दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने दरात वाढ दिसून आली आहे. सोन्याचा भाव एमसीएक्सवर ७६,०१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका राहिला आहे. दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव १,२०० रुपयांनी वधारला असून ७६ हजार रुपये प्रति तोळा पुढे गेला आहे. विशेष म्हणजे काल मंगळवारी सोन्याचा दर ७४,८५२ रुपये प्रति तोळा इतका कमी झाला होता.
Read More
मौल्यवान वस्तूंवरील कस्टम ड्युटीतील कपातीस बराच अवधी उलटल्यानंतर आता आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. आज सोने-चांदी भाव घसरणीसह उघडले असून सोन्याचे फ्युचर्सचे भाव सुमारे ७६,४५० रुपये, तर चांदीचे वायदे ९०,६०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या आगामी भावात घसरण होत आहे.
सराफा बाजारात सोने आणि चांदी दरात आज घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात घट झाली असून एमसीएक्सवर सोने ७८,३५७ रुपयांच्या आसपास आला आहे. तर चांदीचे भाव ९४,२०६ रुपयांवर आले आहे. सकाळच्या सुरूवातीस एमसीएक्सवर चांदीचा बेंचमार्क १८१ रुपयांच्या घसरणीसह ९४,१०३ रुपयांवर उघडला. सोन्याच्या फ्युचर्स किमतीने या वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली होती.
भारतात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ दिसून आली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत सोन्याच्या मागणीत तब्बल १८ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण मागणी २४८.३ टन इतकी झाली आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्याच्या आयात शुल्कात कपातीची तरतूद केली. त्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती.
ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदी दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. जागतिक घडामोडींमुळे कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा अधिक दिसून येत असून सोने-चांदीच्या किंमती दिवसागणिक वाढत होताना दिसत आहेत.
ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढती मागणी यामुळे सोने-चांदी दरात वृध्दी होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
इराण-इस्त्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ होताना दिसून येत आहे. विशेषतः गुंतवणूकदारांच्या मनात धाकधूक वाढली असून सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. जगापेक्षा भारतात सोने खरेदी करणारा वर्ग खूप मोठा आहे.
सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठी वाढ दिसून आली आहे. सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती वाढीने सुरू झाल्या असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स)वर सोन्याचा ऑक्टोबरचा बेंचमार्क करार १६५ रुपयांच्या वाढीसह ७४,२०५ रुपयांवर उघडला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे.
कमी जोखीम, सोन्याची शुद्धता आणि डिसुविधांमुळे डिजिटल सोन्यात भारतीयांचा वाढला रस आहे, असे नावीतर्फे सर्वेक्षणात दिसून आला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ सादर झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी इंधनांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून खनिजांवरील एक्साईज ड्युटी कमी केली असून त्याचाच परिणाम म्हणून इंधन दरासह खनिजांच्या किंमतीदेखीत कमी झाल्या आहेत.
मागील दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सराफा बाजारात किमतीत मोठी घट होत मुंबई शहरात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ७३,३४१ रुपये इतका आहे. तर चांदी प्रति किलो ९०,०८० रुपये असल्याचे पाहायला मिळत आहे.
युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात संमिश्र प्रतिक्रिया आल्याने सीपीआय (Consumer Price Index) आकडेवारी आल्यानंतर व युएस डॉलरमध्ये घसरण होताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या व चांदीच्या दरात घसरण झाली आहे.
अमेरिकन फेडरल व्याजदर कपात होईल या आशेनंतर अमेरिकन पीएमआय आकडेवारीनंतर बाजारात सोने वधारले होते. काल झालेल्या वाढीनंतर पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. शुक्रवारी एस अँड पी ग्लोबलने परचेसिंग मॅनेजर इंडेक्स (PMI) जाहीर केल्यानंतर उत्पादन क्षेत्रातील निर्देशांक मे मधील ५१.३ वरुन ५१.७ वर पोहोचला होता त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील झालेल्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा कायम राहिली होती. मे मधील सेवा क्षेत्रातील पीएमआय ५४.८ वरुन जूनमध्ये ५५.१ वर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील हालचालींमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन बाजारातील आर्थिक आकडेवारीत घसरण झाल्यामुळे तसेच मध्यपूर्वेतील दबाव कायम असला तरी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल या आशेने अमेरिकन बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने बाजारातील सोने महागले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव हटल्याने कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. प्रामुख्याने ही घसरण तेलाच्या पातळीत झालेली वाढ व प्रति बॅरेल झालेल्या मागणीत घट यामुळे बाजारात कच्च्या (Crude) तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे.
आज बकरी ईद निमित्त डेट व इक्विटी शेअर बाजार बंद राहणार आहे. आज डेरीएटिव्ह व फॉरेक्स बाजार देखील बंद राहणार आहे. उद्या मंगळवारी शेअर बाजार नियमित सुरु होणार आहे. शुक्रवारी अखेरच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टीत वाढ झाली होती. सेन्सेक्स ०.२४ टक्क्यांनी वाढत ७६९९२.२८ ला बंद झाला होता तर निफ्टी ०.२९ टक्क्यांनी वाढत २३४६५.६० पातळीवर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस डॉलरमध्ये वाढ होतानाच सोन्याच्या किंमतीत दबाव निर्माण झाला. युएसमधील रोजगार निर्मिती आकडेवारीत अपेक्षेपेक्षा अधिक आकडेवारी आल्यानंतर युएस फेडरल रिझ र्व्ह व्याजदरात कपात होईल ही चर्चा सुरू झाल्याने बाजारात सोन्यात पडझड झाली आहे. चीननेही १८ महिन्यानंतर सोन्याच्या खरेदी थांबल्यानंतर बाजारात सोने स्वस्त झाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात घसरण झाल्याने भारतातील काही ठिकाणी सोन्याच्या किंमतीत घसरण तर काही ठिकाणी सोन्याच्या किंमती जैसे थे राहिल्या आहेत. अमेरिकन बाजारात शुक्रवारी जाहीर झालेली लेबल मार्केट आकडे वारी सकारात्मक दिसली आहे तसेच चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने १८ महिन्यांच्या सोने खरेदीनंतर खरेदीला पूर्णविराम दिल्याचे म्हटले आहे. तसेच यूएस बाजारातील समाधानकारक रोजगार आकडेवारी आल्यानंतर डॉलरच्या किंमतीत वाढ झाली होती. या सगळ्यांचा परिणाम झाल्याने सोने घसरले होते.
गुंतवणूकदारांना सोने व चांदी खरेदीसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी, युएस पेरोल डेटा, डॉलर्स निर्देशांकात झालेली वाढ व चीनच्या पीपल बँक ऑफ चायनाने घोषित केल्याप्रमाणे विदेशी मुद्रेत न झालेला बदल, देशांतर्गतील धोरणे, घटलेली मागणी अशा अनेक कारणांमुळे सोन्याच्या निर्देशांकात काल आणि आज मोठी घसरण झाली आहे.
जागतिक पातळीवर ओपेक राष्ट्रांनी बैठकीत कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचे ठरवले असले तरी युएस गॅसोलिनचा मुबलक साठा, मागणीत घट यामुळे बाजारात काही काळ तेलाच्या दरात कपात झाली असली तरी पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. दुसरीकडे EIA दिलेल्या अहवालात तेलाचा साठा अनपेक्षितरित्या वाढल्याचे सांगि तले होते मात्र तज्ञांच्या मते हा आकडा पुरेसा नसून मागणीच्या तुलनेत कच्च्या तेलाच्या साठ्यात घट झाली आहे.परिणामी बाजा रात कच्च्या (क्रूड) तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे.
युएस यील्डमध्ये घसरण झाल्याने तसेच युएसमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता गुंतवणूकदारांनी नोंदवल्याने चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आशियाई बाजारात निर्देशांकात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चांदी महागली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड (कच्च्या) तेलाच्या निर्देशांकात घट झाली आहे. ओपेक राष्ट्रांच्या बैठकीतील उत्पादन कपात पुढे ढकलला गेल्याच्या निर्णयानंतर बाजारात क्रूड तेलाच्या दरात स्थिरता आली आहे.त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील या वर्षातील सर्वाधिक घसरण कच्च्या तेलाच्या दरात झाली आहे. संध्याकाळपर्यंत कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याचे दर घटले आहेत. मुख्यतः सकाळी डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव वधारले आहेत. येत्या गुरुवारी वैयक्तिक वापर खर्च (Personal Consumption Expenditure PCE) चे आकडे व सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ची आकडेवारी येणार आहे.तज्ञांच्या मते हे निकाल अपेक्षेपेक्षा कमी असण्याची शक्यता लक्षात घेता बाजारातील सोन्याचे भाव वधारले आहेत.
काही महत्वाच्या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. मुख्यतः मध्य आशियातील इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या निधनानंतर मध्यपूर्वेतील दबाव कायम दिसून येत आहे.तसेच आगामी १ जूनला ओपेक (OPEC) राष्ट्रांची बैठक होणार असून कच्च्या तेलाच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्यासाठी आणखी काही दिवस महागाई दर नियंत्रणात आल्यास होणार असल्याचे युएस कडून सुतोवाच मिळाल्याने बाजारात यांची दखल घेतली गेली.
मध्य आशियातील काही घडामोडींमुळे व इराणचे अध्यक्ष इब्राहिम रैयसी यांच्या मृत्यूमुळे बाजारातील क्रूड तेलाची हालचाल थंडावली आहे. तसेच अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेचे उपाध्यक्ष फिलिप जेफरसन यांच्या नव्या विधानामुळे बाजारात क्रूड (कच्च्या) तेलाच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरण झाली आहे.
आज आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची किंमत वधारल्याने बाजारात सोने चांदी किंमतीत मोठी वाढ झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात ०.९३ टक्यांने वाढ झाली आहे तर युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.९७ ते १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात सोने ०.०५ टक्क्यांनी महागले असून एमसीएक्सवरील सोन्याचे दर ७३७५० रुपयांवर पोहोचले आहेत.
अमेरिकन बाजारातील महागाई आकडे आल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या जागतिक निर्देशांकात वाढ झाल्याने आशियाई बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात १२.१५ वाजेपर्यंत ०.२० टक्यांने वाढ झाल्याने बाजारात वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात ०.०४ टक्क्यांनी वाढ होत सोने ७३१२९.०० पातळीवर पोहोचले आहे.
सोन्याच्या भावात घसरण झाली आहे.स्थिर रुपया, तसेच पुरवठ्यातील नियमितता व बाजारातील स्थैर्य यामुळे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या भारतातील एमसीएक्स (MCX) निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.०१ टक्क्यांनी घसरण होत सोने ७२७२२.०० पातळीवर पोहोचले आहे.
कालपासून अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या साठ्यात घसरण होत मागणीत मोठी वाढ झाली आहे. चीनमध्ये क्रूड तेलाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ( कच्च्या) तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. चीन हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार असल्याने बाजारातील क्रूडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अमेरिकन बाजारातील आकडेवारीनुसार ' क्रूड ' (कच्च्या) तेलाच्या साठा मुबलक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर क्रूड तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. कालपर्यंत क्रूड तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती मात्र आज क्रूड तेलाच्या निर्देशांकात घट झाल्याने बाजारात तेलाच्या किंमती स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.
अक्षयतृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाल्याने त्यांचे परिणाम भारतीय बाजारात झाले आहेत. कालपासून स्वस्त झालेले सोन्याचे भाव दुपारनंतर पुन्हा वधारले आहेत.युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर भारतातील एमसीएक्स (Mutli Commodity Exchange) मध्ये सोन्याच्या दरात संध्याकाळपर्यंत ०.६४ टक्क्यांनी वाढ झाली असून एमसीएक्सवरील सोन्याचे दर ७१११९.०० पातळीवर पोहोचले आहे. चांदीच्या निर्देशांकातही १.५४ टक्क्यांनी वाढ झाल्याने चा
अमेरिकन युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कुठलाही कपात झाली नसल्याने बाजारात काही प्रमाणात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक पातळीवरील मिश्र संकेत असताना व्याजदरात वाढ न झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.जून पर्यंत व्याज दर कपात पुढे ढकलल्याने तारण कर्ज दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. तुलनेने कर्ज व्याजदर स्वस्त राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकतेचे चित्र पहायला मिळत आहे. अखेर जागतिक पातळीवरील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
बाजार नियामक सेबीने स्टॉक एक्सचेंजला पत्र लिहीत वाढीव फीची मागणी केली आहे. या डेव्हलपमेंट नंतर बीएसईमधील समभागात १७ टक्क्यांनी घसरण सुरू झाली आहे.ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये सेबीने कंपन्यांना वाढीव फी ची मागणी केल्याने अचानक समभागात घसरण झाली आहे.मुख्यतः ही वाढ ' प्रिमियम व्हॅल्यु ' वर न करता 'नोशनल व्हॅल्यु' वर केल्याने सेबीने कंपन्यांची नाराजी ओढवून घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात घसरण झाल्याने त्याचे पडसाद भारतीय सराफा बाजारात देखील उमटले आहेत. युएस स्पॉट गोल्ड दरात आज घट झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी युएस गोल्ड स्पॉट फ्युचर दर ८८ अंशाने घसरत २३०४ डॉलर्सपर्यंत गेले होते. मध्यपूर्वेतील दबावात घट होऊन बाजारात स्थिरता आल्याने आज सोन्याच्या दरात वाढ झालेली नाही.
आंतरराष्ट्रीय दबावाने बाजारातील सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन महागाई दरात झालेली वाढ, मध्यपूर्वेतील दबाव, इस्त्राईल व इराण यांच्यातील वाद व पुरवठ्याच्या तुलनेत मागणीत वाढ यामुळे क्रूड (Crude ) तेलाच्या बरोबरच सोने व चांदीच्या भावात वाढ झाली आहे. दुपारी युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाली होती. युएस स्पॉट दरात २३५३ हून अधिक वाढ झाली आहे.
काल शेअर बाजारात मोठ्या दिमाखात निर्देशांकात वाढ झाली होती.आज मात्र ईद - उल - फितर निमित्त आज शेअर बाजार बंद राहणार आहे. बुधवारी ब्लू चीप कंपन्यांच्या समभागात ०.४९ टक्क्यांनी वाढ झाली होती.
जागतिक पातळीवर अस्थिरमुळे आज क्रूड तेल व सोने निर्देशांकात वाढ झाली आहे. मध्य पूर्वेकडील दबाव, युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत प्रतिक्षा यामुळे सोन्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमतीत वाढ झाली आहे. गोल्ड स्पॉट दरात ०.५० टक्क्यांनी १० एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत वाढ झाली आहे. गोल्ड फ्युचर निर्देशांक ७०५६ रूपयांवर पोहोचला आहे.
गुरूवारी सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाल्यानंतर मात्र सोने चांदीच्या किंमतीत आज घसरण झाली आहे. शुक्रवारी डॉलरच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत नियंत्रित झालेल्या पाहिला मिळाल्या आहेत. दुपारी ३ पर्यंत एमसीएक्सवर सोन्याच्या निर्देशांकात ०.७३ टक्क्याने घसरण होत निर्देशांक ६९६२८ पातळीवर पोहोचला आहे. तर चांदीचा एमसीएक्सवर (Multi Commodity Index) निर्देशांक ०.७७ टक्क्याने घटत ७९३६५ पातळीवर पोहोचला आहे.
आज सराफाबाजारात सोनाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशातील सर्वच शहरातील प्रति ग्रॅम किंमत वाढली आहे. देशातील सरासरी दराप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅममागे ३५ रुपयांनी भाववाढ झाली आहे. तर १० ग्रॅम सोने किंमत ३५० रुपयांनी वाढल्याने सोन्याचा किंमती गगनाला भिडल्या आहेत.
काल ओपेक सदस्य देशांनी तेलाच्या उत्पादनात घट करायचे ठरवल्यानंतर रशियानेही तेलाचे उत्पादन कमी करण्याचे ठरवले होते. युक्रेनने रशियन कच्च्या तेलाच्या (क्रूड) खाणीवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केल्याने रशियाने तेलाचे आऊटपूट कमी करण्याचे ठरवले होते. तेलाच्या वाढत्या मागणीमुळे व तेलाचे उत्पादन कमी झाल्याने एकूण बाजारात तेलाचा तुटवडा होता.परंतु दुसरीकडे डॉललचे मूल्यांकन कमी झाल्याने क्रूड तेलाचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.
देशात सोने चांदी अखेर महागली आहे. सोन्याच्या निर्देशांक ९० अंशाने वाढत ६२३६० रूपये प्रति १० ग्रॅम व चांदीचा निर्देशांक ११० अंशाने वाढत ७१६८० प्रति किलोपर्यंत वाढला आहे. आज अंदाजे सोन्याच्या भावात वाढ होऊन ५७६० रूपये प्रति ग्रॅमने सराफ बाजारात विकले जात आहे. विशेषतः मुंबईत आज सोन्याचा दर २२ कॅरेट सोन्याच्या प्रकारात प्रति ग्रॅम ५७६० रूपये ठरला आहे. २४ कॅरेट प्रकारात ६२७४ रुपये प्रति ग्रॅमने सोने महागले आहे.
आरबीआयच्या रेपो रेटमध्ये बदल न करण्याच्या निर्णयावर उद्योगाशी निगडीत लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही वैश्विक अडचणींचा सामना करतानाच महागलेले तेल,पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती यानंतर पेटीएम फिनटेकवरील वाढलेल्या अडचणीत मात्र बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीचे भाव मात्र वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरचे विनिमय मूल्यात कपात झाल्याने त्याचा परिणाम कमोडिटी एक्सचेंज मध्ये दिसून आला आहे.
सणासुदीच्या काळात सोने चांदी खरेदीसाठी झुंबड उडते. दसरा हा अत्यंत महत्वाचा सण हिंदू समाजासाठी मानला जातो. याच्यातच गेले काही दिवस इस्त्रायल हमास युद्धाचे सावट असल्याने मार्केट मध्ये मंदीचे सत्र सुरू होते. तेलाच्या पर बॅरल दरात अस्थिरता असतानादेखील आज सोने चांदीच्या एमसीएक्स दरात मात्र कपात झाल्याने सर्वसामान्य लोकांना खरेदीसाठी हा शुभशकुन मानला जात आहे.
सर्वसामान्य गृहीणींसाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या सोन्याचा भाव गुरुवारी गेल्या पाच वर्षांतील उच्चांकावर गेला