मागील श्लोक क्रमांक १८८ मध्ये स्वामींनी सांगितले आहे की, “विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे।” समर्थांनी दासबोधात व मनाच्या श्लोकांत भक्तिमार्गाची महती सांगितली आहे. मनाच्या श्लोकात सुरुवातीसच राघवाचा पंथ प्रतिपादन करताना समर्थ म्हणतात की, “मना सज्जना भक्तिपंथेचि जावे।” (श्लोक क्रमांक २). समर्थांनी विवरण केलेल्या भक्तिपंथात स्वरूपाचे, रामाचे अनुसंधान कायम ठेवून ‘विभक्त नव्हे तो भक्त’ असे ऐक्य साधूनच उपासना करावी लागते. ल. रा. पांगारकर म्हणतात त्याप्रमाणे, हे श्लोक म्हणजे सगुण-निगुर्णातीत परब्रह्माचा अभ्यास आहे. त
Read More
मीपणाचा अर्थात अहंभावाचा त्याग करून रामाचा, स्वस्वरुपाचा शोध घेत असताना ते स्वरूप, ते तत्त्व आपल्याच ठिकाणी असल्याचे आढळते असे स्वामींनी मागील श्लोक क्रमांक १८६ मध्ये सांगितले. परमात्म तत्त्वाविषयी बोलताना स्वामी म्हणाले, ‘सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहे।’ अगदी जवळ असणार्या आपल्याच रुपाला आपण दुरावलो, याचे कारण आपला अहंभाव. मीपणाने आपण अंतरंगातील शाश्वत सत्याचा शोध घेऊ शकत नाही, त्या सत्याचा अनुभव घेऊ शकत नाही. स्वामींनी मनाला तेच तत्त्व शोधायला सांगितले आहे.
विश्वातील अगम्य घटनांच्या न समजणार्या कार्यकारणभावाच्या अथवा निमित्तकरणाच्या जिज्ञासेतून, ‘देव’ कल्पना उदय पावली. लोक आपण शोधलेल्या देवाला श्रेष्ठ मानून, त्याची पूजा, उपासना करू लागले. त्यात वेदात वर्णन केलेल्या, कुलपरंपरेनुसार अथवा भीतीपोटी आलेल्या, अनुकरण करण्यातून आलेल्या अनेक देवदेवतांना लोक भजू लागले. त्यामुळे ‘जगी पाहता देव कोट्यान्कोटी’ अशी स्थिती निर्माण झाली. प्रत्येकाला आपापल्या देवाचा, भक्तीचा वृथा अभिमान होऊन, गर्व निर्माण झाला. इतरांच्या देवकल्पनेला तो तुच्छ मानू लागला. पुढे क्षेत्रदेवाची कल्प
आज योगायोगाने संतश्रेष्ठ शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन आहे, तर परवा राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामींचा स्मरणदिन ‘रामदास नवमी’ आहे. तेव्हा ‘समर्थांच्या पाऊलखुणा’ या लेखमालेतील मनाच्या श्लोकांवरील विवेचन तात्पुरते बाजूला ठेवून, या संतश्रेष्ठींना मानवंदना देण्याचा विचार केला. समर्थ रामदासस्वामी आणि शेगावचे गजानन महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे स्वयंभू, स्वतंत्र आणि असामान्य अशी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या कुशीत जन्म घेऊन अथवा प्रकट होऊन, आपल्या भूमीला धन्य केले. त्याकाळी त्यांच्या संपर्कात आलेला प्
विश्वव्यापाराचा विचार केला, तर या जगातील जीव अव्यक्तातून व्यक्त दशेला येणे आणि काही काळानंतर, व्यक्तातून अव्यक्तस्थितीला जाणे या प्रक्रिया अनंतकाळापासून अखंडपणे चालू आहेत. हे सांभाळणारी कुणीतरी अज्ञात शक्ती असली पाहिजे, या कल्पनेतून देव-देवतांची निर्मिती झाली आहे. जो तो आपापल्या देव-देवतांचा अभिमान बाळगून राहिला आहे. अडाणी- अशिक्षित माणसांनी परंपरागत तसेच अज्ञानी समजुतींनी, भीतीपोटी अनेक देव मानले व ते त्यांची भक्ती करू लागले.
मानवाला निसर्गाकडून कल्पनाशक्तीची अपूर्व देणगी लाभली आहे. त्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण, विश्वातील ऐहिक गोष्टींचे रहस्य उलगडून ज्ञान मिळवू शकतो. तसेच, या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने आपण शाश्वत अशा भगवंताची, सद्वस्तूची ब्रह्मानुभूती घेऊन मानवी जीवनाचे सार्थक करू शकतो. परंतु, ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मानुभूती या सहजसाध्य नाहीत. सद्वस्तू स्वयंप्रकाशी आणि सर्व विश्वाला व्यापून टाकणारी अशी अफाट असली, तरी काही कारणांनी तीसुद्धा झाकाळून जात असल्याने, ती लगेच अनुभवता येत नाही. याचे स्पष्टीकरण आता स्वामी एका दृष्टान्ता
आत्मज्ञान आणि ब्रह्मानुभूतीसाठी सत्संगती करावी, हे आतापर्यंतच्या श्लोकांतून स्वामींनी स्पष्ट केले आहे. रोजच्या व्यवहारात आचरण सुधारण्यासाठी, सत्संगतीचे महत्त्व आपण मान्य करतो. प्रपंचापेक्षा परमार्थ क्षेत्रातील साध्य अतिसूक्ष्म वृत्तींशी जोडले गेले असल्याने, तेथे तर सत्संगतीला विशेष महत्त्व प्राप्त होते. मनाच्या श्लोकांतील या पुढील सर्व श्लोकांना, कै. ल. रा. पांगारकर यांनी ‘सगुण निर्गुणातील शुद्ध स्वरुपाचे वर्णन’ असे नाव दिले आहे. तर आचार्य विनोबा भावे यांनी त्या श्लोकांना, ‘गुरुकृपालब्धी’ म्हटले आहे. शंकरर
मानवी जीवनामध्ये अहंकार ज्याला जडला, त्या अहंकाराने त्या मनुष्याच्या जीवनाचे वाटोळे केले हे निश्चित. अहंकार शत्रूच मुळात फसवा आहे. जोवर नुकसान होत नाही, तोवर या अहंकाराच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी या अहंकारापासून चार हात लांब राहण्याचा सल्ला सज्जनांना देतात. अहंकार मानवी आयुष्यात कसे नुकसान करतो, याचे विवेचन...
समर्थ रामदास स्वामींचं जीवनचरीत्र रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. 'रघुवीर' हा आगामी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. 'रघुवीर' या चित्रपटाद्वारे प्रथमच रामभक्त समर्थांचं जीवन जगासमोर येणार आहे. या चित्रपटात अभिनेते विक्रम गायकवाड यांनी समर्थांची भूमिका साकारली असून ती करताना आलेले अनुभव त्यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितला.
‘श्री समर्थ रामदास ः एक अभ्यास’ हा सुरेश जाखडी लिखित सुमारे ४५० पानांचा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. लेखकाने विविधांगांनी सादर केलेला हा परिपूर्ण अभ्यासग्रंथ आहे. एकंदर नऊ प्रकरणे व तीन परिशिष्टे यातून लेखकाने रामदासांचे अलौकिक चरित्र, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्तृत्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या अभ्यासाची प्रेरणा त्यांना कशी मिळाली, हे सांगताना लेखकाने डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, शंकरराव देव, ल. रा. पांगारकर, वि. का. राजवाडे, प्रा. के. पि. बेलसरे इत्यादी विचारवंतांचेे विचार वाचून प्रेरित केले असे सा
समर्थ सांगत आहेत की, तुमच्या हितासाठी जे सत्य आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या हितासाठी तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे. आत्मप्रचिती घ्यायची आहे. माझे सांगणे जसेच्या तसे न स्वीकारता खरे हित शोधण्याचा तुम्हीच प्रयत्न करा. आत्मप्रचितीने खर्या हिताची जाणीव होते.
पुणे येथे बुधवार, दि. ५जुलै रोजी श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे या संस्थेच्यावतीने श्री समर्थ रामदास स्वामी लिखित ‘वाल्मिकी रामायणा’च्या सात कांडांमधील आठ खंडांचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोेहनजी भागवत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमावेळी सरसंघचालकांनी ‘रामो विग्रहवान् धर्मः’ या रामायणातील श्लोकाचा आधार घेत अतिशय मौलिक विचार प्रतिपादित केले. त्यानिमित्ताने सरसंघचालकांचे सदर कार्यक्रमातील संपूर्ण उद्बोधक भाषण दोन भागात प्रसिद्ध करीत आहोत.
उदासीनता हे सर्व आध्यात्मिक तत्त्वांचे सार आहे, असे स्वामी म्हणतात. आध्यात्मिक साधना करणार्याला उदासीनता नीट समजून घ्यावी लागते. त्यांचा अभ्यास करावा लागतो. समर्थ सांगतात, ती उदासीनता म्हणजे नैराश्य, उदासवाणेवाटणे नव्हे. उदासीनता याचा अर्थ विरक्ती म्हणजेच अनासक्ती, असा परमार्थमार्गात घ्यायचा असतो. अनेक भौतिक सुखसोयींच्या साधनांमुळे जगातील विविध गोष्टींची आसक्ती निर्माण होते. जीव त्यात गुंतून पडतो. ही बहिर्मुखता टाळून अभ्यासाने जीवाला अंतर्मुख विचारांकडे वळवले की, अनासक्तीचा पल्ला गाठता येतो. त्यामुळे स्वार्
गुरूपूजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही केले जाते. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना करताना भगव्या ध्वजालाच गुरूस्थानी मानले. तेव्हा आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु परंपरेचे स्मरण करुया...
रामाच्या अंगी असलेले गुण सर्वश्रेष्ठ असल्याने त्याची कीर्ती वर्णन करुन लोकांना राघवाचा पंथ दाखवावा. स्तुती करायची, तर राघवाची करावी, त्याच्या गुणांची करावी. इतर मानवी व्यक्तींची स्तुती करणे, त्यांची कीर्ती वर्णन करणे, हे योग्य होणार नाही, असे स्पष्ट उद्गार स्वामींनी काढले आहेत
दासबोधातील विचारांचे अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावता येतील. काही ओव्यांचे पाठांतर करून, त्यांचा संभाषणात वापर करून पांडित्य प्रदर्शन करता येईल. पण, त्याने ज्ञानाहंकार वाढेल आणि ‘माझ्यासारख्या ज्ञानी व दासबोध अभ्यासक कोणी नाही,’ अशी गर्वोक्ती केली जाईल. तसे झाले तर पारमार्थिकदृष्ट्या ते योग्य वाटत नाही. त्याने नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. हे टाळायचे असेल, तर दासबोधातील नुसत्या शब्दज्ञानापेक्षा पारमार्थिक प्रगतीसाठी दासबोधात सांगितलेल्या बद्ध, मुमुक्षू, साधक या अवस्था समजून घेऊन त्या पायर्या चढत चढत सिद
प्रभू रामचंद्रांच्या काळात तिने श्रीरामांना दर्शन दिले होते व कार्यसिद्धीसाठी वर दिला होता. त्याचे वर्णन रामदासांच्या पहिल्या स्तोत्रात आले आहे, ज्यांनी धर्मस्थापना केली आणि न्यायनीतीचे धडे ज्यांच्यापासून सुरू झाले असे राम-लक्ष्मण सीताशोधार्थ रानावनातून पायी भटकत होते. रावणाने कपट करून सीतेला पळवून नेले होते, अशाप्रसंगी भवानीमाता तेथे अकस्मात प्रकट झाली. ही रुपलावण्यसंपन्न युवती कोण? असा दोघांनाही प्रश्न पडला. ही त्रैलोक्यजननी आहे, हे रामांनी ओळखले तरी पार्वतीचे, लक्ष्मीचे सौंदर्य मुखावर विलसत असलेली ही दे
समर्थ रामदासस्वामींनी संप्रदायाची स्थापना करून त्याच्या कार्याची आखणी विचारपूर्वक केली होती. कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून स्वामी लोकांना भक्तिमार्गाला लावून संस्कृती रक्षण करीत होते. तत्कालीन अन्यायी, जुलमी राज्यसत्तेपासून सोडवणूक कशी करून घ्यायची, या विचारात असलेल्या लोकांना स्वामींचे सांगणे असे की-
तीर्थाटनाच्या काळात रामदास स्वामींनी हिंदू धर्माची आणि भारतीय संस्कृतीची होत असलेली उपेक्षा आणि अवनती पाहिली होती, अनुभवली होती. त्यावेळी राजकीय सत्ता म्लेंच्छांच्या हाती गेल्याने हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य उरले नव्हते. त्यांच्यावर अत्याचार होत होते.
आज जर समर्थ रामदासस्वामी असते तर त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता. श्रीराम हे त्यांचे आराध्य दैवत आणि सर्वस्व होते. श्रीराम हा समर्थांचाही समर्थ, देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवणारा आणि स्वामींचा परमार्थ होता.
नाठाळांना प्रसंगी डोक्यात काठी घालून समर्थांनी वठणीवर आणले आहे. आज समर्थ ग्रंथरुपाने वैचारिक प्रहार करीत आहेत. आपण त्यांचे अध्ययन करून त्याला सामोरे गेले पाहिजे. समर्थ विचारांचे फटके दासबोधातून आणखीही शोधता येतील. त्यासाठी साधकाची दृष्टी हवी.
समर्थ रामदासांनी लिहिलेले ‘आनंदवनभुवनी’ हे ५९ कडव्यांचे ‘अनुष्टुप’ एक अप्रतिम काव्य आहे. त्यातील शब्दयोजना, भावनांचा आवेश, विचारांचे अर्थसौंदर्य यांचा आस्वाद घ्यायचा, तर ते काव्य मुळातूनच वाचले पाहिजे. तसेच त्यातील गेयतेची गोडी विचाराबरोबर कळेल.
'भक्तिमार्ग' हा जरी या ग्रंथाचा मुख्य विषय असला तरी हा भक्तिमार्ग सर्वांगाने पुढे नेऊन त्याला 'प्रपंच-परमार्थ' जोडणारा आवश्यक घटक करावा आणि राष्ट्रभावनेची जाणीव देऊन राजकारणही त्यात समाविष्ट करावे, असे रामदासांच्या मनात होते. रामदासांनी आरत्या लिहिल्या, स्तोत्रे लिहिली आणि भक्तिपंथाची प्रशंसा केली.
दासबोध अभ्यासाची फलश्रुती कितीही चांगली असली तरी हा ग्रंथ ऐकणार्यांची, वाचणार्यांची जशी मनोवृत्ती असेल, तसेच फळ त्याला प्राप्त होईल. स्वतःला विद्वान समजणारे काही टीकाकार हा ग्रंथ मुळातून न वाचताच त्यावर टीका करतात. त्यांना समर्थांचे सांगणे आहे की, जे मूळ ग्रंथ न वाचता केवळ मत्सर मनात ठेवून टीका करीत असतात, त्यांना मत्सराशिवाय दुसरे काय प्राप्त होणार? गुणांची पारख न करता ज्यांना फक्त दोषच पाहण्याची सवय असते, त्यांना तेच प्राप्त होणार यात संदेह नाही. जशी ज्याची वृत्ती तसे फळ त्याला मिळणार. अर्थात, हीसुद्धा
शनिवार, दि. १४ मार्च रोजी नाथषष्ठी साजरी होत आहे. त्यानिमित्ताने एकनाथ महाराजांच्या विचारमूल्यांचा घेतलेला हा धांदोळा...
माणसाने आपले मन प्रसन्न ठेवून आत्मसुधारणेच्या मागे लागावे. आळस टाकून प्रयत्न करावा. काही झाले तरी प्रयत्नांची कास सोडू नये. प्रयत्न करताना आजूबाजूच्या लोकांना खूश ठेवावे. कोणाचे मन दुखवू नये. निरपेक्षपणे प्रयत्नपूर्वक कार्य करीत राहिल्यास महंताचे गुण आपल्या ठिकाणी येतात व प्रारब्ध अनुकूल होते.
प्रपंच परमार्थाचे चाक आज उलट्या दिशेने फिरून प्रपंचाला विलक्षण महत्त्व आले आहे. त्यातून परमार्थाची अवहेलना सुरू झाली आहे. परमार्थ विचार अनावश्यक झाले असून त्यांच्या हद्दपारीची भाषा लोक करीत आहेत. याचा समन्वय साधायचा तर पुन्हा दासबोधातील विचारांकडे वळावे लागेल.
प्रापंचिक लोक व्यावहारिक स्वार्थबुद्धीने वागत असल्याने त्यांच्या ठिकाणी सारासार विचार, विवेक कमी होताना दिसत आहे, अशा स्थितीत परमार्थ डावलून फक्त प्रपंचाकडे बघितल्याने कोणाचेही हित साधणार नाही.
ब्रह्म समजणे हे फार कठीण आहे. तरी समर्थांनी शास्त्राधारे सूक्ष्म कालगणना, विष्णू, महादेव, आदिशक्तीचे कालखंड सांगून त्याच्या पलीकडे असलेल्या परब्रह्माची माहिती दिली आहे. वस्तुतः या परब्रह्माचे वर्णन वेदही करू शकले नाहीत, आमच्या देहबुद्धीमुळे देहाचे मोठेपण वाटून आत्म्याचे मोठेपण आम्हाला समजत नाही, देहबुद्धी नाहीशी करुन, कोणत्याही कारणाने न बदलणाऱ्या परब्रह्माचा विचार करु तेव्हाच ब्रह्मनिरुपण समजले.
तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त झाली, धर्म नाश पावत आहे आणि हे सांभाळणारा कोणी दिसत नाही, ही खंत रामदासांच्या मनात होती. हे राष्ट्रीय कार्य शिवाजी महाराजांनी करावे, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून हा ‘महाराष्ट्रधर्म’ तुमची वाट पाहतोय असे रामदास म्हणाले.
आपला व आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालेल, एवढीच चिंता त्यांना नाही तर, ही प्रजा बौद्धिक पातळीवर समाजमन सुसंस्कारित करणारी आहे. स्नान-संध्या इत्यादी क्रियांनी शुचिर्भूत होऊन जागोजागी मठ, पर्णशाळा, ऋषिआश्रम या ठिकाणी वेदशास्त्र, धर्मशास्त्र यावर चर्चा घडवून आणणारी ही प्रजा आहे.
समर्थांच्या शिष्यांनी वेळोवेळी त्यांच्या लीला लिहून ठेवल्या होत्या. त्यांचा संदर्भ यात आहे. कल्याणस्वामी, उद्धवस्वामी, वेणाबाई, दिवाकर गोसावी या समर्थांच्या संगतीत वाढलेल्या प्रमुख शिष्यांनी लिहिलेल्या समर्थ चरित्रातील आठवणी, लीला आज उपलब्ध असत्या तर काय बहार झाली असती, असे पांगारकरांनी म्हटले आहे.
अखेरीस शिवाजी महाराज माहुलीला आले असताना त्यांची एका समर्थशिष्याशी गाठ पडली आणि त्या शिष्याने रामदास स्वामींकडून शिवाजी महाराजांसाठी आणलेले एक पत्र त्यांना दिले. त्या पत्रातून समर्थांनी शिवाजी महाराजांचे अप्रतिम वर्णन केले आहे. त्या पत्रानंतर आजतागायत सुमारे ३५० वर्षांमध्ये अनेक अभ्यासकांनी, प्रतिभावंतांनी, कवींनी, शाहिरांनी शिवाजी महाराजांचे वर्णन केले आहे
एकनाथांचा काळ हा समर्थांच्या अगोदरचा होता. स्वराज्याची पहाट अजून उजाडायची होती. तरीही एकनाथ महाराजांच्या मनात अनेक सामाजिक परिवर्तनाचे व राजकीय स्वातंत्र्याचे विचार होते. परकीय जुलमी सत्तेच्या काळात ते उघडपणे मांडणे अत्यंत कठीण होते. याची एकनाथांना कल्पना होती. रामदासांचा काळ हा नंतरचा आहे. त्यांनी त्यांच्या कल्पना व विचार स्पष्टपणे मांडून हिंदू संस्कृती रक्षण व त्यासाठी हिंदवी स्वराज्याला मदत करून रामराज्य आणणे हे आपले ध्येय निश्चित केले. असे असले तरी समर्थांनासुद्धा अनेक प्रसंगी आपल्या कार्याची, योजनांची
जुगार, चोरी, बाहेरख्यालीपणा, चहाडी, परस्त्रीगमन इ. वाईट सवयी असलेल्यांचे उल्लेख दासबोधात येतात. कृतघ्न, वाचाळ, भित्रे, निर्लज्ज, घाणेरडेपणाने राहणारे अशा लोकांचेही संदर्भ येतात. ही मूर्खांची लक्षणे आहेत.
समर्थांनी ही विवेकाची शिकवण दासबोधात ठिकठिकाणी सांगितली आहे. स्वामींची कार्यपद्धती म्हणजे सर्वांना शहाणे करून सोडावे अशी आहे. समर्थांनी विवेकाची महती वारंवार सांगितली आहे. तितकी इतर संतवाङ्मयात सांगितलेली दिसून येत नाही. विवेकाचा पुरस्कार केल्याने आदर्श मूल्ये, कला, विद्या तसेच शास्त्र उदय पावतात. विवेक बाळगल्याने कल्याणकारी, आनंदमय आणि ज्ञानमय ध्येये तयार होतात. त्याच प्रकारची मूल्ये समाजाचे कल्याण करतात.
जीवात्मा हा वायूपेक्षाही सूक्ष्म आहे आणि कर्तबगार आहे. देह आणि जीवात्मा एकत्र असण्याला समर्थांनी 'देहात्मयोग' असे सार्थ नाव दिले आहे. या देहात्मयोगाच्या बळावर विवेकाने हा जीवात्म त्रैलोक्याचा ठाव घेऊ शकतो, असे स्वामी म्हणतात.
आपण त्या प्राण्यांवर मनापासून प्रेम केले, तर ते प्राणी आपल्याला वश होतात. यासाठी आपण अंतर्निष्ठ होऊन त्या जाणिवेचे अखंड स्मरण केले की, त्याचे अखंड ध्यान लागते आणि परमात्मा आपल्या हाती येतो. या ठिकाणी समर्थांनी ‘अखंड ध्यान’ असा शब्दप्रयोग केला आहे, तरीदेखीलते एकप्रकारे ‘सहजध्यान’ आहे, असे म्हणता येईल.
रामदासी संप्रदायाचे, त्यातील महंतांचे कार्य समाजोपयोगी, हिंदू संस्कृतीरक्षक व हिंदवी राज्याला पोषक होते, हे आपण मागील लेखात पाहिले. स्वामींच्या कार्याचे वर्णन गिरीधरस्वामींनी त्यांच्या ‘समर्थप्रताप’ या ग्रंथात केले आहे. त्यात ते म्हणतात, समर्थांच्या कार्याला उपमा द्यायची तर, ‘आचार्यस्वामींची उपमा साजे।’ याचा अर्थ समर्थकार्याची तुलना करायची तर, आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्मरक्षणाचे जे कार्य केले, त्याच्याशी करता येईल.
शिष्य जर अनधिकारी असेल, तर गुरूने केलेला उपदेश वाया जातो. सद्गुरूप्रमाणे शिष्यही सत्शिष्य असेल, तरच पारमार्थिक ज्ञान दिले-घेतले जाईल. गुरूच्या आत्मज्ञानाचा उपदेश पचनी पडण्यासाठी शिष्याने साधन सोडता उपयोगाचे नाही. या ज्ञानाच्या जोडीला ‘सदुपासना सत्कर्म। सत्क्रिया आणि स्वधर्म। सत्संग आणि नित्यनेम।’ हे शिष्याच्या ठिकाणी असतील, तरच आत्मज्ञानाची प्रचिती येईल, नाहीतर शिष्यवर्गात पाखंडीपणा येऊन ढोंगीपणा माजेल.
सामान्य माणसे या भोंदूगुरूच्या संभाषण चातुर्याला फसतात आणि त्याला आध्यात्मिक गुरू समजू लागतात. याची समर्थांना कल्पना होती. त्यामुळे सद्गुरूची लक्षणे सांगण्याअगोदर गुरू कसा नसावा, हे समर्थांनी स्पष्ट केले आहे.
आजच्या काळातील वैचारिक चश्म्यातून आपण सतराव्या शतकातील माणसांची मानसिकता अजमावू लागलो, तर अनर्थ ओढवेल, हे माहीत असूनही आजचे टीकाकार समर्थांवर अकारण टीका करताना दिसतात. आजचा वाचकवर्ग हा सूज्ञ आहे. त्यामुळे समर्थांवरील टीकेतील कालविपर्यास हे वाचक ओळखतात.
ज्याच्या ठिकाणी भ्रम नसतो, त्याला ‘महापुरुष’ म्हणून ओळखता येते, असे समर्थांचे मत आहे. ‘भ्रम नसेल तयासी। मनी ओळखावे तयासी। महापुरुष।’ या जगात दिसणारे त्रिगुण आणि पंचमहाभूते हे नाशवंत असल्याने सर्व भ्रमरूप आहेत. प्रापंचिक भ्रमाचे जे प्रकार समर्थांनी ‘भ्रम निरूपण’ या समासातून सांगितले आहेत, त्यापैकी काही भ्रमांचा विचार आपण मागील लेखात केला. आता आणखी भ्रमाचे प्रकार पुढे दिले आहेत.
आपल्याला सर्वसाधारणपणे उत्पत्ती, स्थिती आणि संहार एवढीच विश्वाची ओळख असते. या जगातील दिसणारी, अनुभवाला येणारी प्रत्येक वस्तू विघटनशील असते हे आपण पाहिले. वस्तूचे विघटन होते म्हणजे ती नाश पावते, असे आपण समजतो. परंतु, परब्रह्म अविनाशी असते. ते पूर्वी होते, आता आहे आणि विश्वसंहारानंतरही तसेच राहणार आहे. त्यात काहीही बदल संभवत नाही.
कुविद्येची माणसे समाजाचे अपरिमित नुकसान करतात. त्यांच्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडते. समर्थांसारखे संत या अवगुणांचा पाढा वाचून लोकांना त्यापासून दूर राहण्याचा उपदेश करतात. कुविद्यालक्षणांचे अनेक प्रकार या समासात सांगून स्वामींनी अवगुणांचे भांडार दाखवले आहे, त्यागार्थ सांगितले आहे. त्यांचे वर्गीकरण करून ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
प्रल्हादाला अनेक संकटात टाकले, त्याच्या जीवावर उठला. पण, प्रल्हाद डगमगला नाही. नारायणाचे नामस्मरण त्याने थांबवले नाही. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला शाळेत पाठवून त्याच्या शिक्षकाला त्याला नास्तिकतेचे धडे देण्यास सांगितले.
दासबोधाच्या सुरुवातीस समर्थांनी पहिला समास प्रास्ताविक स्वरूपाचा लिहिला आहे.
चाफळला देऊळ बांधून झाले. मूर्ती मिळाल्या. मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. राममंदिरासाठी व तेथील रामनवमीच्या उत्सवासाठी चाफळची निवड हे रामदासांच्या दूरदृष्टीचे फलित होते.
छत्रपती संभाजी महाराजांविषयी बदनामी केल्याचा आरोप विवेक विचार मंच व विविध संस्थांनी केला होता. यावर हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचू देण्याचे आदेश परिषदेने दिले आहेत.
स्थूलापासून सूक्ष्मापर्यंतच्या यशस्वी प्रवासासाठी त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. विशेष लोकांना ज्ञात नसलेला लेखन प्रकार म्हणजे सवाया