"राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगली येथे दि. २० एप्रिल रोजी झालेल्या सभेत कन्यादान या हिंदू धर्मातील पवित्र विधी संदर्भात वादग्रस्त विधान केलं. त्यांनी फक्त एका महिलेचाच नव्हे तर या धार्मिक विधी अंतर्गत लग्न झालेल्या राज्यातील अनेक महिलांचा सार्वजनिकरित्या अपमान केला आहे.", असे म्हणत भिवंडीच्या नीता वैभव भोईर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र पाठवलं आहे. त्याच बरोबर या महिलेकडून आयपीसीच्या कलम ३५४ आणि कलम ५०९ अंतर्गत मिटकरींविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
Read More