(Thane)ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा - मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास (एमआयडिसी) महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. एमआयडिसीच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी, ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शुकवार दि.२० सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
Read More
मान्सून दाखल झाल्यानंतर ही पिण्याच्या पाण्याची अडचण मुंबईत कायम आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील साठा कमी झाल्याने मुंबईत पाणीकपात करण्यात आली होती. पण जूनमध्ये पाऊस पडून ही अपेक्षित पाणीसाठा धरणात नाही. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरात गुरूवार दिनांक ३० मे पासून ५ टक्के पाणीकपात, तर बुधवार दिनांक ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
हन्मुंबई महानगरपालिकेतर्फे के पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथील ‘बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रासिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रासिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम बुधवार, दिनांक २९ मे २०२४ रोजी सकाळी ९ वाजेपासून गुरुवार, दि. ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) हाती घेण्यात येणार आहे.