(CM Devendra Fadnavis) बीड जिल्ह्यात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता एसआयटी (Special Investigation Team) चौकशी करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत माहिती दिली आहे. भाजप आमदार सुरेश धस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याबाबत मागणी केली होती.
Read More
(Jalgaon) जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या पाईपलाईनची चोरी झाली होती. या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली. परंतु या प्रकरणाचा खरा सूत्रधार असल्याचा आरोप असणारे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन मात्र अद्यापही फरार आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई : छत्रपती संभाजी नगरमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर गृहविभागाने आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. गृहविभागाकडून या प्रकरणी एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली त्यांना ४ ददिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच ४०० पेक्षा अधिक जणांवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या हिंसाचारानंतर शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील जनजीवन सुरळीत करण्यास प्रशासनाला यश आले आहे. या घटनेच्या तपासासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची (एसआयटी) घोषणा करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष तपासणी पथकाच्या चौकशीतून माहिती उघड