सध्या देशात लोकसभा २०२४ च्या (Loksabha Elelctions 2024) निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणूकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून आज तमिळनाडूमध्ये सामान्य नागरिकांसह दाक्षिणात्य कलाकारांनी देखील जबाबदारीने मतदान (Loksabha Elelctions 2024) केले. अगदी रजनीकांत पासून ते कमल हसन पर्यंत सगळ्यांनी मतदान करत लोकांनी देखील मतदान करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
Read More
संपूर्ण देशातील रामभक्त ज्या ऐतिहासिक दिवसाची गेली अनेक वर्ष वाट पाहात होते तो क्षण आज २२ जानेवारी २०२४ रोजी आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलललाच्या मंदिराचे उद्घाटन होणार असून मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. साधु महंत आणि विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होणार आहेत. या सोहळ्याला हिंदी चित्रपसृष्टीतील कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.
देशभरातील तमाम रामभक्त सध्या २२ जानेवारी २०२४ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दिवशी अयोधअयेत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखदारपणे रंगणार आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी श्रीरामनगरी अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या संदर्भातील घडामोडींवर नजर ठेवून आहेत. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी हजेरी लावणार असून यात अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुस
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नी लता अडचणीत आल्या आहेत. 'कोचादाइयां' या तमिळ चित्रपटाशी संबंधित फसवणूक प्रकरणामुळे त्या चर्चेत आल्या असून या प्रकरणात लता यांना बंगळुरू न्यायालयाने जामीन दिला असून अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने लता रजनीकांत यांना १ लाख रुपये आणि २५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, लता यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'सेलिब्रिटी असल्याची ही किंमत मोजावी लागत आहे', असे मत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
नुकताच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील थलायवा रजनीकांत यांनी ३३ वर्षांनतर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार असल्याची घोषणा केली. या दोन्ही दिग्गज कलाकारांबद्दल बोलावे तितकेच कमी, पण रजमीकांत यांनी ट्विट करत माझ्या मार्गदर्शकासोबत पुन्हा काम करण्याची मिळालेली संधी ही आनंद देणारी आहे असे म्हटले होते. त्यांच्या या पोस्टमुळे अमिताभ बच्चन भावूक झाले आहेत.
सध्या हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार एकमेकांच्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका करताना दिसत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे देव म्हणजे रजनीकांत तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. ‘थलाईवर १७०’ या चित्रपटात हे दोघे एकत्र काम करणार असल्याची आनंदाची बातमी स्वत: रजनीकांत यांनी ट्विट करत दिली आहे.
रजनीकांत आणि अमिताभ बच्चन ३२ वर्षांनी दिसणार एकत्र
भविष्यात राजकारणात येण्याची इच्छा नाही असे विधान अभिनेता रजनीकांत यांनी केले
रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा २.० हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. २.० या सिनेमाने आतापर्यंत ४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'बॉस' रजनीकांत आणि अक्षयकुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या २.० या सिनेमाने ४ दिवसांत तब्बल ४०० कोटींची कमाई केली आहे. उत्तर भारत आणि इतर हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केली आहे.
रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या २.० या बहुचर्चित चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट ३ भाषांमध्ये भारतात ७००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ग्रेट असल्याचे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी मान्य केले आहे.
या १८ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचे निकाल तामिळनाडूच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवतील. या पोटनिवडणुकांत ना करुणानिधी नसतील, ना जयललिता नसतील. म्हणून या पोटनिवडणुका महत्त्वाच्या ठरतील.