(Markadwadi) माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवण्याबाबत घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याची प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतला. पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर मारकडवाडी येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन जानकरांनी आपला निर्णय माध्यमांसमोर मांडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
Read More