जेलमध्ये अनेक स्वयंसेवकांना त्यांच्या घरची मंडळी भेटण्यात येत असत. परंतु, एक औरंगाबादचे स्वयंसेवक कार्यकर्ते होते, त्यांना जवळजवळ एक वर्ष होत आले. परंतु, त्यांच्या घरून त्यांना भेटण्यास कोणीच आले नव्हते. शेटे सरांनी त्या कार्यकर्त्यास सहज विचारले, “वर्षभर तुम्हाला कोणीच भेटण्यास का नाही आले?” त्यावेळी त्या औरंगाबादच्या स्वयंसेवकाने सांगितलेले उत्तर हृदय पिळवटून टाकणारे होते. त्यांनी सांगितले की, “घरून नाशिकला येण्यासाठी एका माणसास एका बाजूने २५ रुपये भाडे लागते. येऊन जाऊन ५० रुपये आणि पत्नीला यायचे तर अजून
Read More