भारत आणि मालदीव यांच्यातील व्यापार ५० कोटी डॉलरहून अधिक असून, त्यात कृषी उत्पादनांचा वाटा मोठा आहे. यामुळे मालदीवमधील महागाई कमी होऊन, तेथील जनतेत भारताबद्दल सकारात्मक मत निर्माण झाले आणि त्याचा तेथील निवडणुकांवर परिणाम झाला, तर तो एक सुखद योगायोग समजावा लागेल.
Read More
मालदीवमध्ये नुकतीच राष्ट्रपतीपदाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यात पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहम्मद मुइज्जू यांनी विद्यमान राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला. याआधी २०१८ मध्ये अब्दुल्ला यामीन यांचा पराभव करून इब्राहिम सोलिह राष्ट्रपती बनले होते.
भारत मालदीवमध्ये अनेक प्रकल्प विकसित करत आहे. ज्यामध्ये ‘ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी’ प्रकल्प आणि ‘हनीमधु’ आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्रमुख आहेत. सत्तेवर आल्यापासून म्हणजे २०१८ सालापासून राष्ट्रपती सोलिह यांनी ’इंडिया फर्स्ट’ मिशनच्या अनुषंगाने देशाच्या परराष्ट्र धोरणात भारताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तथापि, ते चीनशी काळजीपूर्वक संतुलित संबंध राखत आहेत.
महाराष्ट्रात, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणुकांचे वेध सर्वांना लागले आहेत. मग महापालिकेच्या निवडणुका असो किंवा पदवीधर निवडणुका; सर्वांचं लक्ष या निवडणुकांनी वेधून घेतलयं. राज्यात जरी या निवडणुकांच्या वारंवार चर्चा होत असल्या तरी जागतिक पातळीवर चर्चा होतेयं ती मालदीव येथे होणार्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांची. ही निवडणूक जरी मालदीवमध्ये होत असली तरी भारतासाठी आणि भारत-मालदीव संबंधासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे.
पंतप्रधान मोदींना मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतरचा पहिला भारताबाहेरील दौरा निश्चित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका आणि मालदीव या ठिकाणी दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
मानेभोवती असलेले चीनचे जोखड उखडून टाकणे मालदीवसाठी शक्य नसले आणि भारत सर्वच बाबतीत चीनशी स्पर्धा करू शकत नसला तरी अंतर आणि संस्कृती हे दोन मुद्दे भारताच्या बाजूने आहेत. दरवर्षी एक लाख भारतीय पर्यटक मालदीवला जातात. दोन देशांमधील विमानसेवा सुधारली तर ही संख्या काही पटींनी वाढून मालदीवच्या अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतील.
सोली यांच्या शपथविधीला मोदी उपस्थित
चीनला नामोहरम करत चीनला एक मोठा धक्का देण्याची आयती संधी भारत आणि सोलिह यांना चालून आली आहे.