Kunal Kamra काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनने कविता रचली. त्यामुळे शिवसैनिकांनी त्याला जशास तसं उत्तर दिले. त्यानंतर कुणाल कामरा हा उबाठा गटाच्या सांगण्यावरून हे सर्व करत असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर त्याला कायद्याची लढाई लढावी लागली होती. अशातच आता संतप्त शिवसैनिकांनी पुन्हा आता कुणाल कामराला घेरले आहे.
Read More
खिचडी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या आरोपांसंदर्भात युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या खोट्या आरोपांबाबत राऊतांनी माफी मागावी, अन्यथा उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करू, असा इशारा कनाल यांनी दिला आहे.
संजय राऊत तुम्ही कुठे कुठे खिचडी खायला जात असता हे आम्हाला माहिती आहे. आमच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्या अन्यथा राजीनामा द्या, अशी मागणी शिवसेनेचे नेते अमेय घोले आणि राहुल कनाल यांनी केली आहे. संजय राऊतांनी अमेय घोले आणि राहूल कनाल यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप केले होते. अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल हे खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. यावरून आता त्यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल कनाल यांचा फोटो झळकला आहे. येथे फोटो लागणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या लोकप्रियतेचा आलेख दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल हे काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात आले. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंसह, खासदार श्रीकांत शिंदे आणि राहुल कनाल असा तिघांचा फोटो न्यूयॉर्क टाइम्समध्ये झळकला आहे.
आज सकाळी ५ वा. आयकर विभाग विविध ५ ठिकाणी धाडी टाकत आहे.यात शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींवर धाडी टाकल्या जात आहे.यात एक नाव समोर येत आहे ते म्हणजे संजय कदम. परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभाग धडकलं आहे.