Hanuman Jayanti मध्यप्रदेशातील गुना शहरातील हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यावर अधिकाऱ्यांनी रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी माहिती दिली आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कर्नलगंज येथे असलेल्या मशिदीच्या भोवताली घडली आहे. सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी सध्या
Read More
Eid उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ईदच्या नमाज अदानंतर दोन पक्षांमध्ये दोनदा हाणामारी झाली होती. सिवाल खासमध्ये नामाद अदा केल्यानंतर मुस्लिमांच्या दोन्ही गटांमध्ये गोळीबार आणि दगडफेकीची घटना घडली. या हाणामारीत सहाहून अधिकजण जखमी झाले आहेत.
मंगला मिरवणूक झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात मंगला मिरवणुकीदरम्यान, दोन समुदयांमध्ये संघर्ष उफाळून आल्याची घटना घडली आहे. यावेळी त्यांनी एकमेकांवर दमगडफेक केली होती. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत हजारीबागचे एसपी घटनास्थळी होते आणि त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. ही घटना २५ मार्च रोजी मंगळवारी रात्री घडली असल्याची माहिती आहे.
India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असून २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये टीम इंडिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात लढत झाली. यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत विजय मिळवला. याचाच आनंद भारतीयांच्या पोटात मावेनासा झाला. काही ठिकाणी देशातील काही शहरांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. मात्र काही देशद्रोही असणाऱ्यांना टीम इंडिया विजयाच्या जल्लोषाने पोटशूळ उठला. गुजरातच्या अहमदाबादमध्ये रविवारी टीम इंडियाच्या विजयाने अनेकांनी जल्लोष केला. मात्र, यावेळी पोटशूळ उठलेल्या कट्टरपंथींनी जल्लोष करणाऱ्या भारतीया
Hanuman Chalisa बिहारच्या जमुईमध्ये हनुमान चालीसा पठण करत परतत असणाऱ्या हिंदूंवर कट्टरपंथींनी हल्ला केला. जमावाने हिंदूंच्या ताफ्याला घेरत त्यांच्यावर दगडफेक केली असल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. यावेळी अनेकांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी हल्लेखोर हे कट्टरपंथी असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये हिंदू महिलाही जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनता झाला आणि त्यांना अटकही करण्यात आली.
मुंबई : वंदे भारत एक्सप्रेसवर ( Vande Bharat Express ) मुंबई ते सोलापूरदरम्यान दगडफेक झाली. गाडीतील सी-११ या डब्याची काच फुटली. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, परंतु सर्व प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. गाडी मुंबईहून सोलापूरकडे जाताना जेऊर स्थानकाजवळ ही घटना घडली.
Jama Masjid उत्तर प्रदेशातील संभल येथील वादग्रस्त असलेल्या शाही जामा मशिदीनजीक पोलीस ठाणे उभारले जाणार आहे. संबंधित पोलीस ठाणे हे मशिदीच्या समोर असलेल्या अंगणातील मैदानात बांधले जाणार आहे. याबाबत आता प्रशासनाने बांधकामाची सुरूवात करण्यासाठी जमिनीचे मोजमाप करण्यास सुरूवात केली आहे. अशावेळी कट्टरपंथींनी दगडफेक करत बांधकाम बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
The Sabarmati Report जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे द साबरमती रिपोर्ट चित्रपटाच्या स्क्रीनिंगचे १२ डिसेंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाच्या स्क्रींनिंगदरम्यान दगडफेक करण्यात आल्याची घटना आहे. याबाबत जेएनयूचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष राजेश्वर कांत दुबे यांनी सांगितले की, या धटनेत काही लोक जखमी झाले असून काही विद्यार्थ्यांनाही दुखापत झाली आहे.
Lord Ayyappa आंध्र प्रदेशात भगनाव अयप्पाच्या भक्तांना घेऊन जाणाऱ्या बसवर रायचोटी येथे देवाचे गाणे लावण्यात आले होते. यावेळी भक्तीमय वातावरण तयार झाले होते. भक्तांचा आनंदीमय प्रवास सुरू होता. मात्र यावेळी रायचो़टी येथे बसवर कट्टरपंथी जमावाने हल्ला केला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Hindu मध्य प्रदेशातील बरहानपूर जिल्हयातील एका व्यासपीठावर जातीय ताण-तणाव पसरला. हिंदूंच्या बाबा नवनाथांच्या समाधीला कट्टरपंथींनी तो दर्गाह असल्याचे सांगत लाठीहल्ला करत दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी सुरू असलेला गोंधळ शांत करत परिस्थिती हताळण्याचे काम केले. हे प्रकरण सोमवारी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी घडल्याचे वृत्त आहे.
( Kolhapur ) काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यानंतर कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रात्री साडे बाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. यामुळे सध्या कोल्हापूरचे राजकारण वादाचा मुद्दा ठरत आहे.
उत्तर प्रदेशातील बहराइच येथे नुकत्याच झालेल्या देवीच्या विसर्जन मिरवणुकीत दोन्ही गटात रडा झाला होता. काही दुकाने आणि घरांना आग लागल्याची माहिती आहे. यामुळे घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी गोळीबार केला असून या गोळीबारात एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यामुळे देवीच्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना आहे.
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील दुर्गा मातेच्या विसर्जन मिरवणुकीत काही कट्टरपंथीयांनी दगडफेक केली असल्याची धक्कादायक घटना आहे. यावेळी समाजकंटकांनी समाजात तेढ निर्माण होतील अशा घोषणाबाजी केली आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला होता. यावेळी वाद निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी वाद शमवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी दगडफोक करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असून ही घटना १२ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
Navratri Festival गणेशोत्सवानंतर आता दुर्गामातेच्या मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना हैदराबाद येथील नामपल्ली मैदानावर घडली. यामुळे आता हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. शारदीय नवरात्रौत्सवादरम्यान स्थापन करण्यात आलेल्या दुर्गामातेच्या मूर्तीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. ही घटना १० ऑक्टोबर २०२४ रोजी घडली आहे.
Ganesh Utsav 2024 उत्तर प्रदेशातील उत्रौला बलरामपूर जिल्ह्यात सोमवारी १६ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कट्टरपंथींनी उत्रौला बाजारपेठेत गणेशाच्या मंडळावर जमावाने पॅलिस्टिनींना समर्थन देत उन्माद करत घोषणा दिल्या आहेत. याप्रकरणी आता पोलिसांनी एफआरआय दाखल केला असून सहभागी असलेल्या १६ कट्टरपंथींना अटक करण्यात आली आहे.
Stone Pelting ईद मिलादुन्नीच्या मिरवणुकीत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे हनुमान मंदिरावर दगडफेक (Stone Pelting) करण्यात आली आहे. यामुळे याभागात हिंसाचार झाला आहे. मिरवणुकीत हनुमान मंदिरावर केलेल्या दगडफेकीत एक भाविकाला जबर मार बसला असून तो जखमी झाला आहे. याप्रकरणी आता हिंदू एकटवले असून त्यांनी हनुमान मंदिरासमोर हनुमान चालीसेचे पठण करायला सुरूवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडली आहे.
राजस्थानातील जहाजपूर येथील रामवाडीच्या मशीदीमधून काही कट्टरपंथींनी हिंदूंच्या शोभायात्रेवर हल्ला केला आहे. जामा मशिदीच्या सदराला जहाजपूर येथील नगरपालिकेने नोटीस बजावून येत्या २४ तासांत मालकी, बांधकाम मंजुरी आणि भाडेतत्त्वावर संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. जामा मशीद ही बेकायदेशीर असून तिला पाडण्याचे मागणी करण्यात आली आहे. ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडली आहे.
Stone Pelting Ganesh Visarjan उत्तर प्रदेशातील महोबा येथील गणेश विसर्जनावेळी दोन समाजात तणावची परिस्थिती निर्माण झाली होती. मुस्लीमबहुल कसौराटोरी परिसरातून गणेश मूर्तीची मिरवणूकी वेळी ही घटना घडली होती. मिरवणुकीत एक जळणारा फटाका चुकून एका दुकानात पडल्याने भांडण सुरू झाले. काही वेळात अल्पसंख्यांक कट्टरवाद्यांनी मिरवणुकीवर पाण्याच्या बाटल्या भिरकवल्या आहेत. यामुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला असून ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडली आहे.
छत्तीसगड राज्यातील विजापूर येथील वंदे भारत (Vande Bharat) येथे दगडफेक करण्यात आली होती. यामुळे ३ डब्यांच्या काचा फोडण्यात आल्याची धक्कादायक बाबा आढळून आली आहे. याप्रकरणात सुरू असणाऱ्या वंदे भारत रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात महासमुंदमध्ये वंदे भारत ट्रेनच्या ट्रायल सुरू होती. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणात काँग्रेस नेत्याच्या एका निकटवर्तीयाचा समावेश आहे.
Stone Pelting Ganesh Murti गणेश विसर्जनादिवशी कर्नाटकातील मंड्या येथील काही कट्टरपंथींनी गणेशमूर्तीवर दगडफेक केली. याप्रकरणात पोलिसांनी १० एफआरआय नोंदवले होते. याप्रकरणी पोलिसांना निलंबित केले गेले. आतापर्यंत ५६ जणांना अटक करण्यात आली असून ९० जणांचा शोध सुरू आहे. याबरोबर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
Stone Pelting Ganesh Murti उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील गणेश मंडळावर अल्पवयीन कट्टरपंथींना मध्यस्ती करत गणेश मंडळांवर दगडफेक करण्यास सांगितले गेले. ही घटना १० सप्टेंबर रोजी घडली असून यावेळी काहींनी देवाच्या मूर्तीसमोरील कलश तोडल्याचे कृत्य केले. यावेळी कट्टरपंथींनी अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या होत्या. यावेळी हिंदूंनी घडलेल्या घटनेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास सुरू आहे.
राजस्थानच्या जोधपूरमध्ये दि. २१ जून २०२४, शुक्रवारी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराच्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी रविवार, दि. २३ जून २०२४ शोध मोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेत ड्रोनची मदत घेण्यात आली होती. ड्रोनच्या साह्याने मिळालेले फोटो आणि व्हिडिओ पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना धक्काच बसला, कारण अनेक आरोपींनी मोठ्या प्रमाणावर घराच्या छतावर दगडांचा मोठा साठा करून ठेवला होता.
देशभरात श्रीरामनवमीनिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. काही ठिकाणी या शोभायात्रांवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये तर याचे प्रमाण अधिक होते. ममतांची कोणतीही ममता नसलेले पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत राहिले. भारतासोबत शेजारी देश नेपाळमध्येही मोठ्या उत्साहात श्रीरामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नेपाळमध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी शोभायात्रेवर दगडफेक झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
बिगर भाजप राज्यांमध्ये दिवसेंदिवस हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांवर होणारे हल्ले किंवा त्यावरील निर्बंध यात वाढ होताना दिसते. बंगाल असो, तामिळनाडू अथवा केरळ, या राज्यांमध्ये हिंदूंवर होणारे धार्मिक अत्याचार हा समान दुवा आहे. काँग्रेसने तर ‘मुस्लीम लीग’च्या मागण्यांनाच आपल्या जाहीरनाम्यात स्थान दिले आहे. द्रमुकने उघडपणे सनातन धर्म नष्ट करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मतदारांनी मत देताना पक्षापेक्षा त्याची विचारसरणी लक्षात घेऊन, आपला निर्णय घ्यावा.
राजस्थानमधील कोटा येथे शुक्रवार, दि. २९ मार्च २०२४ रोजी मोठा वाद झाला आहे. येथे स्थानिक जत्रेत सुरू असलेल्या रामलीलाशी संबंधित शोभायात्रा काढली जात असताना कट्टरपंथी जमावाने मशिदीजवळ हल्ला केला. या जमावाने डीजे आणि सर्व उपकरणे तर फोडलीच, पण महिलांनाही सोडले नाही. कट्टरपंथी जमावाने केलेल्या या हल्ल्यात अनेक हिंदू स्त्री-पुरुष जखमी झाले.
केरळमधील इडुक्की येथे आठ चर्चवर हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक चर्चवर दगडफेक करून त्यांचे नुकसान केले. या व्यक्तीने चर्चवर दगडफेक का केली? याच चौकशी पोलिस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इडुक्की येथील पुलियानमाला येथील रहिवासी झुबिन जोस हा चर्चच्या धोरणांवर नाराज होता.
गुजरातमधील जुनागडमध्ये महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. येथे माजेवाडी गेटजवळील वादग्रस्त बेकायदा दर्गा पाडण्यात आला आहे. पाडल्यानंतर रात्री ढिगाराही हटवण्यात आला. ही कारवाई दि. ९-१० मार्च २०२४ च्या रात्री करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी सतर्क राहिले. हा तोच दर्गा आहे जिथे गेल्या वर्षी कट्टरपंथी जमावाने दगडफेक केली होती. या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
नेपाळमधील रौताहाट जिल्ह्यात गुरुवारी, दि. १५ फेब्रुवारी २०२४ सरस्वती देवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर हल्ला झाला. सरस्वतीच्या मूर्तीचे नदीत विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या मिरवणूक ईशानाथजवळील मशिदीसमोर आल्याने वादाला सुरुवात झाली. यादरम्यान भाविकांच्या सोबत असलेल्या प्रशासनावर दगडफेकही करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२४ हिंदू संघटनांनी वीरगंज बंदची घोषणा केली होती.
चिपळुण मध्ये भास्कर जाधवांच्या समर्थकांनी निलेश राणेंच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. चिपळुण तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गा लगत असलेल्या भास्कर जाभव यांच्या कार्यालयासमोरुन निलेश राणेचा ताफा जात असताना त्यांच्यावर भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी त्या ताफ्यावर दगडफेक केली.
गुजरातमधील मेहसाणाच्या खेरालू येथील हटाडिया बाजार परिसरात बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. हा तोच भाग आहे जिथे दि. २१ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्री रामाच्या शोभा यात्रेत दगडफेक झाली होती. खेरालूच्या हातडिया मार्केट आणि जकातनाक्याजवळ प्रशासनाने ही कारवाई केली आहे. हा तोच भाग आहेत जिथे प्रभू रामाच्या दर्शनावर कट्टरपंथी जमावाने दगडफेक केली होती.
ईदच्या मिरवणूकीत घुसलेल्या समाजकंटकांनी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्यानंतर शहाद्यात तणाव निर्माण झाला. नंदूरबारमध्ये शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शहाद्यात ईद निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, याला काही समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मिरवणूक साईबाबा मंदिरानजीक आल्यानंतर घोषणाबाजी सुरू केली.
अमळनेर येथे दोन गटांत राडा झाल्याने २ दिवस संचारबंदी करण्यात आली होती. दोन गट एकमेकांना भिडल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस चकमकीच्या ठिकाणी दाखल झाले. ९ जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत आतापर्यंत ३२ जणांना अटक करण्यात आली आहे.
गुजरातमधील वडोदरा येथे गणेशमूर्ती स्थापनेसाठी नेत असताना दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या १३ जणांना ताब्यात घेतले असून एफआयआरही नोंदवला आहे. मांडवीजवळील पाणीगेट भागात सोमवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या दरम्यान दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री काही लोक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी घेऊन जात होते.
ही घटना पूर्वनियोजित होती असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला.
पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याच्या तपासणीसाठी गेले असता केली दगडफेक
जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे सुरक्षादलाला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या दहशतवाद्यांच्या खात्मा केल्यानंतर बडगाममधील संतप्त नागरिकांनी सुरक्षा दल आणि माध्यम प्रतिनिधींवर दगडफेक केली.
बीआरओचे पथक रस्ते बांधणीचे काम करत असताना त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकी दरम्यान जवान राजेंद्र सिंह शहीद झाले.
दोन समाजांमध्ये सुरु असलेला हिंसाचार रोखण्यासाठी शिलॉंगमध्ये संचारबंदी लागू केल्यानंतर जवानांवरच दगडफेक केल्याची घटना घडली आहे. तब्बल ४०० जणांकडून जवानांच्या शिबिरावर दगडफेक करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून दगडफेक नेमकी कोणी केली ? याविषयी माहिती अजून समोर आलेली नाही.