ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव तर मी FB म्हणजे फेवरेट ब्रदर आहे, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सांगोला येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण व लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
Read More
मुंबई : काय झाडी,काय डोंगर या डायलॉगने महाराष्ट्राच्या घरा घरात प्रसिद्ध झालेले सांगोल्याचे कार्यसम्राट आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी “संत्रा आमदार मुर्दाबाद, शहाजीबापू मुर्दाबाद” अशी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका केली. त्याला प्रतीउत्तर देताना " माझ्यावर टीका करायला आणि बदनाम करायला मातोश्री, सेना भवन आणि मुंबई येथून आदेश निघत असले, तरी मी या कोणालाच भीक घालत नाही", अशी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत शहाजीबापूंनी शिवसेनेला टोला मारला.