( Health Department take strict action against bogus doctors and hospitals Manisha Kayande & Pravin Darekar ) विधानपरिषदेत आज आमदार मनिषा कायंदे यांनी नाशिकच्या पंड्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरकारभाराबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी बोगस डॉक्टर, दवाखान्यांवर सार्वजनिक आरोग्य विभाग कठोर कारवाई करणार का, ? असा सवाल उपस्थित केला.
Read More
RG Kar hospital पश्चिम बंगाल येथील आरजी कर वैद्यकिय (RG Kar hospital) शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयाला ५० जणांच्या जमावाने वेढा घातला. प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनीवर झालेल्या बलात्काराविरोधात आर जी कार या वैद्यकिय महाविद्यालयाच्या संस्थेत न्याय मागणाऱ्या डॉक्टरांवर गुंडांनी हल्ले केले आहेत. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली आहे. या घटनेने देश हादरला आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणात तृणमूल पक्षाच्या ममता बॅनर्जी यांचे गुंड असल्याचे आढळले आहे.
RG Kar Hospital विशेष प्रतिनिधी कोलकात्यातील आरजी कार (RG Kar hospital) वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालया झालेल्या बलात्काराविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर बुधवारी मध्यरात्री गुंडांकडून भीषण हल्ला चढविण्यात आला. हा प्रकार स्थानिक राजकीय पक्षांच्या गुडांनी घडविल्याचा आरोप ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट असोसिएशन या संघटनेने केले आहे.
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना आता क्यूआर कोड देण्यात येणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केला की संबधित डॉक्टराची संपुर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे डॉक्टर खरा आहे की बोगस हे रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लगेच कळू शकेल. बोगस डॉक्टरांमुळे अनेकदा वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होते. बोगस डॉक्टरांबद्दल अनेकदा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रारी आल्या होत्या त्यामुळेच हा उपक्रम राबवला जाणार आहे.
जागतिक आरोग्य सेवा क्षेत्राला अभूतपूर्व आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. पात्र वैद्यकीय व्यावसायिकांची वाढती मागणी दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, 2030 पर्यंत जगभरात 15 मिलियनहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू शकते. अमेरिका आणि कॅनडासारख्या पारंपरिक गंतव्यस्थानांमध्ये वैद्यकीय शाळेच्या जागांसाठी स्पर्धा अभूतपूर्व उंची गाठत आहे. सुमारे 10,000 पेक्षा जास्त व्यक्तींसाठी 44.5 आरोग्य व्यावसायिकांची किमान आवश्यकता साध्य करण्यासाठी भारताने सुमारे 2 दशलक्ष अधिक डॉक्टर, परिचारिका आणि आरो
'समाजकंटक’ हा शब्द सगळ्यांनाच परिचित. त्यात हल्लीच्या ‘स्मार्ट’ युगात नवनवे तंत्र आणि प्रणाली येत असल्याने नवनव्या शब्दांचीही भर पडत आहे. यात ‘माध्यमकंटक’ हा एक नवा शब्द गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. माध्यमकंटकाचे जनक काहीतरी आक्षेपार्ह मजकूर तयार करून किंवा फोटो अथवा व्हिडिओत फेरफार करून विविध प्रकारच्या समाजमाध्यमांत ते ‘व्हायरल’ करत असतात.
कोरोना महामारीच्या काळात आरोग्यसेवेतील अनेक त्रुटी जाणवल्या. अनेक माणसे उपचाराविना दगावली. ग्रामीण भागात आम्ही व्यवस्थित आरोग्यव्यवस्था पोहोचवू शकलो नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षे तुटपुंजा कर्मचारी वर्ग आहे. औषधांचा तुटवडा आहे. शहरी विभागात सरकारी दवाखान्यांत व रुग्णांमध्ये प्रचंड गर्दी होती. डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्यसेवेतील इतर कर्मचारी यांची संख्या लक्षणीयरित्या कमी होती. त्यातूनच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात तणाव निर्माण होत होता. खासगी रुग्णालये व कॉर्पोरेट रुग्णालये यातील उपाय अत्यंत महा
कोरोना विरुद्धच्या लढाईतील सर्वात महत्वाचा टप्पा असणाऱ्या लसीकरण मोहिमेत भारताने २०० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केला आहे
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे मानवतेचे सेवक म्हणजे ठाण्यातील डॉ. विजयकांत पुरुषोत्तम सेवक.
देशातील जनतेला ज्या काही मूलभूत सुविधा सरकारने पुरविणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात प्राथमिक आरोग्य सुविधेचाही प्रामुख्याने समावेश होतो. म्हणूनच प्रत्येक शहरातील रुग्णालये ही सुसज्ज असणे नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भात अत्यंत आवश्यक. मात्र, मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील आणि एकंदर महापालिका क्षेत्रातील रुग्णालये याबाबतीत कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र वारंवार समोर आले आहे. तसेच, ही रुग्णालये कायम विविध कारणास्तव वादाच्या भोवर्यात अडकलेली दिसतात. हा मुद्दा निकाली निघण्यापूर्वीच काही दिवसांपूर्वी महापालिकेने
“उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा पुरवणारी देशातील अग्रगण्य महापालिका असा मुंबई महापालिकेचा लौकिक आहे. मात्र, महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये स्वतंत्र आयुर्वेदिक विभागाची वानवा असल्यामुळे संबंधित रुग्णांना खासगी आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जावे लागत आहे. विविध आजारांवरील उपचारासाठी देशाच्या कानाकोपर्यातून पालिकेच्या रुग्णालयात नागरिक उपचारांसाठी येत असतात. भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याला प्राचीन परंपरा आहे. ‘कोविड’महामारीच्या काळात आयुर्वेदिक उपचाराने बहुसंख्य रुग्णांना कोरोनाव
तणावाच्या अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे वा त्याचा प्रतिकार कसा करायचा, हे एक जबरदस्त आव्हान खेळाडूंच्या समोर उभे ठाकलेले असते. उच्च प्रतीच्या राष्ट्रीय व जागतिक खेळांच्या मॅचेस किंवा अॅथलेटिक स्पर्धेतयश आणि अपयश हे अतिशय छोट्या फरकामुळे मिळत जाते. विशेषतः खेळाडूंची तांत्रिक, शारीरिक आणि विधायक क्षमता किती आहे आणि त्याचा ते मैदानावर खेळताना किती सशक्तपणे वापर करतात, यावर त्यांचे यश अवलंबून असते.
एखाद्या शिवसैनिकाला जखम झाली तर आपण धावून जाता! इथे तर लाखो मतदार जनता जनार्दन आहेत ते शिवसैनिकांपेक्षाही महत्त्वाचे आहेत! आपला पक्ष वाढविण्याकरिता तरी आपण त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही? मला पूर्ण खात्री आहे. आपण आम्हाला ‘आयसीयू’च्या निकषांप्रमाणे व सर्व रुग्णांना कोरोनाच्या उपचाराकरिता कमीत कमी ५० डॉक्टर्स फिजिशियन नियुक्त करा! आणि १५०परिचारिकांच्या जागा भरा, सर!
कोरोनायुद्धात आघाडीवर लढणार्या सर्व योद्ध्यांना विनम्र प्रणाम! स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर, परिचारिका, पोलीस, भाजी विक्रेते, घरोघर दूध पोहोचविणारे आणि तसेच समाजातील दुःखितांची सेवा करणार्या सर्व कार्यकर्त्यांना ईश्वर उत्तम आरोग्य देवो आणि त्यांना सुखी ठेवो, अशी आपण प्रार्थना करूया.
दि. १६ मे ते २४ मे रा. स्व. संघाने ‘निरामय फाऊंडेशन’च्या माध्यमातून महानगरपालिकेशी समन्वय साधत विलेपार्लेच्या नेहरूनगर वस्तीमध्ये कोरोना स्क्रिनिंग आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. संघ स्वयंसवेक, पदाधिकारी, डॉक्टर्स, वस्तीपातळीवरील कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने या शिबिरातील सेवाकार्यात सहभागी झाले होते. हे काम म्हणजे आजच्या भाषेत जीवावर उदार होणेच होय. पण हे काम करण्यास संघ स्वयंसेवक आणि त्या प्रेरणेने डॉक्टर्स, वस्तीपातळीवरील कार्यकर्ता तयार झाला आहे. त्या दैवी कार्याचा घेतलेला हा शब्दवेध...
सध्या ज्या पद्धतीने पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी हे ‘कोरोना वॉरियर्स’ पीपीई किटच्या स्वरुपात वेगळा पोशाख वापरतच आहेत. पण, कोरोनापासून संरक्षणाचा औद्योगिक, कार्यालयीन, रस्त्यावर काम करणार्यांचा, दुकानदारांचा आणि ग्राहकांचा पोशाख हे सगळे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
‘भय इथले संपत नाही’ अशी परिस्थिती जगात ठायी ठायी निर्माण झाली आहे. कारण, अर्थातच कोरोना! जागतिक संकटाने आता आपल्या भोवती पाश आवळायला सुरुवात केली आहे.
‘फ्रंटलाईन वॉरियर’ असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, दररोज पत्रकार परिषदेतून नेमकी माहिती देणारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, लाखो गरजूंना मदत पुरविणारे शेकडो स्वयंसेवक, स्वयंसेवी संघटना यांचा उल्लेख ‘कोरोना वॉरियर्स’ असा करणे अगदी संयुक्तिक ठरेल.
कोरोनामुळे लॉकडाउन अनुभवत असताना भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आणखी पुढे नेण्यासाठी तसेच महाराष्ट्र शासन आणि मुंबई स्थित स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने सर जे जे हॉस्पिटल्मधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी तसेच खोतवाडी, सांताक्रुझ स्थित त्रिरत्न प्रेरणा मंडळ या सार्वजनिक शौचायलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला हॅंड सॅनिटायझर आणि ऑटोमॅटिक सोप डिस्पेन्सरचे वाटप केले.
‘लॉकडाऊन’मुळे देशातील बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. ‘लॉकडाऊन’चा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. तो आणखी वाढू न देण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. कोरोनाच्या संकटावर मात केली की देशाची अर्थव्यवस्था आणि अन्य सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्याचे मोठे आव्हान आपणा सर्वांना स्वीकारायचे आहे. त्याची सिद्धताही आपणास याच दरम्यान करायची आहे.
कोरोनामुळे डॉक्टराचा मृत्यू झाल्याची ही भारतातील घटना आहे. या डॉक्टरच्या मृत्यूनंतर इंदूरमध्ये वैद्यकीय कर्मचारी अधिक खबरदारी घेत आहेत.
झोपडपट्टी परिसरात आरोग्य जनजागृती शिबिरे
इंजिनिअरिंगच्या इतर विद्यार्थ्यांनी देखील आपले वैयक्तिक किट सरकारी कर्मचाऱ्यांना दान करावे असे आवाहन केले.
आरोग्यमंत्र्यांचं खासगी डॉक्टरांना आवाहन
डॉ. अजय चंदनवाले यांचे प्रांजळ मत
मिश्रचिकित्सा पद्धतीचा योग्य वापर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने उशिरा जरी घेतला असला तरी तो सामाजिक हिताचा आहे. परंतु, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या भरतीपासून होमिओपॅथी डॉक्टरांना वंचित ठेवणे अन्यायकारक आहे.
नुकतेच सौदी अरेबियाने आपल्या देशात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी डॉक्टर्सना 'चले जाव'चा आदेश दिला. हे सर्वच डॉक्टर 'एमएस' आणि 'एमडी' ही वैद्यकीय पदवी घेतलेले आहेत. मात्र, सौदीने पाकिस्तानात दिले जाणारे वैद्यकीय शिक्षण शेकडो वर्षांपूर्वीचे जुनाट आणि कालबाह्य असल्याचे म्हटले.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, तसेच रुग्णाने खासगी रुग्णालयात शुश्रूषा घेण्यासाठी शंभरदा विचार करावा, असे आजकाल म्हणावे लागते.
औषध कंपन्यांकडून वैद्यकीय प्रतिनिधीं (एमआर) मार्फत डॉक्टरांशी संधान साधून त्यांच्या माध्यमातून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करणार्या प्रकाराला लवकरच आळा बसणार आहे.
भाजप जिल्हा महानगर व वैद्यकीय आघाडीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ८ ते १५ मार्चपर्यंत मोफत आरोग्य तपासणी सप्ताह राबविण्यात येणार आहे. यात शहरातील ३० नामांकित तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी होणार असल्याचे वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले.