विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देणे, महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योजकांचा शोध घेणे आणि नवउद्यमींचे स्टार्टअपचे स्वप्न साकार करण्यासाठी 'महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिले आहे. स्थानिक पातळीवर उद्योजक घडावेत, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवार, दि. २६ जानेवारी रोजी दिली.
Read More
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकवला आहे.
केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला मुंबई महानगरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दि. १५ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झालेली ही यात्रा आतापर्यंत लक्षावधी नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. यात हजारोंच्या संख्येने लाभार्थ्यांना फायदा मिळाला आहे. दि. २६ जानेवारी २०२४ या कालावधीपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. आपल्या परिसरात येणाऱ्या या यात्रेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात
जागृती यात्रा व जागृती एंटरप्राइज सेंटर - पूर्वांचल (जेईसीपी) चे संस्थापक श्री शशांक मणी लिखित नवे पुस्तक मिडल ऑफ डायमंड इंडिया या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अलीकडेच पार पडला. हे पुस्तक 'आत्मनिर्भरता' आणि 'मेक इन इंडिया' या संकल्पनांना एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाते. भारताच्या छोट्या-छोट्या शहरांमध्ये उद्यम क्रांती घडवून आणण्याचे कौशल्य आहे, जे आजवर दुर्लक्षित राहिले आहे, या कौशल्याचा समावेश करण्याच्या संकल्पनेवर हे पुस्तक आधारित आहे. अमृत काळामध्ये छोट्या शहरांमधील उद्यमितेला प्रोत्साहन दिले गेल्यास आत्मनिर्
‘स्टार्टअप २०’ या नव्या उपक्रमाची ‘जी २०’ या जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली असून, त्याचा मुख्य उद्देश ‘जी २०’ सदस्य देशांमध्ये सहकार्याच्या माध्यामातून नव्या, कल्पक व सहकार्यावर आधारित स्टार्टअप उद्योगशीलतेला चालना देणे हा आहे. याद्वारे विविध देशांमध्ये यशस्वी स्टार्टअपच्या माध्यमातून नव्या उद्योजकतेचे आदान-प्रदान करण्यासह विविध समस्यांची सोडवणूक करण्यावर भर दिला जाणार आहे.
एका कंपनीने स्टार्ट अप म्हणून सुवर्ण एटीएमचा प्रयोग केला आहे. भारतातले पहिले आणि जगातले पहिले रिअल टाईम सुवर्ण एटीएम हैदराबादेत सुरू झाले आहे. याआधी दुबईमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी एटीएम सुरू झाले आहेत. या एटीएममधून तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करुन सोनं खरेदी करता येणार आहे. गोल्डसिक्का (Goldsikka Limited) कंपनीने हैदराबादमध्ये सोन्याचं एटीएम बसवलं आहे. यामधून एटीएम सोन्याची नाणी काढता येतील.
पाळीव प्राणी म्हणजे त्या कुटुंबातील एक सदस्यच! तेव्हा अगदी घरातल्या हक्काच्या माणसाची जशी आपण काळजी घेतो, तशीच पाळीव प्राण्यांची काळजी वाहणारे प्राणिप्रेमीही बहुसंख्य! अशा या प्राणिप्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या संगोपनात मदत करणार्या ‘पॉसिबिलिटीज्’ या कल्पक अॅपचे निर्माते आयुष धूत. त्यांच्या स्टार्टअपचा प्रवास आणि नवउद्योजकांना त्यांनी केलेले हे बहुमूल्य मार्गदर्शन...
‘युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स’ (युएमआयसीसी/युमिक) आणि मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंतीच्या निमित्ताने ‘मराठी तरुण बदलतोय’ हा ‘स्टार्टअप’ विशेष, आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुभाष कुलकर्णी यांनी मराठी साहित्य व कला मंडळच्या वाटचालीचा आढावा देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
आपण काहीतरी नवीन उपक्रम सुरू केला, ज्यातून कितीतरी हातांना काम मिळाले, बाजारपेठेत पैसा खेळू लागला, त्या आपल्या कामाची दखल सरकारने घेतली आणि आपल्या कामाचा सन्मानही केला, ही भावना नवउद्योजकांत वाढीस लागेल. यातूनच आणखी कित्येकांना उद्योग-व्यवसायाच्या मार्गावर चालण्याची इच्छा होईल.
ब्रेललिपीच्याही पलीकडे जाऊन अंधांसाठी एक सहज-साधे, पण तरीही एक विशेष उपकरण तयार करणारा 23 वर्षांचा रुपम शर्मा... त्याच्या या प्रयोगाने तो अंधांसाठीचा देवदूतच ठरला आहे.
‘महा उद्योग श्री पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या पुरस्कारांची सुरुवात यावर्षीपासून करण्यात आली असून या दोन्ही उद्योग रत्नांचा गौरव हा राज्याचा गौरव आहे अशी भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
लक्ष्यपूर्तीसाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्हर्जन्स २०१८' या जागतिक गुंतवणूक परिषदेत आयोजित एका चर्चासत्रात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.