(Swara Bhaskar) बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरु असतानाच स्वरा भास्करचे एक वक्तव्य सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे व्हायरल होत आहे. यामध्ये ती म्हणाली की , "मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी मनात आदर असण्यासाठी तुम्ही कोणत्या जाती - धर्मात जन्माला आला याने काही फरक पडत नाही."
Read More
मुंबई : ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चा प्रवक्ता असलेल्या सज्जाद नोमानी ( Sajjad Nomani ) याचे ‘व्होट जिहाद’चे वक्तव्य त्यांच्या अंगलट आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नोमानीने परभणी येथील पत्रकारपरिषदेत केलेल्या वादग्रस्त जिहादी मानसिकतेच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. आयोगाने त्याची तात्काळ दखल घेत, २४ तासांत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश परभणी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
मुंबई : मुंबईचा सुनियोजित विकास, ही आपली गरज असून पुढच्या पाच वर्षांचे पूर्ण व्हिजन तयार आहे, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा वांद्रे पश्चिम विधानसभेचे उमेदवार आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दै.‘मुंबई तरुण भारत’सोबत साधलेला खास संवाद.
मुंबई : “पीएफआय’ आणि ‘आयएसआय’सारख्या अतिरेकी संघटनांप्रमाणेच ‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’वर बंदी आणा आणि सज्जाद नोमानीला अटक करा,” अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी ( Nitesh Rane ) केली आहे. ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’चे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. तसेच, ’हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है,’ असे वक्तव्य केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली. नितेश राणे म्हणाले की, “तालिबान समर्थक सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला समर्थन जाहीर करून ‘व्होट जिहाद’चे एक उत्तम उदाहरण दि
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले असताना, सज्जाद नोमानी ( Sajjad Nomani ) याने मविआ समोर प्रस्ताव मांडला आहे, नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून
पीएफआय आणि आयएसआयसारख्या अतिरेकी संघटनांप्रमाणेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डवर बंदी आणा आणि सज्जाद नोमानीला अटक करा, अशी मागणी भाजप नेते नितेश राणेंनी केली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. तसेच हमारा निशाना महाराष्ट्र नही, तो दिल्ली है,' असे वक्तव्य केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सज्जाद नोमानी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी धर्माचा वापर करून वोट जिहाद करत आहे. देशाच्या इतिहासात निवडणूकीमध्ये इतके लांगूलचालन आम्ही बघितले नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सज्जाद नोमानी यांचा वादग्रस्त व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून यावर राजकारण तापले आहे.
(Kirit Somaiya) सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. अशातच भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी मौलाना खलीलुर रहमान सज्जाद नोमानी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडीओ शेअर करत 'उघडा डोळे, बघा नीट' असे आवाहन जनतेला केले आहे. तसेच एक है तो सेफ है, या घोषणेचाही त्यांनी उल्लेख केला.
\Maulana Sajjad Nomani यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हि़डिओत काही मौलानाने महात्मा गांधींची तुलना ही दहशतवाद्यांशी केली आहे. ते म्हणाले की, जर हमास दहशतवादी असेल तर महात्मा गांधीही दहशतवादी आहेत, असे बेजबाबदार वक्तव्य मौलानाने केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या जुन्या वक्तव्यांचाही हवाला देण्यात आला आहे. बेताल वक्तव्य केलेल्या मौलानाचे नाव हे मौलाना सज्जाद नोमानी आहे.