मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काँग्रेस ( Congress ) पक्षावर बनावट आश्वासनांची संस्कृती, अशी टीका केली आहे. जो पक्षाच्या निवडणुकीतील वचनबद्धतेच्या ट्रॅक रेकॉर्डमुळे निराश झालेल्या मतदारांमध्ये वेगाने आकर्षित होत आहे. काँग्रेसच्या भाषणांमध्ये अनेकदा मोठमोठी आश्वासने दिली जातात. परंतु, या वचनबद्धतेची अंमलबजावणी होताना दिसत नाही. काँग्रेसची आश्वासने आणि पूर्तता यात तफावत आढळून येते. महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने काँग्रेस सरकारची ‘कर्नाटक गृहलक्ष्मी योजना’ अयशस्वी ठरली. पैसे जमा होतील, य
Read More
आसाम सरकारने ४० लाख महिलांना आर्थिक बळ देतानाच लोकसंख्या नियंत्रण, मुलींचे शिक्षण तसेच वृक्षारोपण असे तीन हेतू साध्य होतील, याची काळजी घेतली आहे. भाजपने आपल्या महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. त्याचवेळी ज्या काँग्रेसने मणिपूरकडे दुर्लक्ष केले, तीच आज तेथून न्याय यात्रा काढत आहे, हा विरोधाभास समोर आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उज्ज्वला योजनेच्या अनुदानात १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण ३०० रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.
महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकार घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी घट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. एलपीजी सिलेंडरच्या दराचा आज आढावा घेण्यात आला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १०० रुपयांनी कमी केली होती. पण घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता.
रक्षाबंधन आणि ओणम सणाच्या निमित्ताने मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये २०० रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर ४०० रूपयांनी स्वस्त दरात मिळणार आहे.