(Walmik Karad) बीड मस्साजोगच्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड हे नाव गेला महिनाभर राज्यात चर्चेत आहे. मात्र वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडच्या मुलाविरोधात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
Read More
(Dharashiv) पैठण, जालन्यानंतर आज धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. बीड मस्साजोग सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणात न्यायाची मागणी करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील जनसमुदाय रस्त्यावर उतरणार आहे. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन न्यायाची मागणी केली जाणार आहे.
(Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी मस्साजोगला जातना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केल्याची माहिती समोर येत आहे.