आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवरही कल्ला केला होता. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. कोकणातील लोककथेवर आधारित ‘मुंज्या’ यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. आणि आता हा चित्रपट प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी थेट टीव्हीवर प्रसारित होणार आहे.
Read More
दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. ७ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘मुंज्या’च्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहता पहिल्या दिवशी हा चित्रपट १-२ कोटी कमावेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
भयपट म्हणजेच हॉरर चित्रपट भल्याभल्यांची झोप उडवतो. असाच एक नवा कोरा भयपट मुंज्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या हिंदी हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर भेटीला आला असून चित्रपटाबद्दलची अधिक उत्सुकता वाढत चालली आहे.