मूल्यांवर आधारित आहे.
आज दि. २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस ‘संविधान दिन’ किंवा ‘राष्ट्रीय विधी दिन’ म्हणूनही देशभरात साजरा केला जातो. कारण, दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा संविधान सभेने स्वीकारला. त्यानिमित्ताने संविधान साक्षरता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान चिंतन आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार यांचे महत्त्व अधोरेखित करणारे लेख...
आपल्या जीवनव्यवहारात संविधानाचे अस्तित्व सामावलेले आहे. पण, तरीसुद्धा संविधानाविषयी साक्षरतेची गरज वारंवार अधोरेखित होते. अर्थात, ती साक्षरतादेखील अधिक डोळस असायला हवी. त्यादृष्टीने अजून प्रयत्न करण्याची गरज दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. समाज संघर्षमुक्त, विषमतामुक्त करायचा असेल, विकास लोकाभिमुख व व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त करायची असेल, तर संविधान साक्षरतेची गरज आहे. हा मार्ग शिक्षणाच्याच महाद्वारातूनच जातो, हे लक्षात घ्यायला हवे.
आर्थिक साक्षरता वाढीबरोबरच भारतीय आता निवृत्ती नंतरचे आयुष्य आर्थिक दृष्ट्या सुखकर जाण्यासाठी आर्थिक नियोजन करु लागले आहेत. अशी माहिती पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंड रिटायरमेंट रेडिनेस सर्व्हे २०२३ मधून समोर आली आहे. या सर्व्हेनुसार निवृत्ती नियोजन करण्याकडे भारतीयांचा कल वाढत आहे. २०२३ मध्ये ६७ टक्के भारतीय सेवानिवृत्ती नियोजनासाठी मानसिकरित्या तयार असल्याची आकडेवारी या सर्व्हेतून समोर आली आहे. २०२० मध्ये फक्त ४९ टक्के भारतीय सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन करण्याविषयी विचार करत होते.
आजच्या काळात ‘डिजिटल लिटरसी’ अत्यंत महत्त्वाची असून व्यापक समाजहितासाठी ‘आधुनिक तंत्रज्ञान’ आणि ‘डिजिटलायझेशन’ यांचा वापर समर्पकपणे होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, सेंटर ऑफ एक्सलन्स डिजिटल अॅकॅडमीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले.
देशातील सर्वाधिक साक्षर राज्य म्हणटल्या जाणाऱ्या केरळमध्ये राज्य सरकारने शिपाई पदासाठी भरती सुरु केली आहे. २३ हजार रुपये प्रति महिना पगार असलेल्या या नोकरीसाठी किमान पात्रता ७ वी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे.तसेच शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना सायकल चालवता येणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दि. २७ ऑक्टोबर रोजी या पदासाठी अर्ज करण्यासाठी रांगच रांग पाहायला मिळाली. यातील अनेक उमेदवारांकडे अभियांत्रिकीच्या पदव्याही होत्या.
रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना (RBIOS), फसवणूकीबाबत जागरूकता आणि आर्थिक साक्षरतेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लोकपाल (ओम्बड्समन) मुंबई कार्यालयाने, बजाज फायनान्स आणि बजाज ऑटो लिमिटेडच्या सहकार्याने बजाज ऑटोच्या वाळूज (औरंगाबाद) येथील प्रकल्पाच्या परिसरात व्यापक जनजागरूकता कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला. १९ आणि २० ऑक्टोबर 2023 या दोन दिवशी या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शिक्षण, आरोग्य आणि रोजगार पोहोचविण्यासाठी गेल्या ३६ वर्षांपासून ‘तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास’ झटत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून ‘विद्या विकासेन शोभते’ या ब्रीदवाक्याचे मुख्य पालन करून वंचित घटकांना प्रवाहात आणण्याचा विडा या संस्थेने उचलला आहे. या संघटनेेचे काम नेमके आणि दिशादर्शक ठरले आहे. याविषयी न्यासाचे सचिव मंदार अत्रे यांच्याशी चर्चा करुन या संस्थेच्या समाजकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
देशातील सर्वाधिक साक्षरता दर असलेले राज्य म्हणून गेली कित्येक वर्षे केरळ आपले स्थान कायम टिकवून आहे. परंतु, असे असले तरी रोजगाराच्या पुरेशा संधी केरळमध्ये उपलब्ध नाही, हे वास्तव. त्यामुळे आता खडबडून जागे झालेल्या केरळ सरकारने रोजगारक्षम शिक्षण आणि कौशल्य विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच या लेखात घेतलेला आढावा...
डोळखांबसारख्या परिसरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन त्यांच्या चेहर्यावर हसू फुलविणार्या ‘प्रांगण’ संस्थेचे अध्यक्ष वैभव नरेंद्र पाटील यांच्याविषयी...
डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या या जलसाक्षरता अभियानाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
इन्सानियत असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन दत्ताजी मेघे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आर्थिक साक्षरता शिबीर मंगळवार दि. १५ मार्च रोजी वरळीतील जांबोरी मैदान येथीलअंबामाता सभागृहात पार पडले
आज देशात २०० दशलक्षांहून अधिक ‘व्हॉट्सअॅप’ युजर्स आहेत. देशात डाटाही खूप स्वस्त आहे. त्यामुळे अनेक एखादं अॅप डाऊनलोड करतात किंवा एखाद्या साईटला क्लिक करतात किंवा एखादा व्हिडिओ डाऊनलोड करतात, तेव्हा एका विश्वासानेच ते हे करतात. त्यावरून मोठ्या प्रमाणावर मेसेज फॉरवर्ड केले जातात. त्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी काही पावलं कंपनीकडून उचलली जात आहेत.
भविष्यासाठी योग्य ते आर्थिक नियोजन करणे आजघडीला तसे खूप महत्त्वाचे. परंतु, योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेकांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी देवदत्त धनोकर यांनी पुढाकार घेतला आहे.
साक्षरतेची सावली देणाऱ्या झाडाबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? नाही ? अहो, आम्ही ते झाड पाहिलं आहे. आज त्याच झाडाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत... ‘प्रारंभ युवापर्व’