माणसांच्या जागी एआय रोबोट काम करणार, ही आता दंतकथा राहिली नसून, तुमच्या आमच्या जगातलं वास्तव होणार आहे. २०२५ या वर्षामध्ये लवकरच माणसांच्या जागी एआय रोबोट काम करणार असल्याची माहिती OpenAI या कंपनीचे सीइओ सॅम ऑल्टमन यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ही कल्पना एखाद्या विज्ञान कथेसारखी वाटत असली तरी, लवकरच ही कल्पना सत्यात उतरणार आहे.
Read More
पाच दिवसांपूर्वी सॅम ऑल्टमन यांना ‘ओपनएआय’च्या संचालक मंडळाने कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली. पण, आता पुन्हा ऑल्टमन यांच्याकडे कंपनीचे सूत्र आली आहेत. ‘एआय’ क्षेत्रातील दिग्गज कंपनीमध्ये सुरू असलेल्या या सावळ्या गोंधळाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. त्यानिमित्ताने...
OpenAIच्या CEO पदावरुन बरखास्त केल्यानंतर सॅम ऑल्टमॅन आता मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू होणार आहे. स्वतः मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी Xवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. ऑल्टमॅनसह ग्रेग ब्रॉकमैन (Greg Brockman) सुद्धा मायक्रोसॉफ्टसोबत काम करणार आहेत. अधिक माहितीनुसार, सॅम ऑल्टमॅन आणि ब्रॉकमॅन मायक्रोसॉफ्टच्या एका नव्या A। रिसर्च टीमचं नेतृत्व करणार आहेत.
मुंबई : कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर इतका सर्रास होताना दिसत असताना त्याबाबत आता सुरक्षेविषयीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. जगातील बव्हंशी राजकीय नेत्यांकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असून एआय या चॅट जीपीटी कंपनीचे सीईओ सॅम अल्टमन यांनी याविषयी तसे सुतोवाच करून सबंध जगाला धोरण बनविण्याचे सुचवले आहे. अशातच आता 'ग्रुप आयबी' कडून एक अहवाल प्रसिध्द करण्यात आला असून यात धक्कादायक माहिती उघड करण्यात आली आहे. चॅट जीपीटी वापरणाऱ्या एक लाख युझर्सचा डेटा हॅक झाला असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.
नवी दिल्ली : ‘ओपन एआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सॅम ऑल्टमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारताच्या तांत्रिक परिसंस्थेला एका नव्या उंचीवर नेऊ शकते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये अतिशय क्रांतिकारी ठरत असलेल्या ‘ओपन एआय’चे सीईओ सॅम ऑल्टमन हे विविध देशांच्या दौऱ्यावर आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
अमेरिका : कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे मानवाच्या अस्तित्वाला धोका पोहोचण्याची भीती चॅट जीपीटीचे जनक सॅम ऑल्टरमन यांनी व्यक्त केली आहे. ते अमेरिकन संसदीय समितीसमोर ते बोलत होते. तंत्रज्ञान कंपन्या कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करत असून त्यामुळे मानवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला.