Waqf Amendment Bill वरून कट्टरपंथीयांनी पोलिसांवर केली दगडफेक, रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न
Read More
नागपूरमधील महाल परिसरात सोमवार, १७ मार्च रोजी रात्री औरंगजेबाच्या कबरीवरून तुफान राडा झाला. यादरम्यान, दोन गटात दगडफेक झाली असून मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली. यावेळी जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.
अनिल देशमुखांनी स्वतःच स्वतःवर हल्ला घडवून आणला असून या घटनेतील सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत, असा दावा भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. सोमवारी रात्री अनिल देशमुखांच्या वाहनांवर दगडफेक झाल्याने ते गंभीर जखमी झालेत. दरम्यान, यावर परिणय फुकेंनी प्रतिक्रिया दिली.
Ganesha Faestival 2024 गणेश मुर्तीच्या आगमनावेळी बांगलादेशात कट्टरपंथींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली. त्य़ानंतर काल-परवा देशातील मध्यप्रदेशातील रतमाल येथेही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. या घटना ताज्या असताना गुजरात येथील काही अल्पवयीन कट्टरपंथींनी गणेश मंडळाच्या मंडपावर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी हे प्रकरण हाताळले असता पोलिसांवरही हल्ले करण्यात आले आहेत. ही घटना सूरत येथील लालगेट परिसतील आहे. या घटनेने हजारो हिंदूंनी निदर्शने दर्शवत रस्त्यावर उतरले आहेत. ही घटना ७ सप्टेंबर रोजी घडली आहे.
पवई परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान पोलीस आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांवर स्थानिक रहिवाशांनी दगडफेक केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ५७ जणांना अटक त्यात सहा महिलांचा समावेश आहे. याशिवाय १५ महिलांना नोटीस देण्यात आली आहे.
नांदेडमधील गाडीपुरा भागात बुधवारी मध्यरात्री इस्लामी जमावाने हिंसाचार केला असून त्यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले असून वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मरही उडाला आहे.